Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 14:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 तुमची प्रेते ह्या रानात नष्ट होईपर्यंत चाळीस वर्षे तुमची मुलेबाळे तुम्ही केलेल्या विश्वासघाताची शिक्षा भोगत रानात भटकणार्‍या मेंढपाळासारखी होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 तुमची प्रेते या रानात नष्ट होईपर्यंत चाळीस वर्षे तुमची मुलेबाळे तुम्ही केलेल्या विश्वासघाताची शिक्षा भोगीत रानात भटकणारी होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 तुमच्यापैकी अगदी शेवटचा देह या रानात पडेपर्यंत तुमची लेकरे तुमच्या अविश्वासूपणाचे परिणाम भोगत चाळीस वर्षे मेंढपाळ म्हणून राहतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 14:33
20 Iomraidhean Croise  

काही जण अरण्यात वैराण प्रदेशातील वाटेने भटकले; त्यांना वस्तीचे नगर आढळले नाही.


तेव्हा तो अधिपतींवर अपमानाचा मारा करतो; त्यांना मार्गहीन वैराण प्रदेशात भटकण्यास लावतो.


ह्यामुळे त्याने त्यांचे दिवस वाफेसारखे नाहीसे केले व त्यांची वर्षे घोर भयात संपवली.


त्यांच्या पाया पडू नकोस किंवा त्यांची सेवा करू नकोस; कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे; जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना तिसर्‍या-चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल मी शासन करतो;


ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, तू मला विसरली आहेस, व तू माझ्याकडे पाठ फिरवली आहेस, म्हणून तू आपल्या कामासक्तीचे व व्यभिचाराचे फळ भोग.”


हे इस्राएला, इतर राष्ट्रांप्रमाणे आनंदाने उल्लासू नकोस, कारण तू व्यभिचार करून आपल्या देवाला सोडले आहेस; प्रत्येक खळ्यावर व्यभिचाराची कमाई तुला आवडली आहे.


परमेश्वराचा क्रोध इस्राएलावर भडकला आणि ज्यांनी परमेश्वराच्या दृष्टीने दुष्कर्म केले होते त्यांची सर्व पिढी नष्ट होईपर्यंत त्याने त्यांना रानात चाळीस वर्षे भटकायला लावले.


इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यापासून चाळिसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या प्रतिपदेस अहरोन याजक परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे होर पर्वतावर गेला आणि तेथे मृत्यू पावला.


मग तो पुरुष अनीतीपासून मुक्त होईल, पण त्या स्त्रीने आपल्या अनीतीची शिक्षा भोगावी.”


‘त्याने मिसर देशात’, तांबड्या समुद्रात व ‘रानात चाळीस वर्षे अद्भुत कृत्ये करून व चिन्हे दाखवून’ त्या लोकांना बाहेर नेले.


चाळिसाव्या वर्षाच्या अकराव्या महिन्याच्या प्रतिपदेस जे काही इस्राएल लोकांना सांगावे म्हणून परमेश्वराने मोशेला आज्ञा केली होती, त्याप्रमाणे त्याने हे सर्व त्यांना सांगितले.


आपण कादेश-बर्ण्या सोडून जेरेद नाल्यापलीकडे गेलो, त्याला अडतीस वर्षे लागली; ह्या अवधीत परमेश्वराने शपथ वाहिल्याप्रमाणे त्या सबंध पिढीतल्या योद्ध्यांचा छावणीत नाश झाला.


कारण तुझा देव परमेश्वर ह्याने तुझ्या हातच्या सगळ्या कामाला यश दिले आहे; ह्या मोठ्या रानातली तुझी हालचाल त्याला ठाऊक आहे; आज ही चाळीस वर्षे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर आहे; तुला कशाचीही वाण पडली नाही.’


मी तुम्हांला चाळीस वर्षे रानातून चालवले, पण तुमच्या अंगावरचे कपडे विरले नाहीत किंवा तुमच्या पायांतील पायतणे झिजली नाहीत.


तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही ह्याची कसोटी पाहावी म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याने गेली चाळीस वर्षे तुला रानातून कोणत्या रीतीने चालवले ह्याचे स्मरण कर.


ही चाळीस वर्षे तुझ्या अंगावरचे कपडे जीर्ण झाले नाहीत; आणि तुझे पाय सुजले नाहीत.


इस्राएल रानात प्रवास करत असताना परमेश्वराने मोशेला हे सांगितले तेव्हापासून आज पंचेचाळीस वर्षे परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे मला जिवंत ठेवले आहे; आज बघ, मी पंचाऐंशी वर्षांचा आहे.


कारण इस्राएल लोक रानात चाळीस वर्षे प्रवास करत होते; मिसर देशातून निघालेल्या सर्व राष्ट्राने म्हणजे युद्धास पात्र अशा पुरुषांनी परमेश्वराचे सांगणे न ऐकल्यामुळे, ह्या काळात त्यांचा संहार झाला होता; परमेश्वराने त्यांना शपथेवर सांगितले होते की, जो देश मी तुमच्या पूर्वजांना तुमच्यासाठी शपथेवर देऊ केला आहे आणि ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत तो मी तुमच्या दृष्टीस पडू देणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan