Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 6:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मी त्याला सांगून पाठवले की, “तू म्हणतोस तसा प्रकार काही घडलेला नाही. ही तुझ्या मनाची कल्पना आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तेव्हा मी सनबल्लटाला उलट उत्तर पाठवले की, “तू म्हणतोस तसे काही चाललेले नाही. या केवळ तुझ्याच मनातल्या कल्पना आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 तेव्हा मी त्याला असे उत्तर पाठविले, “तू जे काही बोलत आहेस त्यातील काहीही घडणार नाही; या सर्व तुझ्या कल्पनेतील गोष्टी आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 6:8
12 Iomraidhean Croise  

‘तू यहूदा देशात राजा आहेस’ असे स्वतःविषयी यरुशलेमेत जाहीर करावे म्हणून तू संदेष्टेही नेमले आहेस; हे वर्तमान राजाच्या कानी जाणार; ह्यासाठी आता आपण एकत्र जमून वाटाघाट करू.”


तुम्ही तर लबाड्या प्रवृत्त करणारे आहात. तुम्ही सर्व कवडीमोल वैद्य आहात.


त्याच्या तोंडचे शब्द अनीतीचे व कपटाचे असतात; त्याने सुबुद्धी व सद्वर्तन ही टाकून दिली आहेत.


माझा जीव घेण्यास टपणारे मला धरण्यासाठी फासे मांडतात; माझे अनिष्ट चिंतणारे अपकारक गोष्टी बोलतात, ते दिवसभर कपटाच्या मसलती करत राहतात.


अरे कपट करणार्‍या, तुझी जीभ तीक्ष्ण वस्तर्‍यासारखी अनर्थाची योजना करते.


न्यायाला अनुसरून दावा करणारा कोणी नाही, आणि सत्यास स्मरून खटला चालवणारा कोणी नाही; लोक पोकळ गोष्टींवर भिस्त ठेवतात, कपटाने बोलतात; ते उपद्रवरूप गर्भ धारण करतात आणि अनर्थाला जन्म देतात.


दोन्ही राजांची मने दुष्कृत्ये करण्याकडे वळतील; ते एका मेजावर बसून परस्परांबरोबर खोटे बोलतील; पण त्यातून काही निष्पन्न होणार नाही; कारण शेवट व्हायचा तो नेमलेल्या वेळीच होणार.


अहो सापाच्या पिलांनो, तुम्ही वाईट असता तुम्हांला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार.


तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही; कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो; कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे.


तेव्हा पौलाने म्हटले, “कैसराच्या न्यायासनापुढे मी उभा आहे; येथेच माझा न्याय झाला पाहिजे. मी यहूद्यांचा काही अपराध केला नाही, हे आपणही चांगले जाणता.


तो आल्यावर यरुशलेमेहून आलेल्या यहूद्यांनी त्याच्याभोवती उभे राहून ज्यांचा पुरावा त्यांना देता आला नाही असे पुष्कळ व भयंकर आरोप त्याच्यावर ठेवले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan