Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 8:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मग ते सर्व लोक एकचित्त होऊन पाणीवेशीजवळच्या चौकात एकत्र जमले व एज्रा शास्त्री ह्याला म्हणाले, “परमेश्वराने इस्राएल लोकांना विहित केलेला नियमशास्त्राचा मोशेकृत ग्रंथ घेऊन या.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 सर्व इस्राएल लोक पाणीवेशीच्या समोरच्या मोकळया जागेत एकत्र जमले. त्या सर्वांनी शास्त्री एज्राला परमेश्वराने इस्राएल लोकांस दिलेले मोशेचे नियमशास्त्राचे पुस्तक आणावयास सांगितले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 आता सर्व लोक जल वेशीसमोरील चौकात एकत्र जमले. आणि त्यांनी नियम शिकविणारा शिक्षक एज्राला विनंती केली की याहवेहने इस्राएली लोकांना दिलेले मोशेचे नियमशास्त्र त्याने बाहेर आणून सर्वांना वाचून दाखवावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 8:1
25 Iomraidhean Croise  

यहूदा येथील सर्व लोक, सर्व यरुशलेमेतले रहिवासी, याजक, संदेष्टे, सर्व आबालवृद्ध ह्यांना बरोबर घेऊन राजा परमेश्वराच्या मंदिराकडे गेला; परमेश्वराच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व वचने त्याने लोकांना ऐकू येतील अशी वाचून दाखवली.


हिल्कीयाने शाफान चिटणीस ह्याला सांगितले की, “परमेश्वराच्या मंदिरात मला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे.” मग हिल्कीयाने तो ग्रंथ शाफानास दिला.


यहूदा येथील सर्व लोक, यरुशलेमेतले सर्व रहिवासी, याजक, लेवी अशा सर्व आबालवृद्धांना बरोबर घेऊन राजा परमेश्वराच्या मंदिरात गेला; परमेश्वराच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व वचने त्याने लोकांना ऐकू येतील अशी वाचून दाखवली.


ह्यानंतर पारसाचा राजा अर्तहशश्त ह्याच्या कारकिर्दीत एज्रा बिन सराया बिन अजर्‍या बिन हिल्कीया


परमेश्वराच्या नियमशास्त्राचे अध्ययन करून त्याप्रमाणे चालण्याचा आणि इस्राएलास त्यातले नियम व निर्णय शिकवण्याचा एज्राने निश्‍चय केला होता.


एज्रा याजक शास्त्री असून परमेश्वराची आज्ञावचने व त्याने इस्राएलास विहित केलेले नियम ह्यांत पारंगत होता; त्याला अर्तहशश्त राजाने जे पत्र दिले त्याची नक्कल ही :


हाच एज्रा बाबेलहून गेला; हा इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या मोशेच्या नियमशास्त्रात पारंगत शास्त्री होता; त्याचा देव परमेश्वर ह्याचा वरदहस्त त्याच्यावर होता, म्हणून राजाने त्याचा सर्व मनोरथ पूर्ण केला.


हे योयाकीम बिन येशूवा बिन योसादाक ह्याच्या दिवसांत व नहेम्या प्रांताधिकारी व लेखक एज्रा याजक ह्यांच्या दिवसांत होते.


ते झरावेशीकडून नीट दावीदपुराच्या पायर्‍यांवरून कोटाच्या चढणीवर दाविदाच्या मंदिराच्या वरल्या भागाकडून पूर्वेस पाणीवेशीपर्यंत गेले.


(नथीनीम हे ओफेलात, पूर्वेकडल्या पाणीवेशीसमोर व पुढे आलेल्या बुरुजापर्यंत राहत होते.)


मग लोकांनी बाहेर जाऊन डाहळ्या आणल्या आणि आपापल्या घरांच्या धाब्यांवर, त्यांच्या अंगणांत, देवाच्या मंदिराच्या अंगणांत, पाणीवेशीच्या चौकात आणि एफ्राईम वेशीच्या चौकात मांडव घातले.


त्यातील वचने त्याने पहाटपासून दोन प्रहरपर्यंत पाणीवेशीसमोरच्या चौकात स्त्रीपुरुषांपुढे व ज्यांना ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते त्यांच्यापुढे वाचली, आणि सर्व लोकांनी नियमशास्त्राचा ग्रंथ कान देऊन ऐकला.


नियमशास्त्र व साक्ष ह्यांकडे पाहा! ह्याप्रमाणे ते न बोलल्यास त्यांच्यासाठी निश्‍चये प्रभातसमय नाही.


मग मोशेने आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी ते सर्व दर्शनमंडपाच्या दाराजवळ आणले आणि सर्व मंडळी जवळ येऊन परमेश्वरासमोर उभी राहिली.


माझा सेवक मोशे ह्याला सर्व इस्राएलसाठी म्हणून होरेबात मी दिलेले नियमशास्त्र, म्हणजे अर्थात नियम व निर्णय ह्यांचे स्मरण ठेवा.”


तेव्हा तो त्यांना म्हणाला, “प्रत्येक शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारातून नव्याजुन्या गोष्टी काढणार्‍या गृहस्थासारखा आहे.”


अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करता; तुम्ही स्वतःही आत जात नाही व आत जाणार्‍यांनाही आत जाऊ देत नाही.


“शास्त्री व परूशी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत;


म्हणून पाहा, मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी व शास्त्री ह्यांना पाठवतो; तुम्ही त्यांच्यातील कित्येकांना जिवे माराल व वधस्तंभावर खिळाल आणि कित्येकांना तुम्ही आपल्या सभास्थानांमध्ये फटके माराल व नगरोनगरी त्यांचा पाठलाग कराल;


जे स्थान तुझा देव परमेश्वर निवडील तेथे, त्याच्यासमोर सर्व इस्राएल लोक हजर होतील तेव्हा, हे नियमशास्त्र सर्व इस्राएलांना ऐकू येईल असे वाचून दाखव.


मग दानापासून बैर-शेबापर्यंतचे सर्व इस्राएल लोक व गिलादातले लोक बाहेर पडले व त्यांची मंडळी एकत्र येऊन मिस्पा येथे परमेश्वरासमोर जमा झाली.


तेव्हा सर्व लोक एकमताने उठले व एकमुखाने म्हणाले, “आपल्यापैकी कोणीही तंबूत जाणार नाही; आपल्यातल्या कोणीही परतायचे नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan