Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 10:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 आपल्या आनंदाच्या दिवशी, नेमलेल्या सणांच्या दिवशी आणि प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेस आपले होमबली व शांत्यर्पणाचे बली अर्पण करत असताना हे कर्णे वाजवावेत; ते तुमच्या देवाला तुमची आठवण करून देतील; मी परमेश्वर तुमचा देव आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 तसेच तुम्ही आनंदाच्या प्रसंगी, तुमचे दोन्ही नियमीत सण व महिन्याच्या सुरवातीच्या दिवशी तुमची होमार्पणाच्या, शांत्यर्पणाच्या यज्ञांच्या सन्मानासाठी तुम्ही कर्णे वाजवावेत. तुमच्या परमेश्वरास तुमची आठवण करून देण्याची ही एक कृती आहे. हे तुम्ही करावे अशी मी तुम्हास आज्ञा देतो. मी तुमचा देव परमेश्वर आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 तुमच्या आनंदाच्या प्रसंगी; तुमचे नेमलेले सण व महिन्याच्या आरंभीची मेजवानी, जेव्हा तुम्ही आपली होमार्पणे व शांत्यर्पणे आणता, त्यावेळी सुद्धा तुम्ही कर्णे वाजवा आणि ते याहवेहसमोर तुमच्यासाठी स्मरणार्थ असेल. मीच याहवेह तुमचा परमेश्वर आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 10:10
34 Iomraidhean Croise  

तो म्हणाला, “तू आज त्याच्याकडे का चाललीस? आज काही चंद्रदर्शन किंवा शब्बाथ नाही.” ती म्हणाली, “काही चिंता नाही.”


शबन्या, योशाफाट, नथानेल, अमासय, जखर्‍या, बनाया व अलियेजर हे याजक देवाच्या कोशापुढे कर्णे वाजवीत; ओबेद-अदोम व यहीया हे कोशाचे द्वारपाळ होते.


ह्या प्रकारे सगळ्या इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या कराराचा कोश जयजयकार करीत, रणशिंग, कर्णे व झांजा वाजवीत आणि सतारी व वीणा ह्यांचा नाद काढत समारंभाने वर आणला.


त्यांच्याबरोबर हेमान व यदूथून कर्णे, झांजा व इतर वाद्ये वाजवून देवाप्रीत्यर्थ गायनवादन करीत; यदूथूनाच्या पुत्रांना द्वारपाळ केले.


दाविदाची वाद्ये घेऊन लेवी उभे राहिले व याजक कर्णे घेऊन उभे राहिले.


सर्व मंडळी आराधना करू लागली, गायक गाऊ लागले व कर्णेकरी कर्णे वाजवू लागले; होमार्पणाची समाप्ती होईपर्यंत हे सर्व चालले होते.


याजक आपापल्या स्थानी उभे राहिले; परमेश्वराची दया सनातन आहे असे लेव्यांच्या द्वारे परमेश्वराचे उपकारस्मरण करण्यासाठी जी वाद्ये दावीद राजाने परमेश्वराप्रीत्यर्थ केली होती ती घेऊन लेवीही उभे राहिले; त्यांच्यापुढे याजक कर्णे वाजवू लागले आणि सर्व इस्राएल लोक उभे राहिले.


बांधकाम करणार्‍यांनी परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला तेव्हा इस्राएलाचा राजा दावीद ह्याने लावून दिलेल्या क्रमाप्रमाणे परमेश्वराचे स्तवन करण्यास आपले पोशाख ल्यालेले व हाती कर्णे घेतलेले याजक आणि हाती झांजा घेतलेले आसाफ वंशातले लेवी ह्यांना उभे केले.


व कित्येक याजकांचे पुत्र कर्णे घेऊन चालले; जखर्‍या बिन योनाथान बिन शमया बिन मत्तन्या बिन मीखाया बिन जक्कूर बिन आसाफ,


कर्णा वाजवून त्याचे स्तवन करा. सतार व वीणा वाजवून त्याचे स्तवन करा.


शुक्ल प्रतिपदेस, पौर्णिमेस, आमच्या सणाच्या दिवशी कर्णा वाजवा.


