Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 1:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 प्रत्येक वंशातला एकेक पुरुष म्हणजे जो आपल्या पूर्वजांच्या घराण्यातला प्रमुख असेल त्याला आपल्याबरोबर घ्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 प्रत्येक वंशातला एक पुरुष जो आपल्या वडिलांच्या घराण्याचा प्रमुख असेल तो तुम्हास मदत करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 प्रत्येक कुळा मधून जो मनुष्य कुटुंबप्रमुख आहे त्याने तुला मदत करावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 1:4
19 Iomraidhean Croise  

मग शलमोन राजाने परमेश्वराच्या कराराचा कोश दावीदपुरातून म्हणजे सीयोनातून वरती आणण्यासाठी इस्राएलाचे वडील जन, वंशांचे सर्व प्रमुख व सर्व पितृकुळांचे सरदार ह्यांना शलमोन राजाकडे यरुशलेमेत जमा केले.


तसेच तू ह्या सर्व लोकांतून कर्तबगार, देवाचे भय धरणारे, विश्वासू, लाचलुचपतीचा द्वेष करणारे असे पुरुष निवडून घे आणि लोकांवर अधिकार चालवण्यासाठी त्यांना हजार-हजार, शंभर-शंभर, पन्नास-पन्नास, दहा-दहा जणांवर नायक म्हणून नेमून ठेव;


त्याने सर्व इस्राएलांतून कर्तबगार पुरुष निवडून त्यांना प्रमुख नेमले म्हणजेच त्यांना हजार-हजार, शंभर-शंभर, पन्नास-पन्नास, दहा-दहा जणांवर नायक नेमून ठेवले.


मंडळीतून जे पुरुष निवडले ते हे; ते आपापल्या पूर्वजांच्या वंशाचे सरदार असून इस्राएलाच्या हजार-हजारांच्या पथकांचे1 प्रमुख होते.


मोशे आणि अहरोन आणि इस्राएलाचे बारा सरदार जे आपापल्या पूर्वजांच्या घराण्याचे प्रमुख होते त्यांनी जी गणती केली ती इतकी भरली.


लेवीच्या काठीवर अहरोनाचे नाव लिही; कारण इस्राएलांच्या पूर्वजांच्या घराण्यातील प्रत्येक सरदाराची एकेक काठी घे,


मिद्यानी बाईबरोबर ठार मारण्यात आलेल्या इस्राएली पुरुषाचे नाव जिम्री होते. हा सालूचा मुलगा असून शिमोनी वंशातला आपल्या वडिलांच्या घराण्यातील सरदार होता.


आणि परमेश्वर मोशेला म्हणाला, “लोकांच्या सर्व प्रमुखांना पकडून परमेश्वराकरता त्यांना भरदिवसा फाशी दे म्हणजे परमेश्वराचा इस्राएलांवर भडकलेला राग जाईल.”


मोशे इस्राएल लोकांच्या वंशप्रमुखांना म्हणाला, “परमेश्वराने दिलेली आज्ञा ही :


ह्या प्रकारे मोशे, अहरोन आणि मंडळीचे सरदार ह्यांनी कहाथवंशजांची, त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून गणती केली;


तेव्हा असे झाले की, इस्राएलाचे सरदार जे आपापल्या पूर्वजांच्या घराण्यांचे प्रमुख होते त्यांनी अर्पणे आणली; हे वंशांचे सरदार असून खानेसुमारी केलेल्या लोकांवर त्यांची देखरेख होती;


म्हणून तुमच्या वंशांपैकी बुद्धिमान व अनुभवी अशा मुख्य पुरुषांना मी तुमचे प्रमुख नेमले, म्हणजे तुमच्या वंशावंशांप्रमाणे हजारा-हजारांवर, शंभरा-शंभरांवर, पन्नासा-पन्नासांवर व दहा-दहांवर नायक व अंमलदार नेमून दिले.


आणि त्याच्याबरोबर इस्राएल लोकांच्या वंशांच्या पितृकुळातील प्रत्येक वंशामागे एक असे दहा सरदार पाठवले; ते इस्राएल लोकांच्या कुळांतील आपापल्या पितृकुळांचे प्रमुख होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan