Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 6:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 विचार करता मला असे दिसून आले की, देवाने त्याला पाठवले नाही; तरी ही भविष्यवाणी त्याने माझ्याविरुद्ध सांगितली; तोबिया व सनबल्लट ह्यांनी त्याला मोल देऊन ठेवले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 शमायाला देवाने पाठवले नव्हते हे मला माहीत होते, पण तरीही त्याने माझ्याविरुध्द भाकीत केले कारण तोबीया आणि सनबल्लटाने त्यास त्याबद्दल पैसे चारले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 नंतर मला समजले की परमेश्वराने त्याला पाठविले नव्हते, परंतु तोबीयाह व सनबल्लट यांनी माझ्याविरुद्ध भविष्यवाणी करण्यासाठी त्याला लाच दिली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 6:12
20 Iomraidhean Croise  

मी म्हणालो, “माझ्यासारख्या माणसाने पळून जावे काय? मंदिरात जाऊन आपला जीव वाचवावा असा माझ्यासारखा कोण आहे? मी मंदिरात जाणारच नाही.”


मी घाबरावे व असले काम करून पापी ठरावे आणि माझी अपकीर्ती पसरण्यास त्याला काही निमित्त सापडावे म्हणून त्याला त्यांनी मोल देऊन ठेवले होते.


ते अधाशी कुत्रे आहेत; त्यांना तृप्ती कशी ती ठाऊक नाही; ते मेंढपाळ ज्ञानशून्य आहेत; चोहोकडून आपला स्वार्थ साधण्यासाठी ते एकंदर आपापल्या मार्गास लागले आहेत.


परमेश्वर मला म्हणाला, “संदेष्टे माझ्या नामाने असत्य संदेश देतात; मी त्यांना पाठवले नाही, मी त्यांच्याबरोबर बोललो नाही; ते खोटा दृष्टान्त, शकुन, निरर्थक गोष्टी व आपल्या मनातील कपटयोजना संदेशरूपाने तुम्हांला सांगतात.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “तुम्हांला संदेश देणार्‍या संदेष्ट्यांची वचने ऐकू नका, ते तुम्हांला फसवतात; ते आपल्याच मनाप्रमाणे दृष्टान्त सांगतात, परमेश्वराच्या मुखातला सांगत नाहीत.


‘मी स्वप्न पाहिले आहे, स्वप्न पाहिले आहे,’ असे म्हणून माझ्या नावाने असत्य संदेश देतात, ते संदेष्टे काय बोलतात ते मी ऐकले आहे.


मग यिर्मया संदेष्टा हनन्या संदेष्ट्याला म्हणाला : “हनन्या, आता हे ऐक; परमेश्वराने तुला पाठवले नाही; तू ह्या लोकांना लबाडीवर भरवसा ठेवायला लावलेस.


लबाडीस कान देणार्‍या माझ्या लोकांना तुम्ही लबाडी सांगून, जे मरू नयेत त्यांना मारून व जे जगू नयेत त्यांना वाचवून मूठभर जवासाठी व भाकरीच्या तुकड्यासाठी तुम्ही माझ्या लोकांसमोर माझा अवमान केला आहे.


कारण ज्या नीतिमानास मी दुखवले नाही त्याचे मन तुम्ही खोटे बोलून दुखवता, आणि दुष्टाने आपल्या कुमार्गापासून वळू नये, आपला जीव वाचू नये असे तुम्ही त्याच्या हाताला बळ देता;


तुम्ही निरर्थक दृष्टान्त पाहिला, खोटा शकुन सांगितला आणि मी बोललो नसता, हे ‘परमेश्वराचे वचन’ असे तुम्ही म्हणाला की नाही?


तिचे प्रमुख लाच खाऊन न्याय करतात, तिचे याजक वेतन घेऊन शिक्षण देतात, तिचे संदेष्टे पैसे घेऊन भविष्य सांगतात; तरी ते परमेश्वरावर अवलंबून म्हणतात की, “परमेश्वर आमच्या ठायी नाही काय? आमच्यावर काही अनिष्ट येणार नाही.”


मी कोणाच्या सोन्याचा, रुप्याचा किंवा वस्त्राचा लोभ धरला नाही.


एखाद्याला अद्भुत कार्ये करण्याची शक्ती; एखाद्याला संदेश देण्याची शक्ती; एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती; एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते;


जो आध्यात्मिक आहे तो तर सर्व गोष्टी पारखतो, तरी त्याची स्वतपारख कोणाकडूनही होत नाही.


तो मद्यपी व मारका नसावा; तर सौम्य, भांडण न करणारा, द्रव्यलोभ न धरणारा,


अध्यक्ष2 हा देवाचा कारभारी आहे म्हणून तो निर्दोष असला पाहिजे; तो स्वच्छंदी, रागीट, मद्यपी, मारका, अनीतीने पैसे मिळवणारा नसावा;


तुमच्यामधील देवाच्या कळपाचे पालन करा; करावे लागते म्हणून नव्हे, तर (देवाच्या इच्छेप्रमाणे) संतोषाने त्याची देखरेख करा; द्रव्यलोभाने नव्हे तर उत्सुकतेने करा;


ते लोभ धरून बनावट गोष्टी सांगतील आणि तुमच्यावर पैसे मिळवतील; त्यांच्याकरता नेमलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करत नाही, आणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही.


प्रियजनहो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत ह्याविषयी त्यांची परीक्षा करा; कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगात उठले आहेत.


दालचिनी, सुगंधी उटणी, धूपद्रव्ये, सुगंधी तेल, ऊद, द्राक्षारस, जैतुनाचे तेल, सपीठ, गहू, गुरे, मेंढरे, घोडे, रथ, गुलाम, व ‘मनुष्यांचे जीव’ हा त्यांचा माल कोणी घेत नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan