Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 11:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 मग मी उतरून तेथे तुझ्याशी बोलेन, आणि तुझ्यावर असणार्‍या आत्म्यातून काही घेऊन त्यांच्यावर ठेवीन म्हणजे तुझ्याबरोबर तेही लोकांचा भार वाहतील; मग तुला एकट्यालाच तो वाहावा लागणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 मग मी खाली येऊन तेथे तुझ्याशी बोलेन. मग तुझ्यावर असलेल्या आत्म्यातून काही भाग मी त्यांनाही देईन. मग लोकांची काळजी घेण्यास ते तुला मदत करतील. ह्याप्रकारे इस्राएल लोकांची जबाबदारी केवळ तुझ्या एकट्यावर राहणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 मी खाली येऊन तिथे तुझ्याशी बोलेन आणि जो आत्मा तुझ्यावर आहे, त्याचे काही सामर्थ्य मी घेऊन त्यांच्यावर ठेवेन. ते तुझ्याबरोबर लोकांचा भार वाहतील म्हणजे तुला एकट्याला तो वाहावा लागणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 11:17
32 Iomraidhean Croise  

तेव्हा मानवपुत्र नगर व बुरूज बांधत होते ते पाहण्यास परमेश्वर उतरला.


मग अब्राहामाशी बोलणे संपवल्यावर देव त्याला सोडून वर गेला.


तेव्हा अब्राम उपडा पडला, आणि देव त्याच्याशी बोलला; तो म्हणाला :


मग अब्राहामाशी बोलणे संपवल्यावर परमेश्वर निघून गेला, आणि अब्राहाम आपल्या ठिकाणी परत आला.


यरीहो येथल्या संदेष्ट्यांचे शिष्य त्याला लांबून पाहून म्हणाले, “एलीयाचा आत्मा अलीशाच्या ठायी उतरला आहे.” त्यांनी सामोरे येऊन त्याला जमिनीपर्यंत लवून नमन केले.


ते पलीकडे गेल्यावर एलीया अलीशाला म्हणाला, “मला तुझ्यापासून नेण्यात येण्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करू ते मला सांग.” अलीशा म्हणाला, “आपल्या ठायी असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या ठायी यावा.”


त्याप्रमाणे शिक्षण प्राप्त व्हावे म्हणून तू त्यांना आपला सदात्मा दिलास; त्यांच्या तोंडचा मान्ना तू काढून घेतला नाहीस; आणि त्यांची तृषा शांत करण्यासाठी तू त्यांना पाणी देत राहिलास.


तू व तुझ्याबरोबरचे लोक अशाने अगदी झिजून जाल. हे काम तुला फार भारी आहे, तुला एकट्याला हे करवणार नाही.


त्यांनी प्रत्येक वेळी लोकांचा न्यायनिवाडा करावा; त्यांनी सर्व मोठी प्रकरणे तुझ्याकडे आणावीत आणि लहानसहान प्रकरणांचा त्यांनीच निकाल करावा. अशाने तुझे काम हलके होईल व ते तुझ्या भाराचे वाटेकरी होतील.


तिसरा दिवस येईपर्यंत त्यांनी तयार राहावे, कारण तिसर्‍या दिवशी सर्व लोकांदेखत परमेश्वर सीनाय पर्वतावर उतरेल.


परमेश्वराने सीनाय पर्वताच्या शिखरावर उतरून मोशेला पर्वताच्या शिखरावर बोलावले, तेव्हा तो वर गेला.


तेव्हा परमेश्वर मेघातून उतरला व तेथे त्याच्याजवळ उभा राहिला, आणि त्याने ‘परमेश्वर’ ह्या नावाची घोषणा केली.


कारण मी तृषित भूमीवर पाणी आणि रुक्ष भूमीवर जलधारा ओतीन; मी तुझ्या संतानावर माझ्या आत्म्याची व तुझ्या संततीवर माझ्या आशीर्वादाची वृष्टी करीन.


मग त्याच्या लोकांना मोशेच्या वेळचे प्राचीन दिवस आठवले; ते म्हणाले, ज्याने त्यांना त्यांच्या कळपांच्या मेंढपाळांसह समुद्रातून बाहेर आणले तो कोठे आहे? ज्याने आपला पवित्रतेचा आत्मा त्यांच्यात घातला तो कोठे आहे?


ह्यानंतर असे होईल की, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन; तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणांना दृष्टान्त होतील.


त्यानंतर परमेश्वर मेघात उतरून मोशेशी बोलला आणि त्याच्यावर असणार्‍या आत्म्यातून काही घेऊन त्याने त्या सत्तर वडिलांवर ठेवला; तेव्हा त्यांच्यावर आत्मा येताच ते संदेश सांगू लागले; पण त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा संदेश सांगितला नाही.


परमेश्वर मेघस्तंभात उतरला व तंबूच्या दाराजवळ उभा राहिला. त्याने अहरोन व मिर्याम ह्यांना बोलावले; तेव्हा ते दोघे पुढे गेले.


मी त्याच्याशी स्पष्टपणे तोंडोतोंड बोलत असतो, गूढ अर्थाने बोलत नसतो; परमेश्वराचे स्वरूप तो पाहत असतो; तर माझा सेवक मोशे ह्याच्याविरुद्ध बोलायला तुम्हांला भीती कशी नाही वाटली?”


तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “नूनाचा मुलगा यहोशवा ह्याला घेऊन त्याच्यावर आपला हात ठेव; त्याच्या ठायी माझा आत्मा वसत आहे.


मोशे परमेश्वराशी बोलण्यास दर्शनमंडपात गेला तेव्हा साक्षपटाच्या कोशावर असलेल्या दयासनावरून म्हणजे दोन्ही करूबांमधून झालेली वाणी त्याने ऐकली; ह्या प्रकारे तो त्याच्याशी बोलला.


स्वर्गातून उतरलेला [व स्वर्गात असलेला] जो मनुष्याचा पुत्र त्याच्यावाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही.


(ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता, त्याच्याविषयी त्याने हे म्हटले; तोपर्यंत पवित्र आत्मा दिलेला नव्हता; कारण येशूचा तोपर्यंत गौरव झाला नव्हता.)


परंतु तुमच्यामध्ये जर देवाचा आत्मा वसती करत आहे, तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही.


आपल्याला जगाचा आत्मा नव्हे, तर देवापासून निघणारा आत्मात्मा मिळाला आहे; ह्यासाठी की, जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे.


म्हणून जो कोणी अव्हेर करतो तो माणसाचा नव्हे, तर तुम्हांला आपला पवित्र आत्मा देणारा देव ह्याचा अव्हेर करतो.


निर्दंभ बंधुप्रेमासाठी तुम्ही आपले जीव सत्याच्या पालनाने आत्म्याच्या द्वारे शुद्ध करून घेतले आहेत, म्हणून एकमेकांवर मनापासून निष्ठेने प्रीती करा.


ती फूट पाडणारी, देहबुद्धीची, ज्यांना पवित्र आत्मा नाही अशी आहेत.


तेव्हा परमेश्वराचा आत्मा तुझ्यावर सामर्थ्याने येईल. व तूही त्यांच्याबरोबर भाषण करू लागशील आणि तुझ्यात बदल होऊन तू निराळा मनुष्य होशील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan