Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 8:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 येशूवा, बानी, शेरेब्या, यामीन, अक्कूब, शब्बथई, होदीया, मासेया, कलीता, अजर्‍या, योजाबाद, हानान व पलाया, हे लेव्यांसह नियमशास्त्राचा अर्थ लोकांना समजावून सांगत होते; व लोक आपल्या जागेवर उभे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 बाजूला उभे असलेले लेवी घराण्यातील लोक समुदायाला नियमशास्त्र समजावून सांगत होते. त्या लेवीची नावे अशी: येशूवा, बानी, शेरेब्या, यामीन, अक्कूब, शब्बथई, होदीया, मासेया, कलीता, अजऱ्या, योजाबाद, हानान व पेलाया,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 लेवी—येशूआ, बानी, शेरेब्याह, यामीन, अक्कूब, शब्बथई, होदीयाह, मासेयाह, कलीता, अजर्‍याह, योजाबाद, हानान व पेलतियाह—यांनी तिथे उभे असलेल्या लोकांना नियमशास्त्राची माहिती स्पष्ट करून सांगितली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 8:7
27 Iomraidhean Croise  

मग राजाने मागे वळून इस्राएलाच्या सर्व मंडळीला आशीर्वाद दिला, तेव्हा ती सर्व मंडळी उठून उभी राहिली.


जे लेवी परमेश्वराच्या सेवेत प्रवीण होते त्या सर्वांना हिज्कीयाने आश्वासन दिले. ह्या प्रकारे शांत्यर्पणे करीत व आपल्या वाडवडिलांचा देव परमेश्वर ह्याचा धन्यवाद करीत त्या पर्वाचे सात दिवस ते उत्सव करीत राहिले.


जे लेवी सर्व इस्राएल लोकांना शिकवत असत व परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र झाले होते त्यांना त्याने सांगितले की, “इस्राएलाचा राजा दावीद ह्याचा पुत्र शलमोन ह्याने बांधलेल्या मंदिरात पवित्र कोश ठेवा; ह्यापुढे तुम्हांला आपल्या खांद्यांवर बोजा वागवण्याची जरूरी नाही; तर आता तुम्ही आपला देव परमेश्वर व त्याची प्रजा इस्राएल ह्यांची सेवा करा.


आमच्या देवाचा आमच्यावर वरदहस्त असल्यामुळे त्यांनी आमच्याकडे महली बिन लेवी बिन इस्राएल ह्याच्या वंशातला एक समंजस मनुष्य आणला; आणि शेरेब्या व त्याचे पुत्र व बांधव असे अठरा जण आणले;


होदीया, हाशूम, बेसाई,


सराया, अजर्‍या, यिर्मया,


आणि लेव्यांच्या मुख्यांपैकी शब्बथई व योजाबाद हे देवाच्या मंदिराच्या बाहेरच्या कामावर होते;


द्वारपाळ अक्कूब व तल्मोन आणि दरवाजे राखणारे त्यांचे भाऊबंद एकशे बहात्तर होते.


अजर्‍या, एज्रा, मशुल्लाम,


त्याच्यानंतर लेव्यांपैकी रहूम बिन बानी ह्याने डागडुजी केली. त्याच्याजवळच कईला जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी हशब्या ह्याने आपल्या जिल्ह्यातर्फे डागडुजी केली.


त्याच्या शेजारी दुसर्‍या एका भागी जेथे कोट वळसा घेतो व शस्त्रागाराकडे जाण्याची चढण लागते तेथे मिस्पाचा अधिकारी एजेर बिन येशूवा ह्याने डागडुजी केली.


त्याच्यानंतर बन्यामीन व हश्शूब ह्यांनी आपल्या घरासमोरच्या भागाची डागडुजी केली. त्यांच्या शेजारी अजर्‍या बिन मासेया बिन अनन्या ह्याने आपल्या घरानजीक डागडुजी केली.


नंतर सर्व लोक खाणेपिणे करण्यास, एकमेकांना ताटे वाढून पाठवण्यास व मोठा उत्सव करण्यास निघून गेले, कारण जी वचने त्यांना वाचून दाखवली होती ती त्यांना समजली होती.


लोकांनी मुद्दाम केलेल्या एका लाकडी पीठावर एज्रा शास्त्री उभा राहिला व त्याच्याजवळ उजवीकडे मतिथ्य, शेमा, अनाया, उरीया, हिल्कीया व मासेया हे उभे राहिले; व त्याच्या डावीकडे पदाया, मीशाएल, मल्खीया, हाशूम, हश्बद्दाना, जखर्‍या व मशुल्लाम हे उभे राहिले.


मग एज्राने देवाधिदेव परमेश्वर ह्याचा धन्यवाद केला; व सर्व लोकांनी आपले हात वर करून “आमेन! आमेन!” असे म्हटले आणि आपली डोकी लववून आणि आपली मुखे भूमीकडे करून परमेश्वरास प्रणाम केला.


त्यांनी तो ग्रंथ, तो देवाच्या शास्त्राचा ग्रंथ, स्पष्टीकरणासह वाचून दाखवला; वाचले तेवढे लोकांना चांगले समजले.


ते आपल्या जागी उभे राहून दिवसाच्या एक प्रहरभर (तीन तास) आपला देव परमेश्वर ह्याच्या नियमशास्त्राचा ग्रंथ वाचत राहिले, व आणखी एक प्रहर आपली पातके कबूल करत आणि आपला देव परमेश्वर ह्याची उपासना करत राहिले.


मग येशूवा, बानी, कदमीएल, शबन्या, बुन्नी, शेरेब्या, बानी व कनानी ह्यांनी लेव्यांच्या मंचांवर उभे राहून उच्च स्वराने आपला देव परमेश्वर ह्याचा धावा केला.


आणि परमेश्वराने मोशेच्या द्वारे त्यांना कळवलेले सर्व विधी तुम्ही इस्राएल लोकांना शिकवावेत.”


कारण याजकाच्या वाणीच्या ठायी ज्ञान असावे, त्याच्या तोंडून नियमशास्त्र ऐकण्यास लोकांनी आतुर असावे; कारण तो सेनाधीश परमेश्वराचा निरोप्या आहे;


ते याकोबाला तुझे नियम व इस्राएलाला तुझे नियमशास्त्र शिकवतील; ते तुला धूपाचा सुवास अर्पण करतील, तुझ्या वेदीवर नि:शेष होमबली अर्पण करतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan