Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 7:70 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

70 पितृकुळांच्या प्रमुखांपैकी काहींनी ह्या कार्यास मदत केली. तिर्शाथाने एक हजार दारिक1 सोने, पन्नास कटोरे व पाचशे तीस याजकीय वस्त्रे एवढी भांडारात जमा केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

70 घराण्यांच्या काही प्रमुखांनी या कामाला मदत म्हणून दान दिले. राज्यपालाने एक हजार दारिक सोने, पन्नास वाट्या, याजकांसाठी पाचशे तीस वस्त्रे दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

70 त्यांच्यातील काही पुढार्‍यांनी कामासाठी देणग्या दिल्या. राज्यपालाने 1,000 दारिक सोने, धार्मिक विधींसाठी लागणारे 50 कटोरे, आणि याजकांसाठी पोशाखांचे 530 संच दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 7:70
15 Iomraidhean Croise  

तशीच पात्रे, फावडी व कटोरे ही बनवली होती; परमेश्वराच्या मंदिरातील ही जी पात्रे हीरामाने शलमोन राजासाठी बनवली होती ती सर्व उजळ पितळेची होती.


शुद्ध सोन्याचे काटे, कटोरे व प्याले व सोन्याच्या प्रत्येक सुरईसाठी सोने, त्याप्रमाणेच चांदीच्या प्रत्येक सुरईसाठी चांदी तोलून दिली.


हूरामाने हंडे, फावडी व कटोरे केले. ह्या प्रकारे हूरामाने शलमोन राजासाठी देवमंदिराचे जे काम करायचे होते ते संपवले.


तशीच त्याने दहा मेजे करून उजवीकडे पाच व डावीकडे पाच अशी मंदिरात ठेवली. त्याने सोन्याचे शंभर कटोरे केले.


ज्यांनी आपली मोहर केली ते हेच : हखल्याचा पुत्र नहेम्या तिर्शाथा (प्रांताधिपती) व सिद्कीया,


तिर्शाथा (प्रांताधिपती) ह्याने त्यांना सांगितले की, “उरीम व थुम्मीम धारण करणारा याजक उभा राहीपर्यंत तुम्ही कोणी परमपवित्र पदार्थ खाऊ नयेत.”


उंट चारशे पस्तीस व गाढवे सहा हजार सातशे वीस एवढी होती.


पितृकुळातील आणखी काही पुरुषांनी ह्या कामाच्या खजिन्यात वीस हजार दारिक सोने, आणि दोन हजार दोनशे माने1 रुपे पावती केले.


मग नहेम्या तिर्शाथा (प्रांताधिपती), एज्रा याजक, शास्त्री आणि लोकांना शिकवणारे लेवी हे सर्व लोकांना म्हणाले, “हा दिवस तुमचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ पवित्र आहे, तर शोक करू नका; रडू नका.” कारण ते लोक नियमशास्त्रातील वचने ऐकून रडू लागले होते.


नंतर एजोब झाडाची एक जुडी घेऊन ती पात्रातील रक्तात बुचकळावी आणि तिने त्यातले रक्त दरवाजाच्या कपाळपट्टीला व दोन्ही बाह्यांना लावावे, आणि सकाळपर्यंत कोणीही घराच्या दाराबाहेर जाऊ नये.


मोशेने अर्धे रक्त घेऊन कटोर्‍यात ठेवले आणि अर्धे वेदीवर शिंपडले.


ह्यांखेरीज, पेले, अग्निपात्रे, वाटगे, बहुगुणी, समया, चमचे, कटोरे वगैरे जेवढी सोन्याची होती त्यांचे सोने व जी चांदीची होती त्यांची चांदी गारद्यांच्या सरदाराने नेली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan