Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 9:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 मग तू त्यांना देशोदेशीचे लोक अंकित करून दिले आणि त्यांच्या चतुःसीमा नेमून दिल्या, त्याप्रमाणेच हेशबोनचा राजा सीहोन व बाशानाचा राजा ओग ह्या दोघांच्या देशांचे वतन त्यांना प्राप्त झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 त्यांना तू राज्ये आणि लोक दिलेस. फार लोकवस्ती नसलेली लांबलांबची ठिकाणे दिलीस. हेशबोनचा राजा सीहोन व बाशानाचा राजा ओग या दोघांच्या देशाचे वतन त्यांना ताब्यात मिळाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 “नंतर राज्ये व राष्ट्रे तुम्ही त्यांना दिली आणि दूरवरच्या कानाकोपर्‍यातील सरहद्दीही दिल्या. त्यांनी हेशबोनचा राजा सीहोन व बाशानचा राजा ओगचे देश काबीज केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 9:22
16 Iomraidhean Croise  

त्याने त्यांना परक्या राष्ट्रांचे देश दिले; त्या लोकांच्या श्रमाचे फळ ह्यांच्या हाती आले,


तेव्हा प्रभू झोपेतून जागा झालेल्या मनुष्यासारखा उठला. द्राक्षारस पिऊन आरोळी मारणार्‍या वीरासारखा उठला.


मी आपल्या महाशक्तीने, आपले बाहू उभारून पृथ्वी आणि पृथ्वीच्या पाठीवर असलेली माणसे व पशू ह्यांना निर्माण केले आहे, व मला योग्य वाटेल त्यांना ती मी देतो.


त्यांनी येऊन त्याचा ताबा घेतला, परंतु त्यांनी तुझी वाणी ऐकली नाही व तुझ्या नियमशास्त्राप्रमाणे ते चालले नाहीत; तू त्यांना आज्ञापिले त्याप्रमाणे त्यांनी मुळीच केले नाही, म्हणून तू त्यांच्यावर हे सर्व अरिष्ट आणलेस.


मी आपला हात उचलून शपथ करून दिलेल्या देशात त्यांना आणले तेव्हा त्यांनी प्रत्येक उंच टेकडी व प्रत्येक दाट छायेचा वृक्ष पाहून तेथे आपले यज्ञबली अर्पण केले; तेथे संतापवण्याजोगी अर्पणे त्यांनी केली; तेथे त्यांनी सुवासिक धूप जाळला व तेथेच त्यांनी आपली पेयार्पणेही वाहिली.


मोशेने हेशबोनात राहणारा अमोर्‍यांचा राजा सीहोन ह्याला, आणि एद्रई येथे अष्ठरोथ येथील बाशानाचा राजा ओग ह्याला ठार मारल्यावर,


‘मी त्यांची दूरवर पांगापांग करीन, मानवातून त्यांची आठवणच बुजवीन’ असे मी म्हणालो असतो,


मिसर देशातून बाहेर आल्यावर मोशे आणि इस्राएल लोकांनी जो हेशबोननिवासी अमोर्‍यांचा राजा सीहोन ह्याला पराजित केले, त्याच्या देशात यार्देनेच्या पूर्वेस बेथपौराच्या समोरील खोर्‍यात हे सांगण्यात आले;


आणि त्याचा देश व बाशानाचा राजा ओग ह्याचा देश त्यांनी काबीज केला; हे दोघे अमोर्‍यांचे राजे यार्देनेच्या पूर्वेस राहत असत.


ते इस्राएलापुढून बेथ-होरोनाच्या उतरणीवरून पळून जात असताना परमेश्वराने अजेकापर्यंत आकाशातून त्यांच्यावर केलेल्या मोठाल्या गारांच्या वर्षावामुळे ते ठार झाले; इस्राएल लोकांनी तलवारीने मारले त्यांपेक्षा जास्त लोक गारांनी मेले.


परमेश्वराने मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे यहोशवाने सर्व देश काबीज केला. यहोशवाने तो इस्राएलाला त्याच्या वंशांच्या हिश्शांप्रमाणे वतन म्हणून वाटून दिला; तेव्हा देशाला युद्धापासून विसावा मिळाला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan