Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 10:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तुमच्या देशात तुमच्यावर जुलूम करणार्‍या शत्रूंशी तुम्ही लढायला निघाल तेव्हा तुम्ही कर्ण्यांचा मोठा गजर करा; म्हणजे तुमचा देव परमेश्वर ह्याला तुमची आठवण होईल आणि तुमच्या शत्रूंपासून तुमचा बचाव होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तुम्ही जेव्हा तुमच्या देशात तुम्हावर जुलूम करणाऱ्या शत्रूविरूद्ध लढायला जाता, मग तेव्हा तुम्ही कर्ण्याचा गजर करा. मी, परमेश्वर, तुमचा देव तुमची आठवण करीन आणि तुमच्या शत्रूपासून तुमचे रक्षण करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 जेव्हा तुम्ही तुमच्याच देशात तुमच्यावर जुलूम करणार्‍या तुमच्या शत्रूविरुद्ध युद्ध करण्यास जाता, तेव्हा तुम्ही कर्ण्याचा गजर करा. तेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर तुमचे स्मरण करतील व तुमच्या शत्रूपासून तुम्हाला सोडविले जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 10:9
34 Iomraidhean Croise  

मग देवाने नोहा व तारवात त्याच्याबरोबर असलेले वनपशू आणि ग्रामपशू ह्या सर्वांची आठवण केली; देवाने पृथ्वीवर वारा वाहवला तेव्हा पाणी ओसरू लागले;


पाहा, आमच्याबरोबर, आमच्यापुढे देव आहे; तुमच्याविरुद्ध लोकांना इशारा देण्यासाठी त्याचे याजक कर्णे हाती घेऊन असतात. इस्राएल लोकहो, तुम्ही आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याच्याशी लढू नका; तुम्हांला यश यायचे नाही.”


यहूदी लोकांनी मागे वळून पाहिले तर आपल्यापुढे व मागे युद्ध होणार असे त्यांना दिसून आले, तेव्हा त्यांनी परमेश्वराचा धावा केला आणि याजक कर्णे वाजवू लागले.


हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांवर प्रसन्न होतोस, तेव्हा माझी आठवण कर; माझ्या उद्धारार्थ मला दर्शन दे;


त्यांच्या शत्रूंनी त्यांना छळले; ते त्यांच्या हाताखाली दडपून गेले.


ज्याने आमच्या दैन्यावस्थेत आमची आठवण केली त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.


अहो भूतलवासी अखिल जनहो, पृथ्वीवरील रहिवाशांनो, पर्वतांवर ध्वज उभारण्यात येईल तेव्हा तुम्ही पाहा; तुतारी वाजवण्यात येईल तेव्हा ऐका.


“कंठरव कर, कसर करू नकोस; आपला स्वर कर्ण्याप्रमाणे मोठा कर; माझ्या लोकांना त्यांचे अपराध, याकोबाच्या घराण्यास त्याची पातके विदित कर.


माझी आतडी तुटतात हो तुटतात! माझ्या हृदयकोशास वेदना होत आहेत! माझे अंतर्याम अस्वस्थ झाले आहे! माझ्याने स्तब्ध राहवत नाही! कारण माझ्या जिवा, कर्ण्याचा नाद, रणशब्द तू ऐकला आहेस.


मी ध्वजा कोठवर पाहू? कर्ण्याचा शब्द कोठवर ऐकू?


यहूदात पुकारा, यरुशलेमेत जाहीर करा, आणि म्हणा की, “देशात रणशिंग फुंका; जोराने ओरडून म्हणा, ‘एकत्र व्हा, चला, आपण तटबंदीच्या नगरात जाऊ.’


ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत अम्मोन्यांचा राब्बा नगराविरुद्ध मी रणशब्द ऐकायला लावीन; ते नासाडीचा ढिगार होईल, तिच्या कन्यांना अग्नीने जाळतील; इस्राएल आपले वारस झालेल्यांचा वारस होईल, असे परमेश्वर म्हणतो.


बन्यामीनवंशजहो, यरुशलेमेतून रक्षणार्थ पळून जा, तकोवात रणशिंग फुंका, बेथ-हक्करेमावर ध्वज उभारा; कारण उत्तरेकडून अरिष्ट व मोठा नाश डोकावत आहे.


