गणना 11:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 त्या वेळी दोघे पुरुष मागे छावणीतच राहिले होते, त्यांतील एकाचे नाव एलदाद व दुसर्याचे नाव मेदाद. त्यांच्यावरही आत्मा उतरला. नोंद झालेल्यांपैकी ते होते, पण ते तंबूकडे गेले नव्हते; ते छावणीतच संदेश सांगू लागले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 त्यातील दोन वडील एलदाद व मेदाद छावणीच्या बाहेर गेले नाहीत. त्यांची नांवे वडीलांच्या यादीत होती. परंतु ते छावणीतच राहिले; त्यामुळे आत्मा त्यांच्यावरही आला आणि ते छावणीतच संदेश सांगू लागले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 पण दोघे पुरुष ज्यांची नावे एलदाद व मेदाद छावणीतच राहिले होते. वडिलांच्या यादीत त्यांची नावे होती, परंतु ते बाहेर तंबूकडे गेले नाही. तरी त्यांच्यावरही आत्मा उतरला आणि त्यांनी छावणीतच भविष्यवाणी केली. Faic an caibideil |