Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 13:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 ते नेगेब प्रांतातून हेब्रोनास गेले; तेथे अहीमान, शेशय आणि तलमय हे अनाकाचे वंशज राहत होते; हे हेब्रोन मिसरातील सोअनापूर्वी सात वर्षे आधी बांधले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 त्यांनी नेगेबमधून त्या प्रदेशात प्रवेश केला आणि ते हेब्रोनला गेले. हेब्रोन शहर मिसर देशातल्या सोअन शहराच्या सात वर्षे आधी बांधले होते. अहीमान शेशय आणि तलमय हे अनाकाचे वंशज तेथे राहत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 ते वरती नेगेवमधून गेले आणि हेब्रोनात आले, जिथे अहीमान, शेशय आणि तलमय हे अनाकाचे वंशज राहत होते. (हेब्रोन हे इजिप्त देशातील सोअन शहराच्या सात वर्षे आधी बांधले गेले होते.)

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 13:22
21 Iomraidhean Croise  

मग अब्राम मुक्काम करत करत हेब्रोनाजवळ मम्रेच्या एलोन राईत येऊन तेथे आपला डेरा देऊन राहिला; तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली.


सारा ही कनान देशातील किर्याथ-आर्बा म्हणजे हेब्रोन येथे मृत्यू पावली, आणि अब्राहाम तिच्यासाठी शोक व विलाप करायला आला.


ह्यानंतर दाविदाने परमेश्वराला प्रश्‍न विचारला की, “मी यहूदाच्या एखाद्या नगरात जाऊ काय?” परमेश्वराने म्हटले, “जा.” दाविदाने विचारले, “कोणीकडे जाऊ?” त्याने म्हटले, “हेब्रोनास जा.”


हेब्रोनात दाविदाने यहूदाच्या घराण्यावर राज्य केले त्याची मुदत साडेसात वर्षांची होती.


तेव्हा रेफाई वंशातला इशबी-बनोब म्हणून एक इसम होता, त्याच्या भाल्याचे वजन तीनशे शेकेल पितळ भरले; त्याने नवी तलवार कंबरेला बांधली होती; त्याने दाविदाला मारायचा बेत केला;


मिसर देशात सोअनाच्या पटांगणावर त्यांच्या वडिलांसमक्ष त्याने अद्भुत कृत्ये केली.


त्याने मिसर देशात आपली चिन्हे, सोअनाच्या पटांगणावर आपली अद्भुत कृत्ये दाखवली, तो दिवस त्यांनी आठवला नाही.


सोअनाचे सरदार, फारोचे शहाणे मंत्री निवळ मूर्ख बनले आहेत; त्यांची मसलत पशूच्या समान झाली आहे; “मी शहाण्यांचा पुत्र आहे, मी प्राचीन राजांचा वंशज आहे” असे तुम्ही फारोला कसे म्हणता?


सोअनाचे सरदार मूर्ख बनले आहेत; नोफाचे सरदार फसले आहेत; मिसरी गोत्रांची कोनशिला असे जे, त्यांनी मिसराला बहकवले आहे.


त्याचे (यहूदाचे) सरदार सोअनात दाखल झाले आहेत व त्याचे वकील हानेसाला पोहचले आहेत.


मोशेने त्यांना कनान देश हेरायला पाठवताना सांगितले की, “येथून नेगेब प्रांतावरून डोंगराळ प्रदेशात जा;


त्या देशाचे रहिवासी मात्र बलवान आहेत आणि तेथील नगरे तटबंदीची असून फार मोठी आहेत; तेथे अनाकाचे वंशजही आम्ही पाहिले.


तेथे नेफिलीम म्हणजे नेफिली घराण्यातील अनाकाचे वंशज आम्ही पाहिले; त्यांच्यापुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने टोळांसारखे दिसलो आणि त्यांनाही तसेच भासलो.”


तेथील लोक धिप्पाड व उंच असून अनाकी वंशातले आहेत हे तुला माहीतच आहे; ‘अनाकांच्या वंशजांशी कोण सामना करील’ असे म्हणतात हे तू ऐकलेच आहेस.


मग एग्लोन सोडून यहोशवा सर्व इस्राएलासह हेब्रोनावर चढाई करून गेला, आणि ते त्याच्याशी लढले;


अहरोन याजकाच्या वंशजांना, मनुष्यवध करणार्‍यांसाठी शरणपूर म्हणून नेमलेले हेब्रोन व त्याचे गायरान, ह्यांखेरीज लिब्ना व त्याचे गायरान,


मग हेब्रोनात राहणार्‍या कनान्यांवर यहूदा चालून गेला; त्याने शेशय, अहीमन व तलमय ह्यांना ठार केले. हेब्रोनाचे पूर्वीचे नाव किर्याथ-आर्बा होते.


आणि हेब्रोन आदिकरून ज्या ज्या ठिकाणी दावीद आपल्या लोकांसह फिरत असे तेथील आपल्या मित्रांना त्याने लुटीतून भेटी पाठवल्या.


Lean sinn:

Sanasan


Sanasan