मी तुमच्यावर पहारेकरी ठेवून तुम्हांला म्हटले, ‘रणशिंगाचा शब्द ऐका;’ पण ते म्हणाले, ‘आम्ही ऐकत नाही.’


ते कर्णा वाजवतात, सर्व तयारी करतात, तरी कोणी युद्धास पुढे सरसावत नाहीत; कारण त्या समूहावर माझा कोप झाला आहे.


गिबात शिंग फुंका, रामात कर्णा वाजवा; तुझ्यामागे, हे बन्यामिना! असा रणशब्द बेथ-आवेन येथे करा.


“इस्राएल लोकांना सांग : सातव्या महिन्याची प्रतिपदा तुम्हांला परमविश्रामाची असावी; स्मरण देण्यासाठी त्या दिवशी रणशिंगे फुंकावीत व पवित्र मेळा भरवावा.


नगरात रणशिंग वाजवल्यास लोक घाबरायचे नाहीत काय? नगरावर विपत्ती आली असून ती परमेश्वराने आणली नाही असे होईल काय?


तटबंदीच्या नगरांविरुद्ध व उंच बुरुजांविरुद्ध रणशिंगाचा व रणशब्दाचा हा दिवस आहे.


मोशेने प्रत्येक वंशातले एक हजार पुरुष घेऊन त्यांना आणि एलाजार याजकाचा मुलगा फीनहास ह्याला लढाईला पाठवले; आणि पवित्रस्थानातली पात्रे आणि इशारा देण्यासाठी रणशिंगे त्याच्या हवाली केली.


तसेच कर्णा अस्पष्ट नाद काढील, तर लढाईस जाण्याची तयारी कोण करील?


तू आपल्या शत्रूंशी युद्ध करायला जाशील तेव्हा घोडे, रथ व तुझ्यापेक्षा मोठे सैन्य तुझ्या दृष्टीस पडल्यास त्यांना भिऊ नकोस, कारण तुझा देव परमेश्वर ज्याने तुला मिसर देशातून आणले तो तुझ्याबरोबर आहे.


रणशिंगे फुंकली जात असताना त्यांचा दीर्घनाद कानी पडताच सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा, म्हणजे नगराचा तट जागच्या जागी कोसळेल; मग तुम्ही प्रत्येकाने सरळ आत चालून जावे.”


तसेच सीदोनी, अमालेकी व मिद्यानी ह्यांनी तुम्हांला हैराण केले तेव्हा तुम्ही माझा धावा केला आणि मी तुम्हांला त्यांच्या हातून सोडवले, नाही का?


यार्देनेच्या पलीकडे अमोर्‍यांच्या देशातील गिलाद प्रांतात राहणार्‍या सर्व इस्राएल लोकांना त्यांनी तेव्हापासून अठरा वर्षे हैराण करून त्यांच्यावर जुलूम केला.


जेव्हा जेव्हा परमेश्वर त्यांच्यासाठी शास्ते उभे करी तेव्हा तेव्हा त्या प्रत्येकाबरोबर परमेश्वर असे आणि त्या शास्त्यांच्या हयातीत तो त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हातून वाचवत असे; कारण त्यांच्यावर लोक जुलूम करत व त्यांना गांजत; ह्यामुळे ते कण्हत असत; म्हणून परमेश्वराला त्यांची कीव येई.


तेथे गेल्यावर त्याने एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात रणशिंग फुंकले, तेव्हा त्याच्याबरोबर इस्राएल लोक डोंगराळ प्रदेशातून उतरले, आणि तो त्यांच्यापुढे चालला.


परमेश्वराच्या आत्म्याने गिदोनाच्या ठायी संचार केला, तेव्हा त्याने रणशिंग फुंकले आणि अबियेजेरी त्याला येऊन मिळाले.


मिसर्‍यांच्या आणि जे कोणी तुम्हांला गांजत होते त्या सर्वांच्या हातून तुम्हांला सोडवले आणि त्यांना तुमच्यापुढून घालवून देऊन त्यांचा देश तुम्हांला दिला;


तो इस्राएल लोकांना म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर असे म्हणतो, मी इस्राएलास मिसर देशातून बाहेर आणले आणि तुम्हांला मिसरी लोकांच्या हातांतून व तुम्हांला गांजणार्‍या सर्व राष्ट्रांच्या हातातून सोडवले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan