Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 10:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 मोशेने आपला सासरा मिद्यानी रगुवेल ह्याचा मुलगा होबाब ह्याला म्हटले, “परमेश्वराने आम्हांला देऊ केलेल्या प्रदेशाकडे आम्ही जात आहोत, तर तू आमच्याबरोबर चल म्हणजे आम्ही तुझे कल्याण करू; ‘कारण इस्राएलाचे कल्याण करीन’ असे परमेश्वर बोलला आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 मोशेने आपला सासरा मिद्यानी रगुवेल ह्याचा मुलगा होबाब ह्याच्याशी बोलला. रगुवेल मोशेच्या पत्नीचा पिता होता. मोशे होबेबाशी बोलला व म्हणाला, “परमेश्वराने वर्णन केलेल्या देशात आम्ही जात आहोत. तो देश देण्याचे परमेश्वराने आम्हास वचन दिले आहे. तू आमच्याबरोबर ये आणि आम्ही तुझे चांगले करू. परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी चांगले करण्याचे वचन दिले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 आणि मोशेचा सासरा मिद्यानी रऊएलचा पुत्र होबाबला मोशे म्हणाला, “आम्ही त्या ठिकाणाकडे जात आहोत, ज्याविषयी याहवेहने सांगितले की, ‘मी ते तुम्हाला देईन.’ तू आमच्याबरोबर ये आणि आम्ही तुला चांगली वागणूक देऊ, कारण याहवेहने इस्राएली लोकांना उत्तम गोष्टींविषयी अभिवचन दिले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 10:29
31 Iomraidhean Croise  

परमेश्वर अब्रामाला दर्शन देऊन म्हणाला, “हा देश मी तुझ्या संतानाला देणार.” परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून त्याने तेथे परमेश्वराची एक वेदी बांधली.


कारण जो हा सर्व देश तुला दिसत आहे तो तुला व तुझ्या संततीला मी कायमचा देईन.


त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार करून सांगितले, “मिसराच्या1 नदीपासून ते महानदी फरात येथ-पर्यंतचा प्रदेश मी तुझ्या संतानास देतो.


ह्या ज्या कनान देशात तू उपरा आहेस, तो सगळा देश मी तुला व तुझ्या पश्‍चात तुझ्या संतानाला कायमचा वतन म्हणून देईन आणि मी त्यांचा देव राहीन.”


तू मला वचन दिले आहेस की, मी तुझे निश्‍चित कल्याण करीन, आणि तुझी संतती समुद्राच्या वाळूसारखी संख्येने अगणित करीन.”


अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, परमेश्वराचा जयजयकार करा,


परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा; जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य!


याहो या, आपण परमेश्वराचा जयजयकार करू; आपल्या तारणदुर्गाचा जयजयकार करू.


देवाने मोशे व आपली प्रजा इस्राएल ह्यांच्यासाठी काय काय केले, परमेश्वराने इस्राएलास मिसर देशातून कसे बाहेर आणले हे मोशेचा सासरा मिद्यानाचा याजक इथ्रो ह्याने ऐकले.


मग मोशेचा सासरा इथ्रो ह्याने देवाला होमबली अर्पण केले व यज्ञ केले; आणि अहरोन इस्राएलांच्या सर्व वडिलांसह मोशेचा सासरा इथ्रो ह्याच्याबरोबर देवासमोर भोजन करायला आला.


मग मोशेने आपल्या सासर्‍याला निरोप दिला आणि तो आपल्या देशाला निघून गेला.


त्या आपला बाप रगुवेल ह्याच्याकडे आल्या तेव्हा तो म्हणाला, “आज तुम्ही लवकर कशा आलात?”


आणि मोशे त्या मनुष्याजवळ राहण्यास कबूल झाला; त्याने मोशेला आपली मुलगी सिप्पोरा दिली.


मोशे आपला सासरा मिद्यानी याजक इथ्रो ह्याची शेरडेमेंढरे चारत होता आणि तो आपला कळप रानाच्या पिछाडीस देवाचा डोंगर होरेब येथवर घेऊन गेला.


