Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 1:46 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

46 त्यांची एकंदर संख्या सहा लक्ष तीन हजार पाचशे पन्नास भरली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

46 ती मोजदाद एकूण सहा लाख तीन हजार पाचशे पन्नास भरली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

46 एकूण संख्या 6,03,550 होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 1:46
24 Iomraidhean Croise  

मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन; मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन; तू आशीर्वादित होशील;


मी तुझी संतती पृथ्वीच्या रज:कणांसारखी करीन; कोणाला पृथ्वीच्या रज:कणांची गणना करता आली तर तुझ्या संततीचीही गणना होईल.


मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, “आकाशाकडे दृष्टी लाव; तुला हे तारे मोजवतील तर मोज.” मग त्याने त्याला सांगितले, “तुझी संतती अशीच होईल.”


मी तुला अति फलसंपन्न करीन; तुझ्यापासून मी राष्ट्रे निर्माण करीन, तुझ्यापासून राजे उत्पन्न होतील.


ह्यास्तव मी तुला आशीर्वादित करीन व वृद्धीच वृद्धी करून तुझी संतती आकाशातील तार्‍यांइतकी, समुद्रतीरीच्या वाळूइतकी होईल असे करीन. तुझी संतती आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करील.


त्या देशात उपरा असा राहा; मी तुझ्याबरोबर असेन, आणि तुला आशीर्वादित करीन; कारण हे सर्व देश मी तुला व तुझ्या संततीला देईन आणि मी तुझा बाप अब्राहाम ह्याच्याशी वाहिलेली शपथ खरी करीन.


तुझी संतती संख्येने पृथ्वीच्या रजांइतकी होईल, पूर्व, पश्‍चिम, उत्तर व दक्षिण अशा चारी दिशांना तुझा विस्तार होईल; तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील.


तेव्हा यवाबाने प्रजेच्या मोजदादीची यादी राजाला दिली : धारकरी योद्धे इस्राएलात आठ लक्ष व यहूदात पाच लक्ष भरले.


यहूदा व इस्राएल हे समुद्रकिनार्‍याच्या वाळूप्रमाणे संख्येने बहुत असत; ते खाऊनपिऊन चैनीत असत.


तेव्हा यवाबाने प्रजेच्या मोजदादीची यादी दाविदाला दिली. सर्व धारकरी पुरुष इस्राएलात अकरा लक्ष आणि यहूदात चार लक्ष सत्तर हजार भरले.


अबीया मोठमोठ्या लढवय्यांचे चार लक्ष सैन्य घेऊन लढाईस उभा राहिला; इकडे यराबाम मोठे शूर वीर असे निवडक आठ लक्ष पुरुष घेऊन त्याच्याशी सामना करायला व्यूह रचून सिद्ध झाला.


मग इस्राएल लोक रामसेस येथून कूच करून सुक्कोथ येथे गेले; जे पुरुष पायी गेले ते मुलाबाळांशिवाय सुमारे सहा लाख होते.


म्हणजे जितके वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे होते त्यांची गणती झाली तेव्हा, ते सहा लाख तीन हजार पाचशे पन्नास भरले. त्यांतल्या प्रत्येकामागे पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलना-प्रमाणे एकेक बेका म्हणजे अर्धा शेकेल मिळाला.


ह्या प्रकारे इस्राएल लोकांपैकी त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे असून इस्राएलात जे युद्धास लायक होते अशा ज्या सर्वांची नोंद झाली,


मग मोशे म्हणाला, “ज्या लोकांमध्ये मी आहे त्यांचे पायदळच सहा लाख आहे आणि तू म्हणतोस की, ते महिनाभर खात राहतील एवढे मांस मी त्यांना देईन.


तुमची प्रेते ह्या रानात पडतील, आणि तुमच्यापैकी ज्यांची गणना झाली त्यांच्या पूर्ण संख्येतील वीस वर्षे व त्यांहून अधिक वयाच्या ज्या लोकांनी माझ्याविरुद्ध कुरकुर केली आहे त्यांपैकी कोणीही


इस्राएल वंशातील ज्या लोकांची त्यांच्या-त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे मोजदाद झाली ती ही. त्यांच्या छावण्यांतील त्यांच्या-त्यांच्या दलांप्रमाणे ज्या सर्वांची मोजदाद करण्यात आली, त्यांची एकंदर संख्या सहा लक्ष तीन हजार पाचशे पन्नास होती.


याकोबाचे रजःकण कोण मोजू शकेल? इस्राएलाच्या चौथ्या भागाची1 तरी गणती कोण करू शकेल? नीतिमानाप्रमाणे मला मृत्यू येवो! माझा अंत त्याच्यासारखा होवो!”


इस्राएल लोकांची गणती झाली, ती सहा लक्ष एक हजार सातशे तीस भरली.


तुझे पूर्वज मिसर देशात गेले तेव्हा ते सत्तर जण होते; पण आता तुझा देव परमेश्वर ह्याने तुझी संख्या आकाशातील तार्‍यांप्रमाणे बहुगुणित केली आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan