Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 1:53 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

53 पण लेव्यांनी आपले डेरे साक्षपटाच्या निवासमंडपासभोवती ठोकावेत म्हणजे इस्राएल लोकांच्या मंडळीवर कोप होणार नाही; आणि लेव्यांनी साक्षपटाच्या निवासमंडपाचे रक्षण करावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

53 परंतु लेवी लोकांनी आपले तंबू पवित्र निवासमंडपाच्या सभोवती ठोकावेत; त्यांनी आज्ञापट असलेल्या पवित्र निवासमंडपाचे रक्षण करावे म्हणजे इस्राएल लोकांच्या मंडळीवर संकट येणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

53 परंतु लेव्यांनी आपले डेरे कराराच्या निवासमंडपाच्या सभोवती उभारावे, म्हणजे इस्राएली समुदायाविरुद्ध माझा क्रोध पेटणार नाही. लेव्यांनी कराराच्या नियमाच्या निवासमंडपाची जबाबदारी घेऊन त्याची काळजी घ्यावी.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 1:53
26 Iomraidhean Croise  

परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेप्रीत्यर्थ दर्शनमंडपाचे व पवित्रस्थानाचे रक्षण करणे आणि त्यांचे भाऊबंद अहरोन वंशज ह्यांना नेमून दिलेल्या कामी मदत करणे हे त्यांचे काम होते.


आमच्या लोकांचा देव परमेश्वर आहे. आम्ही त्याला सोडले नाही; आणि परमेश्वराची सेवाचाकरी करणारे जे याजक आमच्याजवळ आहेत ते अहरोनाचे वंशज आहेत आणि लेवीही आपापली कामे करीत आहेत.


ते नित्य सकाळी व संध्याकाळी परमेश्वराप्रीत्यर्थ होमबली व सुगंधी धूप जाळतात; ते शुद्ध मानलेल्या मेजावर समर्पित भाकर मांडतात; सोन्याचा दीपवृक्ष व त्यावरचे दिवे दररोज संध्याकाळी ते उजळतात; आम्ही आपला देव परमेश्वर ह्याची आज्ञा पाळत असतो, पण तुम्ही त्याला सोडले आहे.


ह्याकरता सेनाधीश परमेश्वर संदेष्ट्याविषयी म्हणतो, “पाहा, मी त्यांना खायला कडूदवणा व प्यायला विष देईन, कारण यरुशलेमेच्या संदेष्ट्यांपासून अधर्म निघून देशभर पसरला आहे.”


संदेष्टे खोटे संदेश देतात, त्यांच्या धोरणाने याजक अधिकार चालवतात व माझ्या लोकांनाही असेच आवडते; पण अखेरीस तुम्ही काय करणार?


मोशेने अहरोन आणि त्याचे मुलगे एलाजार व इथामार ह्यांना सांगितले की, “तुम्ही आपल्या डोक्याचे केस मोकळे सोडू नका आणि आपली वस्त्रे फाडू नका; तसे कराल तर मराल आणि सर्व मंडळीवर कोप भडकेल; पण त्याने जो अग्नी पेटवला त्याबद्दल तुमच्या बांधवांनी म्हणजे सगळ्या इस्राएल घराण्याने विलाप करावा.


तर साक्षपटाच्या निवासमंडपावर, त्यातील सर्व सामानावर व त्यासंबंधाचे जे काही असेल त्यावर लेव्यांना अधिकारी नेमून ठेव; निवासमंडप आणि त्यातील सर्व सामान त्यांनी वाहून न्यावे, त्यासंबंधीच त्यांनी सेवा करावी व आपले डेरे निवासमंडपाभोवती ठोकावेत.


इस्राएल लोकांनी ह्याप्रमाणे केले; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी सर्वकाही केले.


मग मोशे अहरोनाला म्हणाला, “धुपाटणे घेऊन त्यात वेदीवरील अग्नी घाल व त्यावर धूप ठेवून ते ताबडतोब मंडळीकडे नेऊन त्यांच्यासाठी प्रायश्‍चित्त कर, कारण परमेश्वराचा कोप भडकला असून मरीची साथ सुरू झाली आहे.”


तुम्ही परमेश्वराच्या निवासमंडपाची सेवा करावी आणि मंडळीची सेवा करण्यासाठी तिच्यासमोर उभे राहावे म्हणून परमेश्वराने तुम्हांला आपल्याजवळ येऊ दिले; ह्या कार्यासाठी इस्राएलाच्या देवाने तुम्हांला इस्राएल लोकांच्या मंडळीतून वेगळे केले आहे हे काय थोडे झाले?


मोशेने ह्या काठ्या साक्षपटाच्या तंबूत परमेश्वरासमोर ठेवल्या.


मग सर्व छावण्यांच्या मध्यभागी लेव्यांच्या छावणीसह दर्शनमंडप पुढे न्यावा; ज्या क्रमाने ते डेरे ठोकतील त्याच क्रमाने त्यांनी आपापल्या जागी आपापल्या निशाणांजवळ राहून कूच करावे.


गेर्षोनी कुळांनी निवासमंडपाच्या मागे पश्‍चिमेकडे आपले डेरे ठोकावेत.


कहाथी कुळांनी निवासमंडपाच्या दक्षिणेस आपले डेरे ठोकावेत.


मरारी कुळांच्या वाडवडिलांच्या घराण्याचा सरदार अबीहाईलाचा मुलगा सूरीएल हा असावा; त्यांनी निवासमंडपाच्या उत्तरेस आपले डेरे ठोकावेत.


निवासमंडपासमोर पूर्वेकडे म्हणजे दर्शनमंडपासमोर उगवतीस जे डेरे ठोकायचे ते मोशे आणि अहरोन व त्यांचे मुलगे ह्यांचे असावेत; इस्राएल लोकांकरिता पवित्रस्थानाच्या रक्षणाची जी जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली होती, ती त्यांनी पार पाडावी; कोणी परका जवळ आल्यास त्याला जिवे मारावे.


मग इस्राएल लोकांना मिळालेल्या हिश्शातून माणसे आणि गाईबैल, गाढवे, शेरडेमेंढरे वगैरे सर्व पशू ह्यांच्यापैकी प्रत्येक पन्नासांमागे एक घेऊन परमेश्वराच्या निवासमंडपाचे रक्षण करणार्‍या लेव्यांना द्यावे.”


मंडळीला मिळालेल्या हिश्शातून मोशेने माणसे व जनावरे ह्यांच्यापैकी प्रत्येक पन्नासांमागे एक घेऊन परमेश्वराच्या निवासमंडपाचे रक्षण करणार्‍या लेव्यांना दिले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले.


दर्शनमंडपात इस्राएल लोकांसाठी सेवा करायला व इस्राएल लोकांसाठी प्रायश्‍चित्त करायला अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना इस्राएल लोकांतून लेवी दान म्हणून मी दिले आहेत; म्हणजे इस्राएल लोक पवित्रस्थानाजवळ आले असता त्यांच्यावर अनर्थ गुदरू नये.”


वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर व बोध कर.


बेथ-शेमेश येथल्या लोकांनी परमेश्वराच्या कोशाचे निरीक्षण केले म्हणून परमेश्वराने त्यांचा संहार केला; त्याने त्या लोकांतले पन्नास हजार सत्तर पुरुष जिवे मारले; परमेश्वराने माणसांचा एवढा संहार केला म्हणून त्या लोकांनी शोक केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan