Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 8:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 त्यांनी तो ग्रंथ, तो देवाच्या शास्त्राचा ग्रंथ, स्पष्टीकरणासह वाचून दाखवला; वाचले तेवढे लोकांना चांगले समजले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 या लेवींनी देवाच्या नियमशास्त्राचा ग्रंथ वाचला. त्याचा अर्थ स्पष्टकरून लोकांस समजेल असा उलगडून सांगितला आणि ज्याचे पठण चालले होते ते लोकांस समजावे म्हणून त्यांनी हे विवरण केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 ते सर्व लोकांमध्ये जाऊन, वाचण्यात येणार्‍या परमेश्वराच्या नियमशास्त्रातील उतार्‍याचा अर्थ त्यांना समजावून सांगत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 8:8
16 Iomraidhean Croise  

यहूदा येथील सर्व लोक, सर्व यरुशलेमेतले रहिवासी, याजक, संदेष्टे, सर्व आबालवृद्ध ह्यांना बरोबर घेऊन राजा परमेश्वराच्या मंदिराकडे गेला; परमेश्वराच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व वचने त्याने लोकांना ऐकू येतील अशी वाचून दाखवली.


“तुम्ही आमच्याकडे पाठवलेले पत्र आमच्यासमोर स्पष्टपणे वाचण्यात आले.


नंतर सर्व लोक खाणेपिणे करण्यास, एकमेकांना ताटे वाढून पाठवण्यास व मोठा उत्सव करण्यास निघून गेले, कारण जी वचने त्यांना वाचून दाखवली होती ती त्यांना समजली होती.


येशूवा, बानी, शेरेब्या, यामीन, अक्कूब, शब्बथई, होदीया, मासेया, कलीता, अजर्‍या, योजाबाद, हानान व पलाया, हे लेव्यांसह नियमशास्त्राचा अर्थ लोकांना समजावून सांगत होते; व लोक आपल्या जागेवर उभे होते.


मग नहेम्या तिर्शाथा (प्रांताधिपती), एज्रा याजक, शास्त्री आणि लोकांना शिकवणारे लेवी हे सर्व लोकांना म्हणाले, “हा दिवस तुमचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ पवित्र आहे, तर शोक करू नका; रडू नका.” कारण ते लोक नियमशास्त्रातील वचने ऐकून रडू लागले होते.


ते आपल्या जागी उभे राहून दिवसाच्या एक प्रहरभर (तीन तास) आपला देव परमेश्वर ह्याच्या नियमशास्त्राचा ग्रंथ वाचत राहिले, व आणखी एक प्रहर आपली पातके कबूल करत आणि आपला देव परमेश्वर ह्याची उपासना करत राहिले.


ते प्रवेश करीत असता अधिपतीने त्यांच्यात मिसळून आत यावे; ते बाहेर जातानाही त्याने त्यांच्याबरोबर जावे.


मग परमेश्वराने मला उत्तर दिले की, “हा दृष्टान्त लिहून काढ, पाट्यांवर ठळक लिही; म्हणजे कोणीही तो वाचून धावत सुटावे.


मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे ह्यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रलेखांतील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला.


तेव्हा ते एकमेकांना म्हणाले, “तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करत होता तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय?”


तेव्हा त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन उघडले;


तेव्हा त्यांनी त्याला एक दिवस नेमून दिल्यावर त्या दिवशी पुष्कळ लोक त्याच्या बिर्‍हाडी आले; त्यांना देवाच्या राज्याविषयी साक्ष देण्याकरता आणि येशूविषयी मोशेच्या नियमशास्त्रावरून व संदेष्ट्यांच्या लेखांवरून खातरी करण्याकरता तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या विषयाची फोड करत होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan