नहेम्या 9:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 तर आता हे आमच्या देवा, हे थोर, पराक्रमी व भयावह देवा, आपला करार व दया कायम राखणार्या देवा, अश्शूरी राजाच्या काळापासून आजपर्यंत आम्हांला, आमच्या राजांना, आमच्या अधिपतींना, आमच्या याजकांना, आमच्या संदेष्ट्यांना, आमच्या वाडवडिलांना आणि तुझ्या सर्व लोकांना जे कष्ट झाले आहेत ते क्षुल्लक लेखू नकोस. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 हे आमच्या देवा, महान, पराक्रमी व भयावह देवा, आपला करार व दया कायम राखणाऱ्या देवा, आमच्यावर अनेक आपत्ती आल्या त्यांना छोट्या समजू नकोस आणि आमचे राजे आणि नेते, आमचे याजक आणि संदेष्टे या सर्वांवर अरिष्ट आले. अश्शूर राजाच्या काळापासून आजतागायत भयानक गोष्टी ओढवल्या. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 “म्हणून आता, हे आमच्या महान, पराक्रमी व भयावह परमेश्वरा, तुम्ही तुमच्या प्रीतीचे वचन पाळता, म्हणून ज्या हालअपेष्टा आम्ही सहन केल्या, त्यांना तुमच्या नजरेत क्षुल्लक मानू नका—जी आमच्यावर, आमच्या राजांवर व अधिकार्यांवर, आमच्या याजक व संदेष्ट्यांवर, आमच्या पूर्वजांवर व तुमच्या सर्व लोकांवर, अश्शूरी राजाच्या राजवटीपासून आतापर्यंत संकटे आली. Faic an caibideil |
तेव्हा ते जरूब्बाबेल व पितृकुळांचे प्रमुख पुरुष ह्यांच्याकडे येऊन म्हणू लागले, “आम्हीही तुमच्याप्रमाणे तुमच्या देवाच्या भजनी लागलो आहोत; अश्शूरचा राजा एसर-हद्दोन ह्याने आम्हांला इकडे आणून ठेवले त्या दिवसापासून त्याच देवाला आम्ही यज्ञ करीत आलो आहोत; ह्यास्तव तुमच्याबरोबर आम्हांलाही मंदिर बांधूं द्या;”