गणना 15:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 चुकून काही कृत्य करणार्याच्या बाबतीत तुम्हांला एकच नियम असावा, मग तो इस्राएल लोकांतील स्वदेशीय असो किंवा त्यांच्यामध्ये वस्ती करणारा परदेशीय असो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 जो मनुष्य चुकून पाप करतो त्याच्यासाठी हा नियम आहे. इस्राएलच्या कुटुंबात जन्मलेल्या लोकांसाठी व तुमच्यात राहणाऱ्या परदेशी लोकांसाठी सारखेच नियम आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 जे कोणी नकळत पाप करतील त्यांच्यासाठी हाच एक नियम लागू असावा, ती व्यक्ती जन्मतः इस्राएली असो किंवा तुमच्यामध्ये राहणारा परदेशी असो. Faic an caibideil |
परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणार्या लेवीय याजकांसमोर सर्व इस्राएल, त्यांचे वडील, अंमलदार आणि न्यायाधीश तसेच देशात जन्मलेले आणि उपरे हे कोशाच्या उजवीकडे व डावीकडे उभे राहिले. इस्राएल लोकांना प्रथम आशीर्वाद देण्यासंबंधी परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने पूर्वी जी आज्ञा दिली होती, त्याप्रमाणे निम्मे लोक गरिज्जीम डोंगरासमोर व निम्मे एबाल डोंगरासमोर उभे राहिले.