Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 13:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 मोशेने त्यांना कनान देश हेरायला पाठवताना सांगितले की, “येथून नेगेब प्रांतावरून डोंगराळ प्रदेशात जा;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 मोशेने कनान देश हेरण्यास पाठवताना लोकांस सांगितले की तुम्ही येथून नेगेब प्रांतामधून निघा आणि मग डोंगराळ प्रदेशात जा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 जेव्हा मोशे त्यांना कनान देश हेरायाला पाठवित होता तेव्हा तो म्हणाला, “नेगेव-दक्षिण-मधून वर डोंगराळ प्रदेशात जा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 13:17
16 Iomraidhean Croise  

तेथून निघून अब्राम प्रवास करत नेगेबकडे गेला.


अब्राम आपली बायको, आपले सर्वस्व आणि लोट ह्यांना घेऊन मिसर देश सोडून नेगेबकडे गेला.


ऊठ, ह्या देशाची लांबीरुंदी फिरून पाहा, कारण तो मी तुला देणार आहे.”


मग मजला करत करत तो नेगेबपासून बेथेलपर्यंत गेला; बेथेल व आय ह्यांच्या दरम्यान त्याने आरंभी डेरा दिला होता त्या ठिकाणी तो आला.


सिद्दीम खोर्‍यात डांबराच्या खाणी पुष्कळ होत्या; सदोम व गमोरा ह्यांचे राजे पळत असता तेथे पडले व बाकीचे डोंगरात पळाले.


आणि देश कसा आहे, देशातील रहिवासी सबळ आहेत की दुर्बळ आहेत, ते थोडे आहेत की पुष्कळ आहेत,


नेगेब प्रांतात अमालेकी राहतात; डोंगराळ प्रदेशात हित्ती, यबूसी आणि अमोरी हे राहतात; आणि समुद्रकिनार्‍यावर व यार्देनेच्या तीरावर कनानी लोकांची वस्ती आहे.”


मग ते पहाटेस उठले आणि पर्वताच्या शिखरावर चढून म्हणाले, “आम्ही पाप केले आहे, पण आता आम्ही तयार आहोत. परमेश्वराने वचन दिलेल्या ठिकाणी आम्ही जाऊ.”


तेव्हा त्या डोंगराळ प्रदेशात राहणार्‍या अमोर्‍यांनी बाहेर पडून तुमच्याशी सामना करून मधमाश्यांप्रमाणे तुमचा पाठलाग केला, आणि सेईर देशातील हर्मापर्यंत तुम्हांला पिटाळून लावले.


ह्या प्रकारे यहोशवाने त्या सर्व देशाचा म्हणजे डोंगराळ प्रदेश, नेगेब, तळवट व उतरण ह्यांतील सर्व प्रांत आणि त्यांचे राजे ह्यांचा धुव्वा उडवला; कोणालाही जिवंत राहू दिले नाही; इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने आज्ञा केल्याप्रमाणे सर्व प्राण्यांचा त्याने समूळ नाश केला.


ती तशीच अक्रब्बीम नावाच्या चढणीच्या दक्षिणेकडे निघून सीन रानाच्या कडेने कादेश-बर्ण्याच्या दक्षिणेस गेली असून हेस्रोनाजवळून अद्दारावरून जाऊन कर्काकडे वळली आहे;


नूनाचा मुलगा यहोशवा ह्याने गुप्तपणे दोन हेर शिट्टीम येथून पाठवले; त्याने त्यांना सांगितले की, “जा आणि तो देश व विशेषत: यरीहो हेरून या.” त्याप्रमाणे ते गेले आणि राहाब नावाच्या वेश्येच्या घरी उतरले.


ती त्याला म्हणाली, “मला एक देणगी द्या; तुम्ही मला नेगेब प्रदेशात स्थायिक केले आहे तेव्हा मला पाण्याचे झरेही द्या.” तेव्हा कालेबाने तिला उंचावरचे व पायथ्याचे झरे दिले.


यहूदाबरोबर परमेश्वर होता; त्याने डोंगराळ प्रदेश ताब्यात घेतला; पण तळवटीत राहणार्‍या लोकांजवळ लोखंडी रथ असल्याने त्यांना हाकून देणे त्याला जमेना.


नंतर यहूदाचे वंशज डोंगराळ प्रदेश, नेगेब आणि तळवटीचा प्रदेश ह्यांत राहणार्‍या कनान्यांशी लढायला गेले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan