Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 14:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 वास्तविक, मी जिवंत आहे आणि सारी पृथ्वी परमेश्वराच्या महिम्याने भरलेली आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 पण खचित जसा मी जिवंत आहे आणि सारी पृथ्वी परमेश्वराच्या वैभवाने भरलेली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 परंतु खचितच मी जिवंत आहे आणि खचितच संपूर्ण पृथ्वी याहवेहच्या वैभवाने भरलेली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 14:21
16 Iomraidhean Croise  

माझ्या पायांसाठी त्यांनी जाळे मांडले आहे; माझा जीव गळून गेला आहे; माझ्या वाटेत त्यांनी खाच खणली, तिच्यात ते स्वतःच पडले आहेत. (सेला)


त्याचे गौरवयुक्त नाव सदा सुवंदित असो; त्याच्या महिम्याने सर्व पृथ्वी भरो. आमेन! आमेन!


तथापि मी तुला आपले सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर प्रकट व्हावे ह्यासाठीच मी तुला राखले आहे.


आपले डोळे वर कर, चोहोकडे पाहा; ते सर्व एकत्र होऊन तुझ्याकडे येत आहेत. परमेश्वराचे वचन असे आहे की माझ्या जिवाची शपथ, तू खरोखर त्या सर्वांना अलंकाराप्रमाणे लेशील; नववधूप्रमाणे तू त्यांना आपल्या अंगावर घालशील.


ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, “पवित्र! पवित्र! पवित्र सेनाधीश परमेश्वर! अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव आहे.”1


“परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याचा पुत्र कोन्या2 माझ्या उजव्या हातातील मुद्रिकेसारखा असला तरी तेथून मी तुला काढून फेकून देईन.


प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, ही म्हण इस्राएलात ह्यापुढे तुम्हांला वापरायची नाही.


मी मिसर देशाच्या रानात तुमच्या वडिलांबरोबर वाद केला तसा तुमच्याबरोबर वाद करीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, कोणी दुर्जन मरावा ह्यात मला काही संतोष नाही तर त्याने आपल्या मार्गावरून मागे फिरून जगावे ह्यात मला संतोष आहे; फिरा, आपल्या मार्गावरून मागे फिरा; इस्राएल वंशजहो, तुम्ही का मरता?


तू त्यांना सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, उजाड झालेल्या प्रदेशात राहणारे तलवारीने पडतील, उघड्या मैदानात असलेल्यांना मी वनपशूंना खाऊन टाकायला देईन, दुर्गांत व गुहांत राहणारे मरीने मरतील.


प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, तू माझे पवित्रस्थान आपल्या सर्व तिरस्करणीय वस्तूंनी व अमंगळ कर्मांनी भ्रष्ट केले, म्हणून खातरीने मी तुझ्यावरची कृपादृष्टी काढून घेईन; गय करणार नाही, दया करणार नाही.


कारण जल समुद्राला व्यापून टाकते तशी पृथ्वी परमेश्वराच्या प्रतापाच्या ज्ञानाने भरेल.


म्हणून सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, आपल्या जीविताची शपथ वाहून म्हणतो, “मवाब सदोमासारखे निश्‍चये होईल, अम्मोन वंशज गमोर्‍यासारखे होतील; खाजकुयरीचे वतन व मिठागर ही सर्वकाळ वैराण होतील; माझ्या लोकांचे अवशिष्ट जन त्यांना लुटतील; माझ्या राष्ट्रांचे अवशिष्ट राहिलेले लोक त्यांचा ताबा घेतील.”


म्हणून तू त्यांना सांग, परमेश्वर म्हणतो : ‘माझी शपथ, तुमचे म्हणणे माझ्या कानी आले आहे त्याप्रमाणेच मी तुमचे खरोखर करीन;


तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.


मी आपला बाहू आकाशाकडे उभारून म्हणतो, माझ्या सनातन जीविताची शपथ,


Lean sinn:

Sanasan


Sanasan