कारण हा इस्राएलासाठी नियम आहे; हा याकोबाच्या देवाचा निर्बंध आहे.


ज्या लोकांना उत्साहशब्दाचा परिचय आहे ते धन्य! हे परमेश्वरा, ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात.


अहरोन पवित्रस्थानी प्रवेश करील तेव्हा तो न्यायाच्या ऊरपटावर, म्हणजे आपल्या हृदयावर इस्राएलाच्या मुलांची नावे धारण करील व त्यायोगे परमेश्वरासमोर त्यांचे स्मरण नित्य राहील.


इस्राएल लोकांपासून प्रायश्‍चित्ताचा पैसा घेऊन दर्शनमंडपातील सेवेला लावावा आणि हा पैसा इस्राएल लोकांच्या जिवाबद्दल प्रायश्‍चित्त दिल्याचे स्मारक म्हणून त्यांच्याप्रीत्यर्थ परमेश्वरासमोर राहील.”


त्या दिवशी असे होईल की एक मोठा कर्णा वाजेल; तेव्हा अश्शूर देशात गडप झालेले व मिसर देशात परागंदा झालेले लोक येतील आणि यरुशलेमेतील पवित्र डोंगरावर परमेश्वराला दंडवत घालतील.


“इस्राएल लोकांना सांग : सातव्या महिन्याची प्रतिपदा तुम्हांला परमविश्रामाची असावी; स्मरण देण्यासाठी त्या दिवशी रणशिंगे फुंकावीत व पवित्र मेळा भरवावा.


तुमच्या देशात तुमच्यावर जुलूम करणार्‍या शत्रूंशी तुम्ही लढायला निघाल तेव्हा तुम्ही कर्ण्यांचा मोठा गजर करा; म्हणजे तुमचा देव परमेश्वर ह्याला तुमची आठवण होईल आणि तुमच्या शत्रूंपासून तुमचा बचाव होईल.


प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेस परमेश्वराप्रीत्यर्थ होमार्पण करावे; दोन गोर्‍हे, एक मेंढा आणि एकेक वर्षाची नरजातीची सात दोषहीन कोकरे अर्पावीत;


सातव्या महिन्याच्या प्रतिपदेस पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी अंगमेहनतीचे कसलेही काम करू नये; हा तुमचा कर्णे वाजवण्याचा दिवस होय.


अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन.


तेव्हा तो त्याच्याकडे निरखून पाहून भयभीत होऊन म्हणाला, “काय महाराज?” त्याने त्याला म्हटले, “तुझ्या प्रार्थना व तुझे दानधर्म देवासमोर स्मरणार्थ आले आहेत.


क्षणात, निमिषात, शेवटला कर्णा वाजेल तेव्हा. कारण कर्णा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील, आणि आपण बदलून जाऊ.


कारण आज्ञाध्वनी, आद्यदिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल; आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील.


म्हणून ह्या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा.


तेव्हा त्यांना तुम्ही सांगा की, यार्देनेचे पाणी परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे दुभंगले; तो यार्देनेतून पलीकडे जात असताना तिच्या पाण्याचे दोन भाग झाले. अशा प्रकारे हे धोंडे इस्राएल लोकांसाठी कायमचे स्मारक होतील.”


सात याजकांनी सात रणशिंगे घेऊन कोशापुढे चालावे; सातव्या दिवशी तुम्ही नगराला सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि याजकांनी रणशिंगे फुंकावीत.


आत्मा व वधू म्हणतात, “ये,” ऐकणाराही म्हणो, “ये.” आणि ‘तान्हेला येवो;’ ज्याला पाहिजे तो ‘जीवनाचे पाणी फुकट’ घेवो.


दावीद योनाथानाला म्हणाला, “हे पाहा, उद्या चंद्रदर्शन आहे व राजाच्या पंक्तीला बसून भोजन करणे मला चुकणार नाही; तर तू मला जाऊ दे, म्हणजे मी परवा संध्याकाळपर्यंत रानात लपून राहीन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan