गणना 14:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
3 तलवारीने आमचा निःपात व्हावा म्हणून परमेश्वर आम्हांला ह्या देशात का नेत आहे? आमच्या बायकामुलांची लूट होईल! आम्ही मिसर देशात परत जावे हेच बरे नव्हे काय?”
3 तलवारीने आमचा नाश व्हावा म्हणून या नवीन प्रदेशात युद्धात जाण्यासाठीच परमेश्वराने आम्हास इथे आणले का? शत्रू आम्हास मारून टाकील आणि आमच्या स्त्रिया मुलांना घेऊन जाईल. मिसर देशात परत जाणेच आमच्या दृष्टीने जास्त बरे आहे.”
3 आम्ही तलवारीने पडावे म्हणूनच या देशात याहवेह आम्हाला आणत आहेत काय? आमच्या स्त्रिया आणि लेकरांना गुलाम म्हणून नेण्यात येईल. आम्ही इजिप्तकडे परत जावे हे आमच्यासाठी बरे नाही काय?”
त्यांनी हुकूम मानण्याचे नाकारले, आणि जी आश्चर्यकृत्ये तू त्यांच्यामध्ये केली होतीस त्यांची त्यांनी पर्वा केली नाही; पण त्यांनी आपली मान ताठ करून एवढे बंड केले की आपल्या दास्यात परत जाण्यासाठी त्यांनी एक नायक नेमला; पण तू क्षमाशील, कृपाळू, दयामय, मंदक्रोध व अतिकरुणामय देव आहेस; तू त्यांचा त्याग केला नाहीस.
इस्राएल लोक त्यांना म्हणू लागले की, “आम्ही मिसर देशात मांसाच्या भांड्याभोवती बसून भरपूर जेवत होतो तेव्हा आम्हांला परमेश्वराच्या हातून मरण आले असते तर पुरवले असते; पण ह्या सर्व समुदायाला उपासाने मारावे म्हणून तुम्ही आम्हांला ह्या रानात आणले आहे.”
तेव्हा ते त्यांना म्हणाले, “परमेश्वर तुम्हांला पाहून घेवो; फारोच्या दृष्टीने व त्याच्या चाकरांच्याही दृष्टीने तुम्ही आम्हांला आमची किळस येईल असे केले आहे; आम्हांला मारून टाकण्यासाठी तुम्ही त्यांच्या हातात जशी काय तलवारच दिली आहे.”
आणि असे म्हणाल की, ‘नाही, आम्ही मिसर देशात जाऊ, तेथे आमच्या नजरेस युद्ध पडणार नाही, तेथे कर्ण्याचा शब्द आम्हांला ऐकू येणार नाही व भाकरीवाचून आम्ही उपाशी मरणार नाही, आम्ही तेथेच वस्ती करू;’
खोटे बोलण्यास ते आपली जीभ धनुष्याप्रमाणे वाकवतात; ते देशात प्रबळ झाले आहेत, पण सत्यासाठी नव्हे; ते दुष्कर्माला दुष्कर्म जोडतात; मला ते ओळखत नाहीत, असे परमेश्वर म्हणतो.
तर तुमच्या नाकातून निघेपर्यंत आणि तुम्हांला शिसारी येईपर्यंत तुम्ही ते महिनाभर खात राहाल; कारण तुमच्यामध्ये वसत असलेल्या परमेश्वराचा तुम्ही त्याग करून त्याच्यासमोर असे रडगाणे गाइले की, आम्ही मिसर देशातून निघालो तरी कशाला?”
ते परमेश्वराविरुद्ध व मोशेविरुद्ध असे बोलू लागले की, “तुम्ही आम्हांला मिसर देशातून काढून ह्या रानात मरायला कशाला आणले? येथे तर अन्न नाही व पाणीही नाही, आणि ह्या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत.”
आणि ही लुटली जातील असे ज्या तुमच्या मुलाबाळांविषयी तुम्ही म्हणालात ती, म्हणजे जी मुले आज बरेवाईट जाणत नाहीत ती त्या देशात जातील, मी तो त्यांना देईन आणि ती तो वतन करून घेतील.