Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 1:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 वीस वर्षांचे किंवा त्यांहून अधिक वयाचे जितके इस्राएल पुरुष युद्धास लायक असतील त्या सर्वांची त्यांच्या-त्यांच्या दलाप्रमाणे तू आणि अहरोन मिळून गणती करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 वीस वर्षाचे किंवा त्याहून अधिक वयाचे जितके पुरुष सैन्यात जाण्यायोगे इस्राएलात असतील त्या सर्वाची त्यांच्या सैन्याप्रमाणे तू आणि अहरोन मिळून गणती करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तू आणि अहरोनाने त्यांच्या विभागानुसार जे वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या आणि सैन्यात सेवा करण्यास सक्षम असलेल्या सर्व इस्राएली पुरुषांची गणना करावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 1:3
16 Iomraidhean Croise  

तेव्हा यवाबाने प्रजेच्या मोजदादीची यादी राजाला दिली : धारकरी योद्धे इस्राएलात आठ लक्ष व यहूदात पाच लक्ष भरले.


रऊबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोक त्यांच्यातले बलवान पुरुष ढालाईत, धारकरी, धनुर्धारी व युद्धकलानिपुण असे चव्वेचाळीस हजार सातशे साठ लढाईस जाण्याजोगे लोक होते.


अमस्याने अवघा यहूदा व बन्यामीन मिळवला व त्यांच्या पितृकुळांप्रमाणे त्यांच्यावर सहस्रपती व शतपती नेमून दिले; जे वीस वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे होते त्यांची त्याने गणती केली तेव्हा युद्ध करण्याजोगे व भाला व ढाल धारण करण्याजोगे तीन लाख लोक भरले.


ह्या प्रकारे तुम्ही बेखमीर भाकरीचा सण पाळावा, कारण ह्याच दिवशी मी तुमच्या सेना मिसर देशातून बाहेर आणल्या; ह्यास्तव हा दिवस पिढ्यानपिढ्या कायमचा विधी म्हणून पाळावा.


वीस वर्षांच्या व त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये ज्यांची गणना होईल त्यांतील प्रत्येकाने परमेश्वराप्रीत्यर्थ हे समर्पण करावे.


म्हणजे जितके वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे होते त्यांची गणती झाली तेव्हा, ते सहा लाख तीन हजार पाचशे पन्नास भरले. त्यांतल्या प्रत्येकामागे पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलना-प्रमाणे एकेक बेका म्हणजे अर्धा शेकेल मिळाला.


तुमची प्रेते ह्या रानात पडतील, आणि तुमच्यापैकी ज्यांची गणना झाली त्यांच्या पूर्ण संख्येतील वीस वर्षे व त्यांहून अधिक वयाच्या ज्या लोकांनी माझ्याविरुद्ध कुरकुर केली आहे त्यांपैकी कोणीही


“इस्राएलात जे वीस वर्षांचे किंवा त्यांहून अधिक वयाचे असून युद्धास लायक असतील, त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे त्या सर्व इस्राएल लोकांच्या मंडळीची गणती करा.”


“लेवी वंशातील जितके पुरुष एक महिन्याचे अथवा त्याहून अधिक वयाचे असतील त्यांच्या वाडवडिलांची घराणी व त्यांची कुळे ह्यांना अनुसरून त्यांची गणती कर.”


‘मिसर देशातून निघालेल्या लोकांपैकी वीस वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे जे आहेत त्यांतील कोणीही अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना जो देश देण्याची मी शपथ वाहिली होती तो देश पाहणार नाहीत, कारण ते मला पूर्णपणे अनुसरले नाहीत;


मोशे व अहरोन ह्यांच्या नेतृत्वाखाली इस्राएल लोकांच्या ज्या सेना मिसर देशातून बाहेर पडल्या त्यांच्या मजला ह्याप्रमाणे :


म्हणजे तीस वर्षांच्या वयापासून पन्नास वर्षांपर्यंत जे पुरुष दर्शनमंडपाच्या सेवेसाठी पात्र असतील त्यांची गणती कर.


एखाद्या पुरुषाचे नुकतेच लग्न झाले असल्यास त्याने सैन्याबरोबर मोहिमेवर जाऊ नये, अथवा काहीही कामगिरी त्याच्यावर टाकण्यात येऊ नये; त्याने वर्षभर घरीच राहावे आणि आपल्या बायकोला रंजवावे.


त्या वेळी मी तुम्हांला आज्ञा केली की, ‘तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला हा देश वतन म्हणून दिला आहे, तेव्हा तुम्ही सर्व योद्धे सशस्त्र होऊन आपल्या इस्राएल भाऊबंदांच्या आघाडीस पैलतीरी जा;


Lean sinn:

Sanasan


Sanasan