Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 9:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तू सीनाय पर्वतावर उतरून त्यांच्याशी स्वर्गातून बोललास आणि त्यांना योग्य निर्णय, खरे कायदे, चांगले नियम व आज्ञा लावून दिल्या;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 मग तू सीनाय पर्वतावर उतरलास आणि त्यांच्याशी आकाशातून बोललास आणि तू त्यांना योग्य निर्णय, खरी शिकवण, चांगले नियम आणि आज्ञा दिल्यास.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 “तुम्ही सीनाय पर्वतावर खाली उतरले; त्यांच्याशी स्वर्गातून बोलले; त्यांना न्याय्य व योग्य विधी व कायदे दिले आणि उत्तम नियम व आज्ञा दिल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 9:13
27 Iomraidhean Croise  

आणि जे नियम, निर्णय, नियमशास्त्र व आज्ञा त्याने तुमच्यासाठी लिहून ठेवल्या आहेत त्या निरंतर पाळा; व अन्य देवांचे भय धरू नका.


हाच एज्रा बाबेलहून गेला; हा इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या मोशेच्या नियमशास्त्रात पारंगत शास्त्री होता; त्याचा देव परमेश्वर ह्याचा वरदहस्त त्याच्यावर होता, म्हणून राजाने त्याचा सर्व मनोरथ पूर्ण केला.


हे परमेश्वरा, तू न्यायी आहेस; तुझे निर्णय सरळ आहेत.


तुझे वचन संपूर्णपणे सत्य आहे; तुझे सर्व न्याय्य निर्णय सनातन आहेत.


तुझे विधी आम्ही मनःपूर्वक पाळावेत म्हणून तू ते आम्हांला लावून दिले आहेत.


तो त्यांना म्हणाला, “परमेश्वराचे सांगणे असे आहे की, उद्या विसाव्याचा दिवस, परमेश्वराचा पवित्र शब्बाथ आहे; तुम्हांला भाजायचे ते भाजा आणि शिजवायचे ते शिजवा. जे काही उरेल ते आपल्यासाठी सकाळपर्यंत ठेवा.”


तिसरा दिवस येईपर्यंत त्यांनी तयार राहावे, कारण तिसर्‍या दिवशी सर्व लोकांदेखत परमेश्वर सीनाय पर्वतावर उतरेल.


आणि देव हे सर्व शब्द बोलला :


तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांना असे सांग : मी तुमच्याशी आकाशातून भाषण केले ते तुम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे.


अहाहा! तू आकाश विदारून उतरतास, तुझ्या दर्शनाने पर्वत कंपायमान झाले असते, तर बरे होते!


तू अनपेक्षित भयप्रद कृत्ये करीत असता तुझ्या दर्शनाने राष्ट्रे थरथर कापली असती तर बरे होते!


देव तेमानाहून येत आहे, पवित्र प्रभू पारानाच्या पर्वतावरून येत आहे.(सेला) त्याचा प्रकाश आकाश व्यापतो; त्याच्या स्तवनांनी पृथ्वी भरली आहे.


जे मी इच्छीत नाही ते जर मी करतो तर नियमशास्त्र उत्तम आहे अशी मी संमती देतो.


तो म्हणाला, “परमेश्वर सीनायहून आला, सेईरावरून आमच्यावर1 उदय पावला; पारान पर्वतावरून तो प्रकटला, लक्षावधी पवित्रांच्या मधून तो आला, त्याच्या उजव्या हातापासून अग्निज्वाला निघाली.


तुम्ही ऐकले त्याप्रमाणे देवाच्या वाणीचे शब्द ऐकूनही दुसरे कोणी लोक जिवंत राहिले आहेत काय?


तुला शिक्षण द्यावे म्हणून आकाशातून त्याने आपली वाणी तुला ऐकवली आणि पृथ्वीवर त्याने तुला आपला महाअग्नी दाखवला आणि अग्नीमधून निघालेले त्याचे शब्द तू ऐकलेस.


हे सारे नियमशास्त्र मी आज तुम्हांला देत आहे. त्यातल्यासारखे यथार्थ विधी व नियम असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे?


परमेश्वराने त्या पर्वतावर अग्नीमधून तुमच्याशी तोंडोतोंड भाषण केले;


Lean sinn:

Sanasan


Sanasan