Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 13:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 तसेच तेथील जमीन सुपीक आहे की नापीक आहे, त्यात झाडेझुडपे आहेत की नाहीत हे पाहून या. हिम्मत धरा, व त्या देशातली काही फळे घेऊन या.” ते दिवस द्राक्षांच्या पहिल्या बहराचे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 योग्य आहे का? त्या प्रदेशात झाडे आहेत का? तेथील काही फळे बरोबर घेऊन या. ते दिवस द्राक्षाच्या पहिल्या बहराचे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 तेथील जमीन कशी आहे? ती सुपीक आहे की नापीक? त्यात झाडे आहेत की नाही? तुम्ही परत येताना त्या देशातील काही फळे तुमच्याबरोबर घेऊन येण्याचा कसोशीने प्रयत्न करा.” (तो प्रथमपक्व द्राक्षाच्या फळांचा हंगाम होता.)

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 13:20
19 Iomraidhean Croise  

तर आता माझ्या पुत्रा, परमेश्वर तुझ्याबरोबर असो, तू कृतार्थ हो, आणि परमेश्वर तुझा देव तुझ्यासंबंधाने म्हणाला आहे त्याप्रमाणे त्याचे मंदिर बांध.


त्यांनी तटबंदीची नगरे व सुपीक भूमी काबीज केली, आणि उत्तमोत्तम वस्तूंनी भरलेली घरे, खोदलेले हौद, द्राक्षांचे मळे, जैतुनांचे मळे व विपुल फळझाडे ह्यांचा ताबा घेतला; ते खाऊन तृप्त झाले, धष्टपुष्ट झाले आणि तुझ्या अतिशय चांगुलपणामुळे सुख पावले.


त्यांनी आपल्या राज्यात तुझी सेवा केली नाही; तू त्यांचे मोठे कल्याण केलेस, आणि तू त्यांना विस्तृत व सुपीक भूमी दिली, तरीही तुझी सेवा त्यांनी केली नाही आणि आपल्या दुष्कर्मापासून ते परावृत्त झाले नाहीत.


मी त्यांना चांगल्या चरणीत चारीन, त्यांची चरण इस्राएलाच्या उंच पहाडांवर होईल; ते तेथे चांगल्या चरणीत बसतील, इस्राएलाच्या पर्वतांवर त्यांना उत्तम चारा मिळेल.


लोक निर्धास्त असता तो प्रांतातल्या सुपीक स्थलांवर चालून येईल आणि त्याच्या वडिलांनी व त्या वडिलांच्या वडिलांनीही केले नाही ते तो करील; तो लुटीचे धन लोकांना वाटून देईल; काही काळपर्यंत मजबूत किल्ले घेण्याची तो मसलत करील.


कोण ही माझी विपत्ती! उन्हाळ्यातील फळे काढून घेतल्यावर जशी झाडावर काही राहतात, द्राक्षीच्या वेलीवर जसा सरवा राहतो, तसा मी झालो आहे; खायला द्राक्षांचा एक घोसही राहिला नाही; माझ्या जिवाला आवडेल असा पहिल्या बाराचा अंजीर राहिला नाही.


ते राहतात तो देश चांगला आहे की वाईट आहे आणि त्यांच्या वस्तीची नगरे छावणीवजा आहेत की तटबंदीची आहेत,


ती निघाली व पहाडी प्रदेशात गेली आणि अष्कोल नाल्यापर्यंत जाऊन त्यांनी देश हेरला;


त्यांनी त्या देशाची काही फळे बरोबर घेतली आणि खाली आमच्याकडे आणली, आणि त्यांनी अशी खबर आणली की, ‘आपला देव परमेश्वर जो देश आपल्याला देणार आहे तो उत्तम आहे.’


मग परमेश्वराने नूनाचा मुलगा यहोशवा ह्याला अधिकारसूत्रे देऊन म्हटले, “खंबीर हो, हिंमत धर, कारण जो देश मी इस्राएल लोकांना शपथपूर्वक देऊ केला आहे त्यात तुला त्यांना घेऊन जायचे आहे; मी तुझ्याबरोबर असेन.”


म्हणून आपण धैर्याने म्हणतो2 “प्रभू मला साहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?”


खंबीर हो, हिम्मत धर; कारण जो देश ह्या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्याजवळ वाहिली आहे तो तू ह्यांना वतन म्हणून मिळवून देशील.


मी तुला आज्ञा केली आहे ना? खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नकोस, कचरू नकोस; कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल.”


नूनाचा मुलगा यहोशवा ह्याने गुप्तपणे दोन हेर शिट्टीम येथून पाठवले; त्याने त्यांना सांगितले की, “जा आणि तो देश व विशेषत: यरीहो हेरून या.” त्याप्रमाणे ते गेले आणि राहाब नावाच्या वेश्येच्या घरी उतरले.


तेव्हा यरीहोच्या राजाने राहाबेला निरोप पाठवला की, “जे पुरुष तुझ्याकडे येऊन तुझ्या घरात उतरले आहेत त्यांना बाहेर काढ; कारण सार्‍या देशाचा भेद काढण्यासाठी ते आले आहेत.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan