Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 6:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 ते माझ्यासमोर त्याच्या सत्कृत्यांची तारीफ करत आणि माझे शब्द त्याला जाऊन सांगत. तोबीया मला घाबरवण्याकरता पत्रे पाठवत असे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 तोबीया किती चांगला आहे हे ही माणसे मला सारखी सांगत. आणि मी काय करत असे ते तोबीयाला सांगत असत. मला भयभीत करण्यासाठी मग तोबीया मला पत्रे पाठवी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 याशिवाय, तोबीयाहने किती चांगली कामे केली आहेत, हे त्या सर्वांनी मला सांगितले व नंतर मी जे काही बोललो ते सर्व त्यांनी त्याला सांगितले आणि तोबीयाहने मला घाबरून सोडण्यासाठी पत्रे पाठवली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 6:19
10 Iomraidhean Croise  

मी घाबरावे व असले काम करून पापी ठरावे आणि माझी अपकीर्ती पसरण्यास त्याला काही निमित्त सापडावे म्हणून त्याला त्यांनी मोल देऊन ठेवले होते.


तो शखन्या बिन आरह ह्याचा जावई होता आणि त्याचा पुत्र योहानान ह्याने बरेख्याचा पुत्र मशुल्लाम ह्याच्या कन्येशी लग्न केले होते, म्हणून यहूदातल्या पुष्कळ लोकांनी त्याच्या बाजूने राहण्याची आणभाक केली होती.


आमचे हात दुर्बळ होऊन आमचे काम बंद पडावे म्हणून हे सर्व लोक आम्हांला घाबरवू पाहत होते. हे देवा, माझा हात दृढ कर.


कोट बांधण्याचे काम संपल्यावर मी त्याला दरवाजे बसवले आणि द्वारपाळ, गायक व लेवी ह्यांची नेमणूक केली;


शास्त्राज्ञा मोडणारे दुर्जनांची प्रशंसा करतात, पण नियमशास्त्र पाळणारे त्यांच्यावर संतापतात.


तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते; परंतु तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हांला जगातून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करते.


जगाने तुमचा द्वेष करावा हे शक्य नाही; पण ते माझा द्वेष करते, कारण त्याची कृत्ये वाईट आहेत अशी मी त्याच्याविषयी साक्ष देतो.


ते तर जगाचे आहेत म्हणून त्यांचे बोलणे जगाविषयी असते, आणि जग त्यांचे ऐकून घेते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan