नहेम्या 6:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 मग मी शमाया बिन दलाया बिन महेटाबेल ह्याच्या घरी आलो. तो दार लावून घेऊन आत बसला होता; त्याने म्हटले, “चल, आपण देवाच्या मंदिरातील आतल्या गाभार्यात जमून मंदिराची दारे बंद करून घेऊ; कारण ते लोक तुझा घात करण्यास येतील; ते रात्रीचे तुझा घात करण्यास येतील.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मी एकदा दलायाचा पुत्र शमाया याच्या घरी गेलो. दलाया हा महेतबेलचा पुत्र. शमायाला आपल्या घरीच थांबून रहावे लागले होते. तो म्हणाला “आपण देवाच्या मंदिरात भेटू. आत पवित्र जागेत जाऊन आपण दरवाजे बंद करु, कारण ते तुला ठार मारायला येत आहेत. ते आज रात्रीच तुला ठार मारायला येतील.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 एक दिवस मी महेटाबेलाचा पुत्र दलायाहचा पुत्र शमायाह याच्या घरी गेलो, जो त्याच्या घराबाहेर पडत नसे. तो म्हणाला, “आपण परमेश्वराच्या भवनात भेटू या, मंदिराची दारे व कड्या लावून घेऊ, कारण तुला ठार मारण्यास माणसे येत आहेत—आज रात्री ते तुला ठार करण्यासाठी येतील.” Faic an caibideil |