Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 11:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 त्यांच्यामध्ये जो मिश्र समुदाय होता त्याने सोस घेतला; आणि इस्राएल लोकही पुन्हा रडगाणे गाऊन म्हणाले, “आम्हांला खायला मांस कोण देईल?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 जे परराष्ट्रीय इस्राएल लोकाबरोबर राहत होते, त्यांना चांगले अन्न खावेसे वाटू लागले. इस्राएल लोकांनी तक्रार व रडण्यास करण्यास सुरवात केली. “आम्हांला मांस खावयास कोण देईल?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 नंतर त्यांच्याबरोबर असलेले निम्नस्तरातील मिश्र लोक अन्य भोजनाची लालसा धरू लागले आणि इस्राएली लोकही पुन्हा रडत म्हणू लागले, “आम्हाला खायला मांस असते तर किती बरे!

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 11:4
16 Iomraidhean Croise  

नियमशास्त्राचे हे वचन ऐकून त्यांनी इस्राएलातून मिश्र समुदाय निराळा केला.


रानात त्यांची वासना अनावर झाली; ओसाड प्रदेशात त्यांनी देवाची परीक्षा पाहिली.


त्यांच्याबरोबर एक मिश्र समुदायसुद्धा गेला; तशीच शेरडेमेंढरे, गुरेढोरे वगैरे पुष्कळ जनावरे गेली.


“इस्राएल लोकांची कुरकुर मी ऐकली आहे; त्यांना सांग की संध्याकाळी तुम्ही मांस खाल आणि सकाळी पोटभर भाकर खाल, म्हणजे मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्ही जाणाल.”


इस्राएल लोक त्यांना म्हणू लागले की, “आम्ही मिसर देशात मांसाच्या भांड्याभोवती बसून भरपूर जेवत होतो तेव्हा आम्हांला परमेश्वराच्या हातून मरण आले असते तर पुरवले असते; पण ह्या सर्व समुदायाला उपासाने मारावे म्हणून तुम्ही आम्हांला ह्या रानात आणले आहे.”


आणि असे म्हणाल की, ‘नाही, आम्ही मिसर देशात जाऊ, तेथे आमच्या नजरेस युद्ध पडणार नाही, तेथे कर्ण्याचा शब्द आम्हांला ऐकू येणार नाही व भाकरीवाचून आम्ही उपाशी मरणार नाही, आम्ही तेथेच वस्ती करू;’


तू लोकांना सांग की, ‘उद्यासाठी तुम्ही स्वतःला शुद्ध करून घ्या म्हणजे तुम्हांला मांस खायला मिळेल.’ ‘आम्हांला खायला मांस कोण देईल आणि मिसर देशात आम्ही आपले बरे होतो,’ हे तुमचे रडगाणे परमेश्वराच्या कानी गेले आहे, म्हणून परमेश्वर तुम्हांला मांस देणार आहे आणि तुम्ही ते खाल.


तेव्हा सर्व मंडळीने गळा काढून विलाप केला आणि लोक रात्रभर रडले.


आणि ह्या सर्व लोकांनी माझा महिमा आणि मिसर देशात व रानात मी केलेली चिन्हे पाहूनही दहादा माझी परीक्षा पाहिली आणि माझे सांगणे ऐकले नाही;


दुधामधाचे प्रवाह वाहणार्‍या देशातून काढून तू आम्हांला ह्या रानात मारून टाकण्यासाठी आणलेस हे काय थोडे झाले म्हणून तू आमच्यावर अधिकारही गाजवतोस?


तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा, आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका.


ह्या गोष्टी आपल्याला उदाहरणांदाखल झाल्या, अशा हेतूने की, त्यांनी लोभ धरला तसा आपण वाईट गोष्टींचा लोभ धरू नये.


फसू नका, “कुसंगतीने नीती बिघडते.”


नंतर तबेरा, मस्सा व किब्रोथ-हत्तव्वा येथेही तुम्ही परमेश्वराला संतप्त करीत राहिलात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan