Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 8:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 आपल्या सर्व नगरानगरांत व यरुशलेमेत त्यांनी लोकांना जाहीर करावे व कळवावे की, “पहाडावर जाऊन जैतून, रानजैतून, मेंदी, खजुरी आणि दाट पालवीचे वृक्ष ह्यांच्या डाहळ्या आणून शास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे मांडव घालावेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 लोकांनी सर्व नगरांमध्ये आणि यरूशलेमभर फिरुन अशी घोषणा करावी की, “डोंगराळ भागामध्ये जाऊन वेगवेगळया प्रकारच्या जैतून वृक्षांच्या फांद्या आणाव्या. देवदारू, खजुरी आणि सावली देणाऱ्या वृक्षांच्या फांद्या आणाव्या आणि त्यांचे तात्पुरते मांडव उभारावेत. नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे करावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 देशातील सर्व शहरांमध्ये आणि विशेषतः यरुशलेममध्ये हे वचन जाहीर करावेः “लोकांनी डोंगरावर जाऊन जैतून, रानजैतून, मेंदी, खजुरी व दाट पालवीच्या वृक्षांच्या फांद्या व डाहळ्या आणून त्याचे शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तात्पुरते मांडव तयार करावे व सणाच्या काळामध्ये या मांडवांमध्येच राहावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 8:15
9 Iomraidhean Croise  

सायंकाळी ते कबुतर त्याच्याकडे आले, आणि पाहा, त्याच्या चोचीत जैतून झाडाचे नुकतेच खुडलेले पान आहे असे त्याला दिसले; नोहा त्यावरून समजला की आता पृथ्वीवरचे पाणी आटले आहे.


परमेश्वराचे जे नेमलेले समय म्हणजे पवित्र मेळ्याचे दिवस तुम्ही नियमित वेळी जाहीर करायचे ते हे :


पहिल्या दिवशी तुम्ही चांगल्या झाडांची फळे, खजुरीच्या झावळ्या, दाट पालवीच्या झाडांच्या डाहळ्या, ओहळालगतची वाळुंजे ही आणून परमेश्वर तुमचा देव ह्याच्यासमोर सात दिवस उत्सव करावा.


“मला रात्री दृष्टान्त झाला तो असा : एक मनुष्य तांबड्या घोड्यावर स्वार झाला असून तळवटीतल्या मेंदीच्या झुडपांमध्ये उभा होता; त्याच्यामागे तांबडे, सावळे व पांढरे घोडे होते.


ते यरुशलेमेजवळ आले असता जैतुनाच्या डोंगरापाशी बेथफगे येथवर पोहचले तेव्हा येशूने दोघा शिष्यांना असे सांगून पाठवले की,


खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस बाहेर निघाले आणि गजर करत म्हणाले, “होसान्ना! प्रभूच्या नावाने येणारा’ इस्राएलाचा राजा ‘धन्यवादित असो!’


तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथे वर्षातून तीनदा म्हणजे बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण आणि मांडवांचा सण ह्या तिन्ही सणांत तुमच्यातील सर्व पुरुषांनी त्याच्यासमोर हजर राहावे; पण कोणीही परमेश्वरासमोर रिक्त हस्ते येऊ नये;


ह्यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा, शुभ्र झगे परिधान केलेला व हातांत झावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकर्‍यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan