नहेम्या 9:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 त्यांनी तटबंदीची नगरे व सुपीक भूमी काबीज केली, आणि उत्तमोत्तम वस्तूंनी भरलेली घरे, खोदलेले हौद, द्राक्षांचे मळे, जैतुनांचे मळे व विपुल फळझाडे ह्यांचा ताबा घेतला; ते खाऊन तृप्त झाले, धष्टपुष्ट झाले आणि तुझ्या अतिशय चांगुलपणामुळे सुख पावले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 त्यांनी मजबूत नगरांचा कब्जा घेतला आणि सुपीक प्रदेश मिळवला, उत्तम वस्तूनी भरलेली घरे त्यांनी ताब्यात घेतली, खोदलेल्या विहिरी त्यांना मिळाल्या. द्राक्षमळे, जैतूनाची झाडे आणि पुष्कळशी फळझाडे यांचा त्यांनी ताबा घेतला, खाऊन पिऊन ते तृप्त झाले, पुष्ट झाले. तुझ्या महान चांगुलपणामुळे ते आनंदीत झाले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 त्यांनी तटबंदीची शहरे आणि सुपीक जमिनी काबीज केल्या; सर्व चांगल्या वस्तूंनी भरलेली घरे, खोदलेल्या विहिरी, द्राक्षमळे, जैतुनाचे मळे व विपुल फळझाडे हस्तगत केली. मग ते खाऊन तृप्त व उत्तमरित्या पोषित झाले; आणि तुमच्या महान चांगुलपणाचा त्यांनी आनंद साजरा केला. Faic an caibideil |