नहेम्या 9:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मग येशूवा, कदमीएल, बानी, हशबन्या, शेरेब्या, होदीया, शबन्या व पथह्या हे लेवी म्हणाले, “उभे राहा आणि आपला देव परमेश्वर ह्याचा येणेप्रमाणे धन्यवाद अनंतकाळ करा : तुझे वैभवशाली नाम धन्य असो; ते सर्व धन्यवाद व स्तवन ह्यांपलीकडे आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग येशूवा, बानी, कदमीएल, बानी, हशबन्या, शेरेब्या, होदीया, शबन्या आणि पथह्या हे लेवी म्हणाले, “उभे राहा आणि आपला परमेश्वर देव याचे स्तवन सदासर्वकाळ करा. लोक तुझ्या वैभवशाली नावाचे स्तवन करोत आणि तुझे नाम स्तुती आणि आशीर्वाद यांच्या पलीकडे उंचावले जावो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मग लेवी—येशूआ, कदमीएल, बानी, हशबन्याह, शेरेब्याह, होदीयाह, शबन्याह व पथह्याह—हे लोकांना म्हणाले: “उभे राहा आणि याहवेह तुमच्या परमेश्वराची स्तुती करा, कारण ते अनादि काळापासून शाश्वत परमेश्वर आहेत.” “तुमचे वैभवी नाव धन्य असो आणि ते सर्व प्रशंसा व स्तवनाच्या उच्चस्थानी राहो. Faic an caibideil |
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो! जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी, त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतांतून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला; जे तारण शेवटच्या काळी प्रकट होण्यास सिद्ध आहे, ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे राखलेले आहात, त्या तुमच्यासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे.