Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 1:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 मंडळीतून जे पुरुष निवडले ते हे; ते आपापल्या पूर्वजांच्या वंशाचे सरदार असून इस्राएलाच्या हजार-हजारांच्या पथकांचे1 प्रमुख होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 हे लोकांतून निवडलेले माणसे होती, त्यांच्या पूर्वजांच्या वंशाचे अधिपती होते. ते इस्राएलाच्या कुळाचे प्रमुख होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 हे सर्व वंशांतून निवडलेले पुरुष त्यांच्या पूर्वजांच्या वंशांचे सरदार आहेत. ते इस्राएली गोत्रप्रमुख होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 1:16
20 Iomraidhean Croise  

तसेच तू ह्या सर्व लोकांतून कर्तबगार, देवाचे भय धरणारे, विश्वासू, लाचलुचपतीचा द्वेष करणारे असे पुरुष निवडून घे आणि लोकांवर अधिकार चालवण्यासाठी त्यांना हजार-हजार, शंभर-शंभर, पन्नास-पन्नास, दहा-दहा जणांवर नायक म्हणून नेमून ठेव;


त्याने सर्व इस्राएलांतून कर्तबगार पुरुष निवडून त्यांना प्रमुख नेमले म्हणजेच त्यांना हजार-हजार, शंभर-शंभर, पन्नास-पन्नास, दहा-दहा जणांवर नायक नेमून ठेवले.


हे बेथलेहेम एफ्राथा, यहूदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्राएलाचा शास्ता होईल; त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादि काळापासून आहे.


नफताली वंशातला एनानाचा मुलगा अहीरा.”


ज्यांची नावे वर नमूद केली त्यांना मोशे व अहरोन ह्यांनी बरोबर घेतले,


प्रत्येक वंशातला एकेक पुरुष म्हणजे जो आपल्या पूर्वजांच्या घराण्यातला प्रमुख असेल त्याला आपल्याबरोबर घ्या.


एकच कर्णा वाजवला तर सरदारांनी म्हणजे इस्राएलाच्या घराण्यातील1 प्रमुखांनी तुझ्यासमोर जमावे.


मग मी उतरून तेथे तुझ्याशी बोलेन, आणि तुझ्यावर असणार्‍या आत्म्यातून काही घेऊन त्यांच्यावर ठेवीन म्हणजे तुझ्याबरोबर तेही लोकांचा भार वाहतील; मग तुला एकट्यालाच तो वाहावा लागणार नाही.


हे इस्राएलातील अडीचशे लोकांना बरोबर घेऊन मोशेविरुद्ध उठले; हे लोक सरदार असून मंडळीचे प्रतिनिधी व नामांकित पुरुष होते.


अलीयाबचे मुलगे नमुवेल, दाथान व अबीराम. हे दाथान व अबीराम मंडळीतले निवडक पुरुष होते. कोरहाच्या टोळीने परमेश्वराला विरोध केला तेव्हा ह्यांनी त्या टोळीत सामील होऊन मोशे व अहरोन ह्यांना विरोध केला होता;


मोशे इस्राएल लोकांच्या वंशप्रमुखांना म्हणाला, “परमेश्वराने दिलेली आज्ञा ही :


तेव्हा असे झाले की, इस्राएलाचे सरदार जे आपापल्या पूर्वजांच्या घराण्यांचे प्रमुख होते त्यांनी अर्पणे आणली; हे वंशांचे सरदार असून खानेसुमारी केलेल्या लोकांवर त्यांची देखरेख होती;


म्हणून तुमच्या वंशांपैकी बुद्धिमान व अनुभवी अशा मुख्य पुरुषांना मी तुमचे प्रमुख नेमले, म्हणजे तुमच्या वंशावंशांप्रमाणे हजारा-हजारांवर, शंभरा-शंभरांवर, पन्नासा-पन्नासांवर व दहा-दहांवर नायक व अंमलदार नेमून दिले.


तो त्याला म्हणाला, “प्रभो, इस्राएलाला मी कसा सोडवणार? माझे कूळ मनश्शे वंशात सर्वांत दरिद्री आहे; तसाच मी आपल्या वडिलांच्या घराण्यात अगदी कनिष्ठ आहे.”


तेव्हा शौल आपल्या सभोवतालच्या सेवकांना म्हणाला, “बन्यामिनी लोकहो, ऐका; इशायाचा पुत्र तुम्हा सर्वांना शेते व द्राक्षांचे मळे देणार आहे काय आणि तो तुम्हा सर्वांना सहस्रपती व शतपती करणार आहे काय,


तो कोणकोणत्या जागी दडी मारून असतो त्या सगळ्या जागांची माहिती काढून अवश्य परत या, म्हणजे मी तुमच्याबरोबर परत येईन; तो ह्या देशात कोठेही असला तरी मी ह्या यहूदाच्या हजारो लोकांतून त्याला हुडकून काढीन.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan