Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 9:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तू त्यांना दिवसा मेघस्तंभाने आणि रात्री ज्या वाटेने त्यांनी जायचे तिच्यावर प्रकाश मिळावा म्हणून अग्निस्तंभाने त्यांना नेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 दिवसा तू त्यांना मेघस्तंभाने मार्गदर्शन केलेस आणि रात्री अग्नीस्तंभाने त्यांच्या वाटेवर प्रकाश दिला अशासाठी की त्याप्रकाशात ते चालू शकतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 आमच्या पूर्वजांचे दिवसा मेघस्तंभाद्वारे व रात्री त्यांना आपल्या मार्गाने जाता यावे म्हणून अग्निस्तंभाद्वारे मार्गदर्शन केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 9:12
12 Iomraidhean Croise  

तथापि तू अति दयाळू असल्याकारणाने त्यांना तू रानात सोडून दिले नाहीस; दिवसा त्यांचा मार्गदर्शक मेघस्तंभ त्यांच्यावरून ढळला नाही आणि रात्रीचा प्रकाश देऊन नीट मार्ग दाखवणारा अग्निस्तंभही ढळला नाही.


त्यांच्यावर छत्र होण्यासाठी त्याने ढग पसरला, आणि रात्री प्रकाश देण्यासाठी अग्निस्तंभ दिला.


वस्तीच्या नगरास त्यांनी जावे म्हणून त्याने त्यांना सरळ मार्गाने चालवले.


प्रातःकाळी तुझ्या वात्सल्याचे शब्द मला ऐकू दे; कारण तुझ्यावर माझा भाव आहे; ज्या मार्गाने मी चालावे तो मला कळव कारण मी आपले चित्त तुझ्याकडे लावले आहे.


दिवसा मेघ व रात्रभर अग्निप्रकाश ह्यांच्या योगे तो त्यांना नेत असे.


तू आपल्या उद्धरलेल्या लोकांना स्वकरुणेने नेले आहे; आपल्या बलाने तू त्यांना आपल्या पवित्र निवासाकडे घेऊन गेला आहेस.


त्या दिवशी मी हात उचलून त्यांच्याबरोबर शपथ केली की, मी तुम्हांला मिसर देशातून काढून दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत अशा तुमच्यासाठी पाहिलेल्या देशात आणीन; तो देश सर्व देशांचा मुकुटमणी होय.


असे नित्य होत असे; दिवसा मेघ त्यावर छाया करी व रात्री तो अग्नीसारखा दिसे.


कधी कधी मेघ केवळ संध्याकाळपासून सकाळपर्यंत राहत असे आणि सकाळी तो हलला म्हणजे ते कूच करीत; दिवसा किंवा रात्री केव्हाही मेघ वरती गेला की ते कूच करीत.


तुमच्यासाठी वाटेत तळ देण्याचे ठिकाण शोधण्यास आणि रात्री अग्नीत व दिवसा मेघात प्रकट होऊन, ज्या वाटेने तुम्ही जायचे ती वाट तुम्हांला दाखवण्यास तो तुमच्यापुढे चालला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan