Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 10:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 मग इस्राएल लोक परमेश्वराच्या पर्वतापासून मार्गस्थ होऊन तीन दिवसांची वाट चालून गेले; त्यांच्यासाठी मुक्कामाची जागा हेरण्याकरता परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्यापुढे त्या तीन दिवसांच्या प्रवासात होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 परमेश्वराच्या पर्वतापासून तीन दिवसाचा प्रवास करीत गेले. परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्या विसाव्यासाठी जागा शोधायला तीन दिवसाच्या वाटेवर त्यांच्यापुढे गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 मग ते याहवेहचे पर्वत म्हणजेच सीनाय पर्वतापासून निघाले व तीन दिवसांचा प्रवास करीत गेले. याहवेहच्या कराराचा कोश त्यांच्या विसाव्याचे ठिकाण पाहण्यासाठी त्या तीन दिवसांचा प्रवास करीत त्यांच्यापुढे गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 10:33
25 Iomraidhean Croise  

म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या विसाव्यात निश्‍चित येणार नाहीत.


तेव्हा मोशे देवाकडे वर गेला; आणि परमेश्वराने त्याला पर्वतातून हाक मारून सांगितले की, “याकोबाच्या घराण्याला हे सांग, इस्राएल लोकांना हे विदित कर.


मोशे आपला सासरा मिद्यानी याजक इथ्रो ह्याची शेरडेमेंढरे चारत होता आणि तो आपला कळप रानाच्या पिछाडीस देवाचा डोंगर होरेब येथवर घेऊन गेला.


त्या दिवशी असे होईल की राष्ट्रांसाठी ध्वजवत उभारलेल्या इशायाच्या धुमार्‍याला राष्ट्रे शरण येतील; त्याचे निवासस्थान गौरवयुक्त होईल.


तो त्यांना म्हणाला होता, “ही विश्रांती आहे, भागलेल्यास विसावा द्या; त्याने त्याला आराम होईल,” तरी ते ऐकतना.


परमेश्वर म्हणतो, “आकाश माझे सिंहासन व पृथ्वी माझे पादासन आहे; तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? मला विश्रांतीसाठी कोणते स्थळ असणार?”


परमेश्वर म्हणतो, तुम्ही वाढून देशात बहुगुणित व्हाल त्या काळी ‘परमेश्वराच्या कराराचा कोश’ असे ते ह्यापुढे म्हणणार नाहीत, तो त्यांच्या ध्यानीही येणार नाही, त्यांना तो आठवणारही नाही, ते त्याची खंत करणार नाहीत, आणि तो पुन्हा बनवणार नाहीत.


परमेश्वर म्हणतो, “तलवारीपासून निभाव-लेल्या लोकांना रानात अनुग्रह मिळाला; ह्या इस्राएलास विश्रांती देण्यास मला जाणे आहे.


परमेश्वर म्हणतो, “चवाठ्यावर उभे राहून पाहा आणि पुरातन मार्गांपैकी कोणता म्हणून विचारा; सन्मार्गाने चाला; अशाने तुमच्या जिवास विश्रांती मिळेल;” पण ते म्हणाले, ‘आम्ही चालणार नाही.’


त्या दिवशी मी हात उचलून त्यांच्याबरोबर शपथ केली की, मी तुम्हांला मिसर देशातून काढून दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत अशा तुमच्यासाठी पाहिलेल्या देशात आणीन; तो देश सर्व देशांचा मुकुटमणी होय.


तेव्हा इस्राएल लोकांनी सीनाय रानातून आपापल्या टप्प्याप्रमाणे कूच केले; नंतर मेघ पारानाच्या रानात स्थिर झाला.


तुमच्यासाठी वाटेत तळ देण्याचे ठिकाण शोधण्यास आणि रात्री अग्नीत व दिवसा मेघात प्रकट होऊन, ज्या वाटेने तुम्ही जायचे ती वाट तुम्हांला दाखवण्यास तो तुमच्यापुढे चालला.


“नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुमचा देव परमेश्वर ह्याच्या कराराच्या कोशाच्या आत एका बाजूला ठेवा म्हणजे तो तेथे तुमच्याविरुद्ध साक्षीदार म्हणून राहील,


दगडी पाट्या म्हणजे परमेश्वराने तुमच्याशी केलेल्या कराराच्या पाट्या घेण्यासाठी मी पर्वतावर चढून गेलो, तेव्हा मी तेथे चाळीस दिवस व चाळीस रात्री राहिलो; त्या अवधीत मी भाकर खाल्ली नाही आणि पाणीही प्यालो नाही.


आता ज्या शांतीच्या देवाने ‘सर्वकाळच्या कराराच्या रक्ताने मेंढरांचा’ महान ‘मेंढपाळ’ आपला प्रभू येशू, ह्याला मेलेल्यांतून ‘परत आणले,’


तेव्हा त्यांना तुम्ही सांगा की, यार्देनेचे पाणी परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे दुभंगले; तो यार्देनेतून पलीकडे जात असताना तिच्या पाण्याचे दोन भाग झाले. अशा प्रकारे हे धोंडे इस्राएल लोकांसाठी कायमचे स्मारक होतील.”


ह्यानंतर इस्राएल लोकांनी परमेश्वराला प्रश्‍न केला. (कारण त्या दिवसांत देवाच्या कराराचा कोश तेथेच होता.


लोक छावणीत परत आले तेव्हा इस्राएलाचे वडील जन म्हणू लागले, “परमेश्वराने आज आमचा पलिष्ट्यांकडून पराभव का होऊ दिला? तर परमेश्वराच्या कराराचा कोश शिलोहून आपण आणू या; तो आपल्यामध्ये आला तर शत्रूच्या हातातून आपला बचाव होईल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan