Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 15:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तेव्हा अर्पण करणार्‍याने गोर्‍ह्याबरोबर अर्धा हिन तेलात मळलेल्या तीन दशमांश एफा सपिठाचे अन्नार्पण करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तेव्हा अर्पण करणाऱ्याने त्या गोऱ्ह्या बरोबर अर्धां हिन तेलात मळलेल्या तीन दशमांश एफा सपिठाचे अन्नार्पण करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 बैलाबरोबर एफाचे तीन दशांश बारीक सपीठ, अर्धा हीन जैतुनाच्या तेलात मळलेले असे अन्नार्पण आणावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 15:9
18 Iomraidhean Croise  

अर्णान दाविदाला म्हणाला, “ही जमीन आपणाला घ्या, माझ्या स्वामीराजांनी जे काही ठीक दिसेल ते करावे. पाहा, होमबलीसाठी बैल, इंधनासाठी मळणीची औते व अन्नार्पणासाठी गहू ही सर्व मी आपणाला देतो.”


समर्पित भाकरी, नित्याचे अन्नार्पण, नित्याचे होमार्पण आणि शब्बाथ, चंद्रदर्शन आणि नेमलेले सण ह्यासंबंधाची बलिदाने आणि पवित्र वस्तू, इस्राएलाच्या प्रायश्‍चित्तासाठी पापार्पणे, ह्या सर्वांसाठी आमच्या देवाच्या मंदिराच्या कामी लागणारा खर्च आम्ही द्यावा.


तो मला म्हणाला, “सोडलेल्या जागेसमोरील उत्तरेकडल्या खोल्या व दक्षिणेकडल्या खोल्या पवित्र असून त्यांत परमेश्वरासमोर जाणारे याजक ह्यांनी परमपवित्र पदार्थांचे सेवन करावे; तेथे त्यांनी अन्नबली, पापबली, दोषबली वगैरे परमपवित्र पदार्थ ठेवावेत; कारण ते स्थान पवित्र आहे.


उत्सवांच्या व सणांच्या दिवशी दर गोर्‍ह्यामागे एक एफा अन्नार्पण व दर एडक्यामागे एक एफा अन्नार्पण करावे; दर कोकरामागे यथाशक्ती अन्नार्पण करावे, आणि दर एफाबरोबर एक हिनभर तेल अर्पावे.


ह्या प्रकारे रोज सकाळी कोकरू, अन्नार्पण व तेल असे नित्यक्रमाने होमार्पण सिद्ध करावे.


दर एडक्यामागे एक एफा अन्नार्पण करावे व दर कोकरामागे यथाशक्ती अन्नार्पण करावे आणि प्रत्येक एफाबरोबर एक हिनभर तेल अर्पावे.


दर गोर्‍ह्यामागे एक एफा व दर एडक्यामागे एक एफा अन्नार्पण सिद्ध करावे; दर कोकरामागे यथाशक्ती अन्नार्पण करावे, आणि प्रत्येक एफाबरोबर एक हिनभर तेल अर्पावे.


परमेश्वराच्या मंदिरात अन्नार्पण व पेयार्पण येण्याचे बंद झाले आहे; परमेश्वराची सेवा करणारे याजक शोक करत आहेत.


परमेश्वर तुमचा देव ह्याला कळवळा येऊन तो मागे वळेल व आपल्यामागे आशीर्वाद ठेवून जाईल की नाही कोण जाणे; असे की जेणेकरून तुम्हांला त्याला अन्नार्पण व पेयार्पण करता येईल.


आठव्या दिवशी दोन दोषहीन कोकरे, एक वर्षाची दोषहीन मेंढी, अन्नार्पणासाठी तेलात मळलेले तीन दशांश एफा2 सपीठ व एक लोगभर2 तेल हे आणावे.


अन्नार्पणाचा विधी असा : अहरोनाच्या मुलांनी परमेश्वरासमोर वेदीपुढे ते अर्पावे;


होमार्पण, अन्नार्पण, पापार्पण, दोषार्पण, (याजकाच्या) समर्पणाचे अर्पण आणि शांत्यर्पणाचा यज्ञबली ह्यांविषयीचा विधी हा;


परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य म्हणून अर्धा हिन द्राक्षारसाचे पेयार्पण तू करावेस.


तू परमेश्वराप्रीत्यर्थ होमबली अथवा नवस फेडण्यासाठी यज्ञ किंवा शांत्यर्पणाचा यज्ञ म्हणून गोर्‍हा अर्पण करशील,


प्रत्येक गोर्‍ह्यामागे अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले तीन दशमांश एफा सपीठ, आणि प्रत्येक मेंढ्यामागे अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ,


त्यांबरोबरची पेयार्पणे ही असावीत. गोर्‍ह्यामागे अर्धा हिन, मेंढ्यामागे एक तृतीयांश हिन आणि कोकरामागे एक चतुर्थांश हिन द्राक्षारस. वर्षातील प्रत्येक महिन्यात होमबली अर्पायचा तो हा होय.


अमावस्येचे होमार्पण आणि त्याबरोबरचे अन्नार्पण, तसेच नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण व त्यांबरोबरची पेयार्पणे ह्या सर्वांखेरीज हे अर्पण परमेश्वराला सुवासिक हव्य म्हणून विधिपूर्वक अर्पावे.


त्याचे दूध तोडल्यावर ती त्याला घेऊन गेली; तिने तीन गोर्‍हे, एक एफाभर सपीठ, एक बुधलाभर द्राक्षारस बरोबर घेतला आणि ती शिलो येथे परमेश्वराच्या मंदिरात मुलाला घेऊन गेली; तो त्या वेळी केवळ बालक होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan