Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 6:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 आमचे हात दुर्बळ होऊन आमचे काम बंद पडावे म्हणून हे सर्व लोक आम्हांला घाबरवू पाहत होते. हे देवा, माझा हात दृढ कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 आमचे शत्रू आम्हास भीती दाखवायचा प्रयत्न करत होते. ते मनात म्हणत होते, “यहूदी घाबरतील आणि काम चालू ठेवण्याची उमेद त्यांच्यात राहणार नाही आणि भिंतीचे काम पुरे होणार नाही.” मग मी प्रार्थना केली, “देवा, मला बळ दे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 “यामुळे त्यांच्या हातातील शक्ती गळून पडेल व ते त्यांचे काम पूर्ण करू शकणार नाहीत” असा विचार करून ते आम्हाला भीती दाखविण्याचा प्रयत्न करीत होते. पण मी प्रार्थना केली, “आता माझे बाहू बळकट करा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 6:9
23 Iomraidhean Croise  

पण तुम्ही हिंमत धरा, तुमचे हात गळू देऊ नका, कारण तुमच्या कर्तृत्वाचे तुम्हांला फळ मिळेल.”


जे यरुशलेमकर कोटावर बसले होते त्यांना त्यांनी यहूदी भाषेत हे शब्द उच्च स्वराने सांगितले; हेतू हाच की त्यांना घाबरवून त्यांची धांदल उडवावी आणि नगर हस्तगत करावे.


त्यांच्या आसपासच्या लोकांनी चांदीची पात्रे, सोने, सामानसुमान, पशू व मोलवान वस्तू देऊन त्यांना साहाय्य केले; ह्यांखेरीज लोकांनी जे स्वसंतोषाने दिले ते वेगळेच.


हे माझ्या देवा, तोबिया, सनबल्लट, नोवद्या संदेष्ट्री आणि वरकड संदेष्टे मला घाबरवू पाहत होते; त्या सर्वांची ही कृती ध्यानात ठेव.


मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकलास; तू मला हिम्मत दिलीस तेव्हा माझ्या जिवाला सामर्थ्य प्राप्त झाले.


मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरवसा टाकीन.


तुझ्या पवित्रस्थानातून कार्य करणारा देव भयप्रद आहे, इस्राएलाचा देव आपल्या लोकांना बल व सामर्थ्य देतो. देव धन्यवादित असो.


हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरला आहे; मला कधी लज्जित होऊ देऊ नकोस.


तो भागलेल्यांना जोर देतो, निर्बलांना विपुल बल देतो.


तू भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो, मी तुझे साहाय्यही करता, मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो.


मग सरदार राजाला म्हणाले, “ह्या मनुष्याला जिवे मारा; कारण असले भाषण करून ह्या नगरात राहिलेल्या योद्ध्यांचे व सर्व लोकांचे हात तो निर्बळ करतो; हा मनुष्य ह्या लोकांचे हित नव्हे तर नुकसान करायला पाहतो.”


मी बाबेलच्या राजाचे भुज बळकट करीन, मी आपली तलवार त्याच्या हाती देईन; पण मी फारोचे भुज असे मोडीन की, एखाद्या भयंकर घायाळ झालेल्या मनुष्याप्रमाणे तो त्याच्यापुढे आक्रोश करील.


मी त्यांना परमेश्वराच्या ठायी बलवान करीन; ते त्याच्या नामाने येतील-जातील,” असे परमेश्वर म्हणतो.


परंतु त्याने मला म्हटले आहे, “माझी कृपा तुला पुरेशी आहे; कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते.” म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेषेकरून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन.


त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हांला असे दान द्यावे की, तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे;


शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा.


मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्वकाही करण्यास शक्तिमान आहे.


म्हणून ‘लोंबकळणारे हात व लटपटणारे गुडघे सरळ करा,’


आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने येशू ख्रिस्तामध्ये तुम्हांला पाचारण केले तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दु:ख सोसल्यावर, स्वतः तुम्हांला पूर्ण, दृढ व सबळ करील.


तेव्हा दावीद मोठ्या पेचात पडला; कारण लोक आपले पुत्र व कन्या ह्यांच्यासाठी शोकाकुल होऊन दाविदाला दगडमार करावा असे म्हणू लागले; पण दावीद आपला देव परमेश्वर ह्याच्यावर भिस्त ठेवून खंबीर राहिला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan