Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 9:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 फारो, त्याचे सेवक, त्याच्या देशाचे सर्व लोक ह्यांना चिन्हे व अद्भुत कृत्ये तू दाखवलीस; कारण ते त्यांच्याशी गर्वाने वागत होते हे तुला ठाऊक होते; तू आपल्या नामाचा महिमा प्रकट केला; तो आजवर आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 फारोला तू चमत्कार दाखवलेस. त्याचे अधिकारी आणि त्याची प्रजा यांच्यासाठी आश्चर्यकारक कृत्ये केलीस. कारण तुला माहित होते की, मिसर देशातील लोक त्यांच्याशी गर्वाने वागत होते. पण तू आपल्या नावासाठी केले ते आजवर आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 फारोह व त्याच्या अधिकाऱ्याविरुद्ध व त्याच्या प्रदेशातील सर्व लोकांविरुद्ध तुम्ही चिन्ह व चमत्कार केले, कारण ते लोक त्यांना किती कठोरपणाची वागणूक देत होते, हे तुम्हाला ठाऊक होते. तुमच्या नावाचा महिमा तुम्ही प्रकट केला आणि तो आजवर आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 9:10
32 Iomraidhean Croise  

तथापि त्यांनी व आमच्या पूर्वजांनी उन्मत्त होऊन आपली मान ताठ केली व तुझ्या आज्ञांचा अवमान केला;


त्यांना पुन्हा नियमशास्त्राप्रत आणावे म्हणून तू त्यांना बजावून सांगितले तरी त्यांनी उन्मत्त होऊन तुझ्या आज्ञांचा अवमान केला आणि जे निर्णय पाळल्याने मनुष्य जिवंत राहतो ते न जुमानता त्यांनी पाप केले; त्यांनी आपला खांदा जुवाखालून काढून घेतला, मान ताठ केली व ते ऐकतनासे झाले.


म्हणजे तू, केवळ तूच, परमेश्वर3 ह्या नावाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळू दे.


आता मला कळून आले की, सर्व देवांहून परमेश्वर श्रेष्ठ आहे. ज्या बाबतीत मिसर्‍यांनी इस्राएलाशी ताठ्याने वर्तन केले त्या बाबतीतही तो श्रेष्ठ ठरला.”


मग मी आपला हात पुढे करून मिसर देशात ज्या सर्व अद्भुत कृती करणार त्यांचा मारा मी त्याच्यावर करीन; मग तो तुम्हांला जाऊ देईल;


तेव्हा फारो म्हणाला, “हा कोण परमेश्वर की ज्याचे ऐकून मी इस्राएलास जाऊ द्यावे? मी त्या परमेश्वराला जाणत नाही, आणि इस्राएलास काही जाऊ देणार नाही.”


मग परमेश्वराने मोशेला म्हटले, “पाहा, तुला मी फारोचा देव करतो, आणि तुझा भाऊ अहरोन हा तुझा संदेष्टा होईल.


तथापि मी तुला आपले सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर प्रकट व्हावे ह्यासाठीच मी तुला राखले आहे.


तू बहुत पाहिले आहे ते ध्यानात ठेवत नाहीस; त्याचे कान उघडे आहेत पण तो ऐकत नाही.


ज्याने आपला प्रतापी भुज मोशेच्या उजव्या बाजूने चालवला, आपले नाम सर्वकाळ राहावे म्हणून ज्याने त्यांच्यापुढे समुद्र दुभागला,


खोर्‍यात उतरणार्‍या गुरांप्रमाणे परमेश्वराच्या आत्म्याने त्यांना विश्रांती दिली. ह्या प्रकारे आपले नाम प्रतापी व्हावे म्हणून तू आपल्या लोकांना नेले.


तू मिसर देशात चिन्हे व अद्भुत कृत्ये केलीस; आजवर इस्राएलात व इतर लोकांत ती करीत आला आहेस आणि आज आहे तसे तू आपले नाम केले आहेस.


तथापि माझ्या नामासाठी, ज्या राष्ट्रांमध्ये ते राहत होते त्यांच्यादेखत माझ्या नामाचा अपमान न व्हावा, म्हणून मी हे कार्य केले; मी त्यांना मिसर देशातून काढून त्या राष्ट्रांच्यादेखत त्यांना प्रकट झालो.


आता मी नबुखद्नेस्सर स्वर्गीच्या राजाचे स्तवन करतो, त्याचा जयजयकार करतो व त्याचा महिमा वर्णन करतो; कारण त्याची सर्व कृत्ये सत्य आहेत, त्याचे सर्व मार्ग न्याय्य आहेत; जे अभिमानाने चालतात त्यांना त्याला नीचावस्थेत लोटता येते.


तर स्वर्गीच्या प्रभूबरोबर तू उद्दामपणा केलास; त्याच्या मंदिरातील पात्रे तुझ्यापुढे आणली आहेत; तू, तुझे सरदार, तुझ्या पत्नी व उपपत्नी ही त्यांतून द्राक्षारस प्याली आहेत आणि रुपे, सोने, पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण ह्यांची घडलेली दैवते, ज्यांना दिसत नाही, ऐकता येत नाही व समजत नाही, त्यांचे तू स्तवन केलेस; पण ज्याच्या हाती तुझा प्राण आहे व ज्याच्या स्वाधीन तुझे सर्व व्यवहार आहेत त्या देवाला मान दिला नाहीस;


आता हे प्रभो, आमच्या देवा, तू आपल्या सामर्थ्यवान हाताने मिसर देशातून आपल्या लोकांना बाहेर आणले व आजच्याप्रमाणे आपला महिमा वाढवला. आम्ही पाप केले आहे; आम्ही दुराचरण केले आहे.


‘त्याने मिसर देशात’, तांबड्या समुद्रात व ‘रानात चाळीस वर्षे अद्भुत कृत्ये करून व चिन्हे दाखवून’ त्या लोकांना बाहेर नेले.


शास्त्रलेख फारोला असे सांगतो, “मी तुला पुढे केले आहे ते ह्याचकरता की, तुझ्याकडून मी आपला पराक्रम दाखवावा आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर प्रख्यात व्हावे.”


त्याप्रमाणेच तुमचा देव परमेश्वर ह्याने मिसर देशातून तुमच्यासाठी तुमच्यादेखत संकटे, चिन्हे, चमत्कार, युद्धे, पराक्रमी बाहू आणि उगारलेला हात ह्यांच्या योगे भयप्रद कृत्ये केली तशी कृत्ये करून देवाने आपल्यासाठी एखादे राष्ट्र इतर राष्ट्रांमधून काढून घेण्याचा कधी प्रयत्न केला काय?


तू प्रत्यक्ष पाहिलेली संकटे, चिन्हे व चमत्कार, तसेच पराक्रमी बाहू व उगारलेला हात ह्यांच्या योगे तुझा देव परमेश्वर ह्याने तुला काढून आणले हेही चांगले आठव. ज्या राष्ट्रांची तुला भीती वाटत आहे त्या सर्वांचे तुझा देव परमेश्वर तसेच करील.


तसेच तरुणांनो, वडिलांच्या अधीन राहा. तुम्ही सर्व जण एकमेकांची सेवा करण्यासाठी3 नम्रतारूपी कमरबंद बांधा; कारण “देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan