Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 9:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तू त्यांच्यासमोरून समुद्र दुभंग केला, असा की ते समुद्रामधून कोरड्या जमिनीवरून चालून गेले; धोंडा महाजलाशयात टाकावा त्याप्रमाणे तू त्यांचा पाठलाग करणार्‍यांना समुद्रतळी फेकले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 त्यांच्या डोळयांदेखत तू तांबडा समुद्र दुभागून दाखवलास. आणि ते समुद्रामधून कोरड्या जमिनीवरुन चालत गेले आणि त्यांचा पाठलाग करणाऱ्यांना खोल समुद्रात फेकून दिलेस जसा एखादा दगड खोल पाण्यात बुडावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 तुम्ही त्यांच्यासमोर समुद्र दुभागला, म्हणजे त्यांनी कोरड्या जमिनीवरून चालत जावे. परंतु त्यांचा पाठलाग करणार्‍यांना असे खोलात फेकले, जणू प्रचंड जलाशयात एखादा दगड फेकला जावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 9:11
16 Iomraidhean Croise  

त्याने समुद्राची कोरडी भूमी केली; ते नदीतून पायी पार गेले, तेव्हा आम्ही त्याच्या ठायी हर्ष पावलो.


त्याने समुद्र दुभागून त्यातून त्यांना पार नेले; त्याने पाणी राशीसारखे उभे केले.


परमेश्वर तुमच्यासाठी लढेल; तुम्ही शांत राहा.”


त्याने त्यांच्या रथांची चाके काढून ते चालवणे कठीण केले; तेव्हा मिसरी लोक म्हणू लागले, “आपण इस्राएलांपासून पळून जाऊ, कारण परमेश्वर त्यांच्या बाजूने मिसर्‍यांशी लढत आहे.”


पण इस्राएल लोक भरसमुद्रात कोरड्या जमिनीवरून चालून गेले; आणि उजवीकडील व डावीकडील पाणी त्यांच्यासाठी भिंतीसारखे झाले.


तू मिसर देशात चिन्हे व अद्भुत कृत्ये केलीस; आजवर इस्राएलात व इतर लोकांत ती करीत आला आहेस आणि आज आहे तसे तू आपले नाम केले आहेस.


बंधुजनहो, आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले;


जसे कोरड्या भूमीवरून तसे ते विश्वासाने तांबड्या समुद्रातून पार गेले; मिसरी लोक तसेच करण्याचा प्रयत्न करत असता बुडून गेले.


नंतर एका बलवान देवदूताने जात्याच्या एका मोठ्या तळीसारखा धोंडा उचलला ‘आणि’ तो समुद्रात ‘भिरकावून म्हटले, “‘अशीच’ ती ‘मोठी’ नगरी ‘बाबेल’ झपाट्याने टाकली जाईल ‘व ह्यापुढे कधीही सापडणार नाही;”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan