Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 13:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 तेथे नेफिलीम म्हणजे नेफिली घराण्यातील अनाकाचे वंशज आम्ही पाहिले; त्यांच्यापुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने टोळांसारखे दिसलो आणि त्यांनाही तसेच भासलो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 आम्ही तिथे खूप नेफीलीम म्हणजे नेफीलीम घराण्यातील अनाकाचे वंशज पाहिले. त्यांच्यापुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने नाकतोड्यासारखे असे होतो अशी तुलना केली आणि त्यांच्या दृष्टीनेसुद्धा आम्ही तसेच होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 तिथे आम्ही नेफिलीम (अनाकाचे महाबलाढ्य वंशज नेफिलीम पासून आहेत) लोकांना बघितले. आमच्याच दृष्टीत आम्ही नाकतोड्याप्रमाणे होतो आणि त्यांनाही आम्ही तसेच भासलो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 13:33
17 Iomraidhean Croise  

त्या काळी भूतलावर महाकाय1 होते; पुढे देवपुत्र मानवकन्यांपाशी गेले तेव्हा त्यांना पुत्र झाले. ते प्राचीन काळचे महावीर असून नामांकित पुरुष होऊन गेले.


मग त्याने पाच हात उंचीच्या एका धिप्पाड मिसरी पुरुषाला ठार केले; त्या मिसर्‍याच्या हाती साळ्याच्या तुरीसारखा एक भाला होता; पण बनाया केवळ एक काठी घेऊन त्याच्यावर चालून गेला व त्याने त्या मिसर्‍याच्या हातचा भाला हिसकावून घेऊन त्या भाल्याने त्याचा वध केला.


हाच तो पृथ्वीच्या वरील नभोमंडळावर आरूढ झाला आहे; तिच्यावरील रहिवासी टोळांसमान आहेत; तो आकाश मलमलीप्रमाणे पसरतो, राहण्यासाठी तंबू ताणतात तसे ते तो ताणतो.


ते नेगेब प्रांतातून हेब्रोनास गेले; तेथे अहीमान, शेशय आणि तलमय हे अनाकाचे वंशज राहत होते; हे हेब्रोन मिसरातील सोअनापूर्वी सात वर्षे आधी बांधले होते.


त्या देशाचे रहिवासी मात्र बलवान आहेत आणि तेथील नगरे तटबंदीची असून फार मोठी आहेत; तेथे अनाकाचे वंशजही आम्ही पाहिले.


तेव्हा सर्व मंडळीने गळा काढून विलाप केला आणि लोक रात्रभर रडले.


आम्ही कोठे निघालो आहोत? तेथील लोक आमच्यापेक्षा धिप्पाड व उंच आहेत; तेथील नगरे मोठी असून त्यांचे तट गगनापर्यंत पोहचले आहेत आणि तेथे अनाकाचे वंशज आम्ही पाहिले, असे आमच्या भाऊबंदांनी आम्हांला सांगितले तेव्हा आमच्या हृदयाचे पाणीपाणी झाले.’


(पूर्वी तेथे एमी लोक राहत होते; ते लोक अनाकी लोकांप्रमाणे प्रबळ, पुष्कळ व धिप्पाड होते;


(रेफाई लोकांपैकी शेष राहिला तो फक्‍त बाशानाचा राजा ओग. त्याचा पलंग लोखंडाचा होता; पाहा, तो अम्मोन्यांच्या राब्बा नगरात आहे ना? पुरुषाच्या हाताने त्याची लांबी नऊ हात व रुंदी चार हात आहे.)


तेथील लोक धिप्पाड व उंच असून अनाकी वंशातले आहेत हे तुला माहीतच आहे; ‘अनाकांच्या वंशजांशी कोण सामना करील’ असे म्हणतात हे तू ऐकलेच आहेस.


त्या वेळी यहोशवाने डोंगराळ प्रदेशात जाऊन हेब्रोन, दबीर व अनाब येथे राहणार्‍या आणि यहूदाच्या सबंध डोंगराळ प्रदेशात राहणार्‍या व इस्राएलाच्या सबंध डोंगराळ प्रदेशात राहणार्‍या अनाकी लोकांचा उच्छेद केला; यहोशवाने त्यांचा व त्यांच्या नगरांचा समूळ नाश केला.


तेव्हा परमेश्वराने त्या वेळी म्हटल्याप्रमाणे हा डोंगराळ प्रदेश मला दे; तेथे अनाकी व त्यांची मोठमोठी तटबंदी नगरे आहेत हे तू त्या दिवशी ऐकलेच होते. परमेश्वर माझ्याबरोबर असला तर त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना हाकून देईन.”


कालेबाने शेशय, अहीमान व तलमय ह्या अनाकाच्या तीन वंशजांना तेथून घालवून दिले.


त्या पुरुषाला पाहताच सर्व इस्राएल लोक अत्यंत भयभीत होऊन त्याच्यापुढून पळून गेले.


त्या पलिष्ट्यांनी दाविदाला न्याहाळून पाहिले तेव्हा तो त्याला तुच्छ वाटला, कारण तो केवळ अल्पवयी असून तांबूस रंगाचा व सुकुमार होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan