Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 11:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 त्यानंतर परमेश्वर मेघात उतरून मोशेशी बोलला आणि त्याच्यावर असणार्‍या आत्म्यातून काही घेऊन त्याने त्या सत्तर वडिलांवर ठेवला; तेव्हा त्यांच्यावर आत्मा येताच ते संदेश सांगू लागले; पण त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा संदेश सांगितला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 मग परमेश्वर ढगात उतरून आला आणि मोशेशी बोलला. मोशेवर परमेश्वराचा आत्मा होता. त्यातून काही घेऊन परमेश्वराने ते त्या सत्तर वडिलावर ठेवला. तो आत्मा आल्यावर ते संदेश सांगू लागले. परंतु त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा संदेश सांगितला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 मग याहवेह मेघातून खाली उतरले व मोशेशी बोलले आणि याहवेहने मोशेवर असलेल्या आत्म्याचे काही सामर्थ्य घेऊन त्या सत्तर वडिलांवर ठेवले. ज्यावेळी आत्मा त्यांच्यावर स्थिर झाला, त्यावेळी त्यांनी भविष्यवाणी केली—परंतु पुन्हा असे केले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 11:25
28 Iomraidhean Croise  

यरीहो येथल्या संदेष्ट्यांचे शिष्य त्याला लांबून पाहून म्हणाले, “एलीयाचा आत्मा अलीशाच्या ठायी उतरला आहे.” त्यांनी सामोरे येऊन त्याला जमिनीपर्यंत लवून नमन केले.


त्याप्रमाणे शिक्षण प्राप्त व्हावे म्हणून तू त्यांना आपला सदात्मा दिलास; त्यांच्या तोंडचा मान्ना तू काढून घेतला नाहीस; आणि त्यांची तृषा शांत करण्यासाठी तू त्यांना पाणी देत राहिलास.


मेघस्तंभांतून तो त्यांच्याशी बोलला; त्याचे निर्बंध व त्याने लावून दिलेले नियम त्यांनी पाळले.


तरी आता तू त्यांच्या पातकांची क्षमा करशील तर म आणि न करशील तर तू लिहिलेल्या पुस्तकातून मला काढून टाक.”


तेव्हा परमेश्वर मेघातून उतरला व तेथे त्याच्याजवळ उभा राहिला, आणि त्याने ‘परमेश्वर’ ह्या नावाची घोषणा केली.


परमेश्वराचा मेघ दिवसा निवासमंडपावर राही आणि रात्री त्यात अग्नी असे; हे असे एकंदर प्रवासात सर्व इस्राएल घराण्याच्या दृष्टीस पडत असे.


मग त्याच्या लोकांना मोशेच्या वेळचे प्राचीन दिवस आठवले; ते म्हणाले, ज्याने त्यांना त्यांच्या कळपांच्या मेंढपाळांसह समुद्रातून बाहेर आणले तो कोठे आहे? ज्याने आपला पवित्रतेचा आत्मा त्यांच्यात घातला तो कोठे आहे?


त्यांच्यापुढे इस्राएल घराण्याच्या वडिलांतले सत्तर पुरुष उभे असून त्यांच्यामध्ये याजन्या बिन शाफान हा उभा होता; त्या प्रत्येक माणसाच्या हाती धुपाटणे होते; तेथे धूपाच्या धुराचा दाट ढग वर जात होता.


मग मी उतरून तेथे तुझ्याशी बोलेन, आणि तुझ्यावर असणार्‍या आत्म्यातून काही घेऊन त्यांच्यावर ठेवीन म्हणजे तुझ्याबरोबर तेही लोकांचा भार वाहतील; मग तुला एकट्यालाच तो वाहावा लागणार नाही.


परमेश्वर मेघस्तंभात उतरला व तंबूच्या दाराजवळ उभा राहिला. त्याने अहरोन व मिर्याम ह्यांना बोलावले; तेव्हा ते दोघे पुढे गेले.


तेव्हा मोशे उठून दाथान व अबीराम ह्यांच्याकडे गेला आणि इस्राएल लोकांचे वडील त्याच्या पाठोपाठ गेले.


बलामाने दृष्टी वर करून पाहिले तर, इस्राएल लोक आपापल्या वंशांप्रमाणे वस्ती करून राहत आहेत असे त्याला दिसले; देवाचा आत्मा त्याच्यावर उतरला.


तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “नूनाचा मुलगा यहोशवा ह्याला घेऊन त्याच्यावर आपला हात ठेव; त्याच्या ठायी माझा आत्मा वसत आहे.


तेव्हा त्यांच्यातील अगब नावाच्या मनुष्याने उठून आत्म्याच्या योगे सुचवले की, सर्व जगात मोठा दुष्काळ पडणार आहे. हा दुष्काळ क्लौद्याच्या वेळेस पडला.


संदेष्ट्यांचे आत्मे संदेष्ट्यांच्या स्वाधीन असतात.


प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे; ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही अशा ज्योतिमंडळाच्या पित्यापासून ते उतरते.


कारण संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही; तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या पवित्र मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे.


त्याच्यावर परमेश्वराचा आत्मा उतरला व तो इस्राएलाचा शास्ता झाला; तो लढाईला निघाला तेव्हा परमेश्वराने अरामाचा राजा कुशन-रिशाथईम ह्याला त्याच्या हाती दिले व त्याच्यावर त्याचे वर्चस्व झाले.


ते टेकडीजवळ आले, तेव्हा पाहा, संदेष्ट्यांचा एक समुदाय त्याला भेटला; आणि देवाचा आत्मा त्याच्यावर सामर्थ्याने आला व तो त्यांच्याबरोबर भाषण करू लागला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan