Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 6:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 हे माझ्या देवा, तोबिया, सनबल्लट, नोवद्या संदेष्ट्री आणि वरकड संदेष्टे मला घाबरवू पाहत होते; त्या सर्वांची ही कृती ध्यानात ठेव.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 देवा, कृपाकरून तोबीया आणि सनबल्लट यांची आठवण ठेव आणि त्यांनी केलेली दृष्कृत्ये आठव. मला भय दाखवणारी नोवद्या ही संदेष्टी आणि इतर संदेष्टे यांचेही स्मरण असू दे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 हे माझ्या परमेश्वरा, तोबीयाह, सनबल्लट हे माझ्याशी कसे वागले हे विसरू नका. नोअद्याह संदेष्टी व इतर संदेष्टे ज्यांनी मला भीती घालण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही तुम्ही विसरू नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 6:14
26 Iomraidhean Croise  

हे माझ्या देवा, त्यांनी याजकपद भ्रष्ट केले आहे आणि याजकवृत्तीचा व लेवीवृत्तीचा करार मोडला आहे, म्हणून त्यांची आठवण ठेव.


हे माझ्या देवा, जे काही मी ह्या देशाच्या लोकांसाठी केले त्याचे तू स्मरण करून माझे बरे कर.


हे परमेश्वरा, अदोमी लोकांविरुद्ध यरुशलेमेच्या त्या दिवसाची आठवण ठेव; ते म्हणाले, “ती पाडून टाका, पायापर्यंत जमीनदोस्त करा.”


माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? माझा दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव करण्यास तू जवळ नाहीस.


हे देवा, तू माझा देव आहेस; मी आस्थेने तुझा शोध करीन; शुष्क, रुक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे, माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे.


मग अहरोनाची बहीण मिर्याम संदेष्ट्री हिने हाती डफ घेतला आणि सर्व स्त्रिया डफ घेऊन तिच्यामागून नाचत चालल्या.


ह्यास्तव ज्या संदेष्ट्यांना मी पाठवले नाही व जे माझ्या नामाने संदेश देतात व म्हणतात, ह्या देशावर तलवार व दुष्काळ येणार नाही, त्यांच्यासंबंधाने परमेश्वर म्हणतो, हे संदेष्टे तलवारीने व दुष्काळाने नष्ट होतील;


मी वनात जातो तर पाहा, तेथे तलवारीने वधलेले आहेत! शहरात येतो तर दुष्काळाने पिडलेले मला आढळतात; कारण संदेष्टे व याजक हे अज्ञात देशात भटकत आहेत.”’


नंतर असे झाले की त्याच वर्षी यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्या कारकिर्दीच्या आरंभी चौथ्या वर्षाच्या पाचव्या महिन्यात गिबोनकर संदेष्टा हनन्या बिन अज्जूर ह्याने परमेश्वराच्या मंदिरात याजकांसमोर व सर्व लोकांसमोर मला असे सांगितले की,


तेव्हा हनन्या संदेष्ट्याने यिर्मया संदेष्ट्याच्या मानेवर असलेले जोखड काढून मोडले.


मग यिर्मया संदेष्टा हनन्या संदेष्ट्याला म्हणाला : “हनन्या, आता हे ऐक; परमेश्वराने तुला पाठवले नाही; तू ह्या लोकांना लबाडीवर भरवसा ठेवायला लावलेस.


पुष्कळ खोटे संदेष्टे उठतील व अनेकांना फसवतील.


कारण खोटे ख्रिस्त व ‘खोटे संदेष्टे’ उठतील व साधेल तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून मोठी ‘चिन्हे व अद्भुते दाखवतील.’


खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेषाने तुमच्याकडे येतात, पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत.


यान्नेस व यांब्रेस ह्यांनी जसे मोशेला अडवले, तसे हेही सत्याला अडवतात; हे लोक भ्रष्टबुद्धी बनलेले व विश्वासासंबंधाने पसंतीस न उतरलेले असे आहेत,


ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करताना आपल्या बंधूला कोणी पाहिले, तर त्याने त्याच्याकरता देवाजवळ मागावे म्हणजे तो त्याला जीवन देईल; अर्थात ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करणार्‍यास ते देईल. ज्याचा परिणाम मरण आहे असेही पाप आहे; आणि ह्याविषयी मागावे असे मी म्हणत नाही.


मग श्वापद धरले गेले आणि त्याच्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला; त्याने श्वापदाची खूण धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला नमन करणार्‍या लोकांना त्याच्यासमोर चिन्हे करून ठकवले होते. ह्या दोघांना ‘जळत्या गंधकाच्या’ अग्निसरोवरात जिवंत टाकण्यात आले;


Lean sinn:

Sanasan


Sanasan