त्यांना मिसरी लोकांच्या हातातून सोडवावे, आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत अशा देशात, म्हणजे कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांच्या देशात त्यांना घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे.


ज्या कनान देशात ते उपरे होते तो परदेश त्यांना वतन देण्याविषयीचा करार मी त्यांच्याशी केला आहे;


देशादेशांतील लोकांच्या झुंडी जातील व म्हणतील, “चला, आपण परमेश्वराच्या पर्वतावर याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ; तो आम्हांला आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू.” कारण सीयोनेतून नियमशास्त्र व यरुशलेमेतून परमेश्वराचे वचन निघेल.


ते सीयोनाची वाट विचारतील, आपली तोंडे इकडल्या रस्त्यांकडे करून म्हणतील, ‘चला, शाश्वत व चिरस्मरणीय अशा कराराने आपण परमेश्वराबरोबर मिलाफ करू.’


ह्या प्रकारे इस्राएल लोक आपापल्या दलाच्या अनुक्रमाने प्रवासात कूच करीत.


“बालाका, ऊठ, ऐकून घे; सिप्पोरपुत्रा, माझ्याकडे कान दे. देव काही मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी; तो काही मानवपुत्र नाही की त्याने अनुताप करावा; दिलेले वचन तो पाळणार नाही काय? दिलेला शब्द तो पुरा करणार नाही काय?


पण त्यात त्याला वतन ‘दिले नाही, पाऊलभरदेखील जमीन दिली नाही;’ त्याला मूलबाळ नव्हते तरी हा देश ‘त्याचा व त्याच्यामागे त्याच्या संततीच्या स्वाधीन कायमचा करण्याचे’ अभिवचन देवाने त्याला दिले.


तुझे पूर्वज ज्या देशाचे वतनदार होते त्यात तुझा देव परमेश्वर तुला आणील आणि तू त्या देशाचा वतनदार होशील; तो तुझ्या पूर्वजांपेक्षा तुझे अधिक कल्याण करील आणि तुला अधिक बहुगुणित करील.


तुझे व तुझ्यामागून तुझ्या वंशजांचे बरे व्हावे, आणि तुझा देव परमेश्वर जो देश तुला निरंतरचा देत आहे त्यात तू चिरकाळ राहावेस म्हणून आज मी तुला देत असलेले विधी आणि आज्ञा ह्यांचे पालन कर.”


जे युगानुयुगाचे जीवन सत्यप्रतिज्ञ देवाने युगाच्या काळापूर्वी देऊ केले आणि त्याविषयीचे वचन त्याच आपल्या तारणार्‍या देवाच्या आज्ञेने मला सोपवलेल्या घोषणेत यथाकाळी त्याने प्रकट केले,


ह्यासाठी की, जे आपण, स्वतःपुढे ठेवण्यात आलेली आशा हस्तगत करण्याकरता आश्रयाला धावलो, त्या आपणांला ज्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे अशा दोन अचल गोष्टींच्या द्वारे चांगले उत्तेजन मिळावे.


आत्मा व वधू म्हणतात, “ये,” ऐकणाराही म्हणो, “ये.” आणि ‘तान्हेला येवो;’ ज्याला पाहिजे तो ‘जीवनाचे पाणी फुकट’ घेवो.


मोशेचा सासरा2 केनी ह्याचे वंशज यहूदाच्या वंशजांसहित खजुरीच्या नगराहून यहूदाच्या रानात गेले; हे रान अरादाजवळील नेगेबात आहे; तेथे जाऊन ते त्या लोकांबरोबर राहिले.


मोशेचा सासरा1 होबाब ह्याचे वंशज जे केनी त्यांच्यापासून केनी हेबेर हा विभक्त होऊन केदेशाजवळचे साननीम येथल्या एका एला वृक्षाखाली डेरा देऊन राहिला होता.


शौल केनी लोकांना म्हणाला, “तुम्ही अमालेक्यांमधून निघून जा, नाहीतर त्यांच्याबरोबर तुमचाही संहार व्हायचा; कारण इस्राएल लोक मिसरातून आले तेव्हा तुम्ही त्यांच्याशी स्नेहभावाने वर्तला.” ह्यावरून केनी अमालेक्यांतून निघून गेले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan