Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 6:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 त्या चिठ्ठीत असे लिहिले होते की, “निरनिराळ्या राष्ट्रांत अशी बातमी उठली आहे आणि गेशेमही असेच म्हणत आहे की तुझा व यहूदी लोकांचा बंड करण्याचा विचार आहे म्हणून तू हा कोट बांधत आहेस; ह्या अफवेवरून असे दिसते की, तू त्यांचा राजा होऊ पाहत आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 त्यामध्ये असे लिहीले होते. राष्ट्रांमध्ये एक अफवा पसरली आहे आणि गेशेमही हेच म्हणत आहे की, तू आणि यहूदी मिळून राजाविरुध्द बंड करायच्या बेतात आहात. म्हणूनच तुम्ही यरूशलेमेच्या तटबंदीची बांधकामे करत आहात. तू यहूदी लोकांचा नवा राजा होणार अशी अफवा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 त्या पत्रात असा मजकूर होता: “देशादेशात असे ऐकिवात येत आहे की—गेशेमचे म्हणणे आहे की हे सत्य आहे की, यहूदी लोक बंड करण्याची योजना आखीत आहेत आणि त्यासाठीच तू हा तट बांधत आहेस. असेही म्हटले जाते की तू त्यांचा राजा बनणार आहेस,

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 6:6
16 Iomraidhean Croise  

महाराजांना कळावे की जे यहूदी आपणाकडून निघून आले ते आमच्याकडे यरुशलेमेस येऊन पोहचले; त्यांनी ते बंडखोर व दुष्ट नगर बांधण्यास सुरुवात केली आहे; त्यांनी त्याचे कोट बांधून पुरे केले आहेत व पायाची दुरुस्ती होऊन चुकली आहे;


आपल्या वाडवडिलांच्या बखरी आपण शोधून पाहाल तर त्यावरून आपणांस कळून येईल की हे शहर बंडखोर असून राजांना व राष्ट्रांना उपद्रव करणारे आहे. प्राचीन काळापासून ह्यात राजद्रोह माजत आला आहे व ह्यामुळेच हे शहर उद्ध्वस्त केले होते.


हे ऐकून होरोनी सनबल्लट आणि अम्मोनी तोबीया नावाचा दास आणि गेशेम अरबी ह्यांनी आमची निर्भर्त्सना केली; आम्हांला तुच्छ लेखून ते म्हणाले, “तुम्ही हे काय मांडले आहे? राजाविरुद्ध बंड करता काय?”


मी घाबरावे व असले काम करून पापी ठरावे आणि माझी अपकीर्ती पसरण्यास त्याला काही निमित्त सापडावे म्हणून त्याला त्यांनी मोल देऊन ठेवले होते.


पाचव्या वेळी सनबल्लटाने आपल्या चाकराच्या हाती खुली चिठ्ठी देऊन त्याला माझ्याकडे पाठवले.


‘तू यहूदा देशात राजा आहेस’ असे स्वतःविषयी यरुशलेमेत जाहीर करावे म्हणून तू संदेष्टेही नेमले आहेस; हे वर्तमान राजाच्या कानी जाणार; ह्यासाठी आता आपण एकत्र जमून वाटाघाट करू.”


कारण मी पुष्कळांना कुजबुजताना ऐकतो; चोहोकडे दहशत आहे. मला ठेच लागावी म्हणून टपणारे माझे सर्व इष्टमित्र म्हणतात की त्याच्याविरुद्ध गिल्ला करा, आपण त्याच्याविरुद्ध गिल्ला करू; कदाचित तो फसेल, म्हणजे त्याच्याहून आपण प्रबळ होऊन त्याचा सूड उगवू.”


माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य.


आणि ते त्याच्यावर असा आरोप करू लागले की, “हा आमच्या राष्ट्राला फितवताना, कैसराला कर देण्याची मनाई करताना आणि मी स्वतः ख्रिस्त राजा आहे असे म्हणताना आम्हांला आढळला.”


हे ऐकून पिलाताने येशूला बाहेर आणले आणि तो फरसबंदी नावाच्या जागी न्यायासनावर बसला. इब्री भाषेत ह्या जागेला गब्बाथा म्हणतात.


आणि बरे घडून यावे म्हणून आपण वाईट करू या, असे आपण का म्हणू नये? — आम्ही असेच म्हणतो असा कित्येक लोक आमच्यावर आळ घेतात — अशा लोकांची दंडाज्ञा यथान्याय आहे.


गौरवाने व अपमानाने, अपकीर्तीने व सत्कीर्तीने, आम्ही आपली लायकी पटवून देतो; फसवणारे मानलेले तरी आम्ही खरे;


ते सद्भाव धरून द्या, ह्यासाठी की, तुमच्याविरुद्ध बोलणे चालले असता ख्रिस्तात तुमचे जे सद्वर्तन त्यावर आक्षेप घेणार्‍यांनी लज्जित व्हावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan