Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 8:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 नंतर सर्व लोक खाणेपिणे करण्यास, एकमेकांना ताटे वाढून पाठवण्यास व मोठा उत्सव करण्यास निघून गेले, कारण जी वचने त्यांना वाचून दाखवली होती ती त्यांना समजली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 मग सर्व लोक मेजवानी घ्यायला गेले. खाद्यपेयात त्यांनी इतरांना सहभागी करून घेतले. अतिशय आनंदात त्यांनी हा विशेष दिवस साजरा केला. परमेश्वराची वचने त्यांना अखेर समजली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 म्हणून लोक मिष्टान्ने करून खाण्या-पिण्यासाठी आणि ताटे वाढून पाठविण्यासाठी गेले. तो दिवस मोठ्या आनंदाने उत्सव करण्याचा होता, कारण त्यांना देण्यात आलेले वचन आता त्यांना समजले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 8:12
25 Iomraidhean Croise  

त्यांनी त्या दिवशी परमेश्वरासमोर मोठ्या आनंदाने खाणेपिणे केले. नंतर त्यांनी दावीद राजाचा पुत्र शलमोन ह्याला दुसर्‍यांदा राजा नेमून परमेश्वरातर्फे अधिपती होण्यासाठी त्याला व याजकाच्या कामासाठी सादोकाला अभिषेक केला.


तेव्हा त्याने त्यांना सांगितले, “जा, मिष्टान्नाचे सेवन करा; गोडगोड पेये प्या व ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यांना वाढून पाठवा; कारण आजचा दिवस परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र आहे; तुम्ही उदास राहू नका; कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग होय.”


“शांत राहा, कारण आजचा दिवस पवित्र आहे; दु:ख करू नका.” असे म्हणून लेव्यांनी लोकांना शांत केले.


दुसर्‍या दिवशीही सर्व लोकांच्या पितृकुळांतील प्रमुख पुरुष, याजक व लेवी नियमशास्त्राची वचने लक्षपूर्वक ऐकण्यासाठी एज्रा शास्त्री ह्याच्याजवळ जमा झाले.


ह्या दिवशी यहूद्यांना आपल्या शत्रूंपासून विसावा प्राप्त झाला, ह्या महिन्यात दु:ख जाऊन आनंद झाला, आणि शोक जाऊन शुभदिन प्राप्त झाला, म्हणून तो पाळावा; हे दिवस आनंदोत्सव करण्यात, एकमेकांना भेटीची ताटे पाठवण्यात व गोरगरिबांना दानधर्म करण्यात घालवावेत.


त्याच्या तोंडची आज्ञा पाळण्यास मी माघार घेतली नाही; माझ्या स्वतःच्या मनोरथापलीकडे2 मी त्याच्या तोंडची वचने जतन करून ठेवली आहेत.


तुझे निर्बंध माझे सर्वकाळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहेत, कारण त्यांच्या योगे माझ्या मनाला हर्ष होतो.


ह्यामुळे मी तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्यापेक्षा प्रिय मानतो.


तुझ्या वचनांच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो; त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते.


तुझ्या निर्बंधांचा मार्ग हीच माझी धनसंपदा, असे मानून मी अत्यानंद करतो.


मी तुझ्या नियमांनी आनंदित होईन; मी तुझे वचन विसरणार नाही.


तू मला आपले नियम शिकवतोस म्हणून माझ्या मुखातून स्तुती बाहेर पडो.


हे परमेश्वरा, तू सिद्ध केलेल्या तारणाची मी उत्कंठा धरली आहे; तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद आहे.


सोन्यारुप्याच्या लक्षावधी नाण्यांपेक्षा तुझ्या तोंडचे नियमशास्त्र मला मोलवान आहे.


अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करतो.


मला तुझी वचने प्राप्त झाली ती मी स्वीकारली;1 तुझी वचने माझा आनंद, माझ्या जिवाचा उल्लास अशी होती; कारण हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तुझे नाम घेऊन मी आपणास तुझा म्हणवतो.


तेव्हा ते एकमेकांना म्हणाले, “तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करत होता तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय?”


कारण मला ठाऊक आहे की, माझ्या ठायी म्हणजे माझ्या देहस्वभावात काही चांगले वसत नाही; कारण इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही.


आणि त्यांच्यावरून पृथ्वीवर राहणारे आनंद व ‘उल्लास करतील’ व एकमेकांना भेटी पाठवतील; कारण त्या दोघा संदेष्ट्यांनी पृथ्वीवर राहणार्‍यांना पीडा दिली होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan