Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 15:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 त्याने परमेश्वराचे वचन तुच्छ मानले व त्याची आज्ञा मोडली, म्हणून त्याचा सर्वस्वी उच्छेद व्हावा; त्याच्या दुष्कर्माची शिक्षा त्यानेच भोगावी.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 कारण त्याने परमेश्वराचा शब्द तुच्छ मानला आहे आणि त्याने माझी आज्ञा मोडली. तर त्या व्यक्तीला पुर्णपणे तुमच्यातून काढून टाकले पाहिजे. त्याचा दोष त्याच्यावरच राहील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 कारण त्यांनी याहवेहच्या शब्दाला तुच्छ मानले आहे आणि याहवेहच्या आज्ञा मोडल्या आहेत, त्यांचे खचितच उच्छेदन करावे; त्यांचा दोष त्यांच्यावर राहील.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 15:31
19 Iomraidhean Croise  

तू परमेश्वराची आज्ञा तुच्छ मानून त्याच्या दृष्टीने वाईट असे हे कृत्य का केलेस? उरीया हित्ती ह्याचा तू तलवारीने घात केला, त्याची बायको आपल्या घरात घातलीस आणि उरीयाचा अम्मोन्यांच्या तलवारीने वध करवलास?


कारण त्यांनी देवाच्या आज्ञांविरुद्ध बंडाळी करून परात्पराचा बोध तुच्छ मानला होता.


परमेश्वराची कार्य करण्याची वेळ आली आहे, कारण त्यांनी तुझ्या नियमशास्त्राचे उल्लंघन केले आहे;


कारण माझे अपराध माझ्या डोक्यावरून गेले आहेत; जड ओझ्याप्रमाणे ते मला फार भारी झाले आहेत.


जो कोणी त्याच्यासारखे मिश्रण तयार करील किंवा कोणा परक्याला ते लावील त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा.”


वचन तुच्छ मानणारा स्वत:वर अनर्थ आणतो, पण आज्ञेचा धाक बाळगणार्‍यास चांगले प्रतिफळ मिळते.


ह्यामुळे इस्राएलाचा पवित्र प्रभू म्हणतो, “तुम्ही ह्या वचनाचा धिक्कार करून बलात्कार व कुटिलाचार ह्यांवर भिस्त ठेवता व अवलंबून राहता;


आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो; आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता; अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले.


जो जीवात्मा पाप करील तोच मरेल; मुलगा बापाच्या पातकाचा भार वाहणार नाही, आणि बाप मुलग्याच्या पातकाचा भार वाहणार नाही; नीतिमानाला त्याच्या नीतिमत्तेचे फळ मिळेल; दुष्टाला त्याच्या दुष्टतेचे फळ मिळेल.


माझ्या विधींचा अव्हेर केला, तुमच्या जिवाने माझे निर्बंध तुच्छ मानले, आणि माझ्या सर्व आज्ञा अमान्य करून माझा करार मोडला,


त्यांच्यावाचून देश ओस पडेल आणि त्यांच्यावाचून ओस असेपर्यंत तो आपले शब्बाथ उपभोगत राहील; त्यांनी माझ्या निर्बंधांचा अव्हेर केला व माझे विधी तुच्छ मानले म्हणूनच त्यांच्या दुष्टतेबद्दल केलेली शिक्षा ते मान्य करतील.


साक्षीदाराने पाहिलेल्या किंवा त्याला माहीत असलेल्या बाबींविषयी त्याला प्रतिज्ञेवर विचारले असता त्याने ती न सांगण्याचे पाप केल्यास त्या अन्यायाबद्दल त्याने शिक्षा भोगावी.


परंतु एखादा मनुष्य शुद्ध असून व प्रवासात नसूनही त्याने वल्हांडण सण पाळण्याची हयगय केली तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. नेमलेल्या समयी त्याने परमेश्वराला अर्पण आणले नाही म्हणून त्याच्या पापाची शिक्षा त्याने भोगावी.


जो मनुष्य उन्मत्त होऊन तुझा देव परमेश्वर ह्याच्या सेवेस तेथे उपस्थित असणार्‍या याजकाचे किंवा न्यायाधीशाचे ऐकणार नाही तो मनुष्य प्राणास मुकावा; अशा प्रकारे इस्राएलातून तू ही दुष्टाई नाहीशी करावीस.


म्हणून जो कोणी अव्हेर करतो तो माणसाचा नव्हे, तर तुम्हांला आपला पवित्र आत्मा देणारा देव ह्याचा अव्हेर करतो.


‘त्याने स्वतः तुमची आमची पापे’ स्वदेही ‘वाहून’ खांबावर ‘नेली’, ह्यासाठी की, आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या ‘माराने तुम्ही निरोगी झाला आहात.’


कारण नीतिमत्त्वाचा मार्ग समजून आल्यानंतर आपणांस दिलेल्या पवित्र आज्ञेकडे पाठ फिरवणे ह्यापेक्षा तो न समजणे ते त्यांच्यासाठी बरे होते.


ह्यास्तव मी एलीच्या घराण्याविषयी अशी शपथ घेतली आहे की एलीच्या घराण्याच्या पातकाचे क्षालन यज्ञ व अर्पण ह्यांनी कदापि व्हायचे नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan