Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 9:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 त्यांनी हुकूम मानण्याचे नाकारले, आणि जी आश्‍चर्यकृत्ये तू त्यांच्यामध्ये केली होतीस त्यांची त्यांनी पर्वा केली नाही; पण त्यांनी आपली मान ताठ करून एवढे बंड केले की आपल्या दास्यात परत जाण्यासाठी त्यांनी एक नायक नेमला; पण तू क्षमाशील, कृपाळू, दयामय, मंदक्रोध व अतिकरुणामय देव आहेस; तू त्यांचा त्याग केला नाहीस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 त्यांनी ऐकण्याचे नाकारले व तू जी आश्चर्यकारक कृत्ये त्यांच्यामध्ये केलीस त्याचा विचार त्यांनी केला नाही परंतु ते हट्टी झाले. आणि त्यांच्या बंडखोरपणामुळे त्यांनी पुन्हा गुलामगिरी पत्करण्यास एक पुढारी नेमला. पण तू क्षमाशील, दयाळू, कृपाळू, सहनशील, प्रेमळ व मंदक्रोध असा देव आहेस म्हणून तू त्यांना सोडले नाहीस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 त्यांनी तुमचे ऐकण्याचे नाकारले आणि तुम्ही त्यांच्यामध्ये केलेल्या चमत्कारांची आठवण ठेवली नाही. उलट त्यांनी बंडखोरी केली आणि परत गुलामगिरीत आपल्याला न्यावे म्हणून एक पुढारी नेमला. पण तुम्ही क्षमाशील परमेश्वर आहात, दयाळू आणि कृपाळू, मंदक्रोध व प्रेमाने ओतप्रोत भरलेले आहात. तुम्ही त्यांचा त्याग केला नाही,

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 9:17
43 Iomraidhean Croise  

मी इस्राएलामध्ये वस्ती करीन, आणि माझ्या इस्राएल प्रजेस मी टाकणार नाही.”


आपला देव परमेश्वर जसा आपल्या पूर्वजांबरोबर राहत असे तसाच तो आपल्याबरोबर राहो; तो आम्हांला न सोडो, तो आम्हांला न टाको;


नबुखद्नेस्सर राजाने त्याला देवाची शपथ वाहायला लावली होती; त्याच्याविरुद्धही त्याने बंड केले; त्याने आपली मान ताठ केली, आणि इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याकडे तो वळला नाही, त्याने आपले मन कठीण केले.


आम्ही दास तर आहोत, तरी आमच्या दास्यात देवाने आमचा त्याग केला नाही; उलट त्याने पारसदेशीय राजाच्या द्वारे आमच्यावर कृपादृष्टी केली आहे, ह्यासाठी की आम्ही नवजीवन पावून आमच्या देवाचे मंदिर उभारावे, त्याच्या मोडतोडीची दुरुस्ती करावी, आणि यहूदा व यरुशलेम ह्यांत आम्हांला आश्रयस्थान मिळावे.


तरी तू आपल्या दयेच्या बहुत कृत्यांना अनुसरून त्यांचा पुरा अंत केला नाहीस, त्यांचा त्याग केला नाहीस, कारण तू कृपाळू व दयाळू देव आहेस.


तरी ते त्याची कृत्ये लवकरच विसरले; त्याच्या योजनेसंबंधाने त्यांनी धीर धरला नाही.


आमच्या पूर्वजांनी मिसर देशात असताना तुझ्या अद्भुत कृत्यांकडे लक्ष दिले नाही, तुझ्या दयेच्या अनेक कृत्यांचे स्मरण केले नाही. तर समुद्राजवळ, तांबड्या समुद्राजवळ ते फितूर झाले.


तरीपण लोकांनी तुझे भय धरावे म्हणून तुझ्या ठायी क्षमा आहे.


त्यांनी देवाचा करार पाळला नाही; त्याच्या नियमशास्त्राप्रमाणे चालण्यास ते कबूल नव्हते;


आणि त्याने केलेली कृत्ये व त्याने त्यांना दाखवलेली अद्भुत कृत्ये ते विसरले.


पण तो कनवाळू असल्यामुळे त्यांच्या अपराधाची क्षमा करीत असतो, तो नाश करीत नाही; तो आपला कोप वारंवार आवरतो, आपला सगळा संताप भडकू देत नाही.


तरी हे प्रभू, तू सदय व कृपाळू देव आहेस; मंदक्रोध, दयामय व सत्यसंपन्न आहेस.


हे प्रभू, तू उत्तम व क्षमाशील आहेस आणि तुझा धावा करणार्‍या सर्वांवर विपुल दया करणारा आहेस.


मग परमेश्वराने मोशेला म्हटले, “मी ह्या लोकांना पाहिले आहे. हे ताठ मानेचे लोक आहेत.


मी हाक मारली पण तुम्ही आला नाहीत; मी आपला हात पुढे केला, पण कोणी लक्ष दिले नाही;


तरीपण माझे लोक मला विसरले आहेत, ते व्यर्थतेपुढे धूप जाळतात; त्यांनी त्यांच्या मार्गांत, त्यांच्या प्राचीन मार्गांत त्यांना ठोकर खायला लावले; भर घालून तयार न केलेल्या आडवाटांनी त्यांना जाण्यास लावले.


“सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी ह्या नगरावर व त्याच्या सर्व गावांवर जे अरिष्ट आणणार म्हणून म्हणालो ते सर्व आणीन, कारण माझी वचने ऐकू नयेत म्हणून त्यांनी आपली मान ताठ केली.”


पण त्यांनी माझे ऐकले नाही, आपला कान दिला नाही, त्यांनी आपली मान ताठ केली व आपल्या पूर्वजांपेक्षा अधिक वाईट केले.


तरी तिने दुष्ट आचरण करून माझ्या निर्णयांना इतर राष्ट्रांपेक्षाही अधिक विरोध केला, तिने सभोवतालच्या प्रदेशांपेक्षाही माझ्या नियमांचा अधिक विरोध केला; कारण त्यांनी माझ्या निर्णयांचा अव्हेर केला व माझ्या नियमाप्रमाणे ते चालले नाहीत.


आमचा देव प्रभू दयेचा व क्षमेचा सागर आहे; आम्ही त्याच्याबरोबर फितुरी केली


आपली वस्त्रे नव्हे, तर हृदये फाडा आणि परमेश्वर तुमचा देव ह्याच्याकडे वळा, कारण तो कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे; अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे.


इतके झाले तरी ते आपल्या शत्रूंच्या देशात असताना त्यांचा समूळ नाश करावा व त्यांच्याशी केलेला करार अगदी मोडून टाकावा, एवढा त्यांचा मी नाकार करणार नाही अथवा त्यांना मी तुच्छ मानणार नाही, कारण मी परमेश्वर त्यांचा देव आहे;


परमेश्वर मंदक्रोध व महापराक्रमी आहे; तरी तो पाप्यांना शासन केल्यावाचून राहणार नाही; परमेश्वर वादळात व तुफानात चालतो, मेघ त्याच्या चरणांची धूळ आहेत.


मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “कोठवर हे लोक मला तुच्छ लेखणार आणि ह्यांच्यामध्ये मी केलेली सगळी चिन्हे पाहूनही हे कोठवर माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत?


तेव्हा मोशे म्हणाला, “परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन का करता? ह्यात तुम्हांला यश यायचे नाही.


शिवाय, दुधामधाचे प्रवाह वाहणार्‍या देशात तू आम्हांला मुळीच आणलेले नाहीस अथवा शेते व द्राक्षमळे ह्यांचे वतन आम्हांला दिलेले नाहीस. ह्या लोकांच्या डोळ्यांत तू धूळ फेकतोस काय? आम्ही येत नाही.”


त्याचे ऐकण्याची आपल्या पूर्वजांची इच्छा नव्हती; तर त्यांनी त्याला धिक्कारले व आपले मन ‘मिसर देशाकडे फिरवून


कारण तो मोशेला म्हणतो, “ज्या कोणावर मी दया करतो त्याच्यावर मी दया करीन आणि ज्या कोणावर मी करुणा करतो त्याच्यावर मी करुणा करीन.”


जो बोलत आहे त्याचा अवमान करू नये म्हणून जपा; कारण पृथ्वीवर आज्ञा सांगणार्‍याचा अवमान करणारे जर निभावले नाहीत, तर स्वर्गातून आज्ञा सांगणार्‍यापासून बहकल्यास आपण विशेषेकरून निभावणार नाही.


परमेश्वर आपल्या थोर नामास्तव आपल्या लोकांचा त्याग करणार नाही, कारण परमेश्वराने कृपावंत होऊन तुम्हांला आपले प्रजाजन केले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan