Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 9:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 आमचे राजे, अधिपती, याजक आणि वाडवडील ह्यांनी तुझे नियमशास्त्र पाळले नाही, आणि आपल्या ज्या आज्ञांच्या व निर्बंधांच्या योगे तू त्यांना बजावले त्यांकडे त्यांनी लक्ष दिले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 आमचे राजे, नेते, याजक आणि पूर्वज यांनी तुझे नियमशास्त्र पाळले नाही. तुझ्या आज्ञा ऐकल्या नाहीत. तू दिलेल्या सूचनाकंडे त्यांनी दुर्लक्ष केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 आमचे राजे, आमचे अधिकारी, आमचे याजक आणि आमचे पूर्वज यांनी तुमचे नियम पाळले नाहीत किंवा तुमच्या आज्ञा व आदेश पाळण्याच्या ताकिदीकडे लक्ष दिले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 9:34
13 Iomraidhean Croise  

तरी परमेश्वराने सर्व संदेष्टे व द्रष्टे ह्यांच्या द्वारे इस्राएल व यहूदा ह्यांना बजावून सांगितले होते की, “तुम्ही आपले वाईट मार्ग सोडून तुमच्या पूर्वजांना जे सगळे नियमशास्त्र मी विहित करून माझे सेवक संदेष्टे ह्यांच्या द्वारे तुमच्याकडे पाठवले होते त्याला अनुसरून माझ्या आज्ञा व नियम पाळावेत.”


आणि त्यांनी त्याचे नियम, त्यांच्या वाडवडिलांशी केलेला त्याचा करार व त्यांना पढवलेले त्याचे निर्बंध ह्यांचा त्यांनी अव्हेर केला. ते भ्रामक गोष्टींच्या मागे लागून भ्रांत झाले आणि ज्या आसपासच्या परराष्ट्रांप्रमाणे करू नका असे परमेश्वराने त्यांना बजावले होते त्यांचे त्यांनी अनुकरण केले.


आपल्या पूर्वजांनी अपराध करून आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे वाईट ते केले व त्याला सोडून दिले; परमेश्वराच्या निवासस्थानापासून आपली तोंडे फिरवून त्याकडे त्यांनी पाठ फिरवली.


तर आता हे आमच्या देवा, असे असता आम्ही काय बोलणार? आम्ही तुझ्या आज्ञा मोडल्या आहेत.


तू पुष्कळ वर्षे त्यांची गय केलीस व आपल्या आत्म्याने संदेष्ट्यांच्या द्वारे त्यांना बजावत आलास; पण त्यांनी कान दिला नाही म्हणून तू त्यांना अनेक देशांतील लोकांच्या हाती दिलेस.


आमच्यावर जे काही गुदरले आहे त्याच्या बाबतीत तू न्यायशील आहेस; तू आमच्याशी सत्यतेने वागलास पण आम्ही दुष्टाई केली आहे.


त्यांनी आपल्या राज्यात तुझी सेवा केली नाही; तू त्यांचे मोठे कल्याण केलेस, आणि तू त्यांना विस्तृत व सुपीक भूमी दिली, तरीही तुझी सेवा त्यांनी केली नाही आणि आपल्या दुष्कर्मापासून ते परावृत्त झाले नाहीत.


परमेश्वर म्हणतो, माझे सेवक जे संदेष्टे त्यांना माझी वचने देऊन मी मोठ्या निकडीने त्यांच्याकडे पाठवत आलो तरी त्यांनी ती ऐकली नाहीत; आणि तुम्हीही ती ऐकत नाही, असे परमेश्वर म्हणतो.


आम्ही पूर्वी जसे केले, म्हणजे आम्ही, आमच्या पूर्वजांनी, आमच्या राजांनी व आमच्या सरदारांनी यहूदाच्या नगरांत व यरुशलेमेच्या आळ्यांत जसे केले त्याप्रमाणे आकाशराणीस धूप जाळण्याविषयी व तिला पेयार्पणे अर्पण करण्याविषयी आमच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द आम्ही खरा करून दाखवू; कारण तेव्हा आम्हांला अन्नाची चंगळ असे, आमची आबादानी असे व आम्ही काही अनिष्ट पाहत नसू.


मी तर आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांना तुमच्याकडे पाठवत आलो; मोठ्या निकडीने त्यांना तुमच्याकडे पाठवून सांगत असे की, ‘ह्या अमंगळ कर्माचा मला वीट आहे; ती करू नका’.


तरी तिने दुष्ट आचरण करून माझ्या निर्णयांना इतर राष्ट्रांपेक्षाही अधिक विरोध केला, तिने सभोवतालच्या प्रदेशांपेक्षाही माझ्या नियमांचा अधिक विरोध केला; कारण त्यांनी माझ्या निर्णयांचा अव्हेर केला व माझ्या नियमाप्रमाणे ते चालले नाहीत.


तुझे सेवक जे संदेष्टे त्यांनी तुझ्या नामाने आमचे राजे, सरदार, वडील व देशाचे सर्व लोक ह्यांना सांगितले तेही आम्ही ऐकले नाही.


त्यांच्यावर पुष्कळ विपत्ती व संकटे ओढवल्यावर हे गीत त्यांच्यासमोर साक्ष देईल, कारण ते त्यांच्या संतानाच्या मुखी सदोदित राहील. ज्या देशात त्यांना घेऊन जाण्याची मी शपथ वाहिली होती त्यात त्यांना अजून नेलेही नाही तोच त्यांच्या मनात काय काय चालले आहे हे मी जाणून आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan