नहेम्या 5:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मी त्यांना म्हटले की, “जे आपले यहूदी भाऊबंद परराष्ट्रांस विकले गेले होते त्यांची आम्ही शक्तिनुसार सोडवणूक केली; पण तुम्ही आपल्या भाऊबंदांची विक्री चालवली आहे काय? त्यांना तुम्ही आम्हांला विकणार काय?” हे ऐकून ते स्तब्ध राहिले; त्यांनी चकार शब्दही काढला नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 आणि त्यांना मी म्हणालो, “आपले यहूदी बांधव इतर देशामध्ये गुलाम म्हणून विकले गेले होते. त्यांना पुन्हा विकत घेऊन मुक्त करण्याचे आपण सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु तुम्ही त्यांना गुलामासारखे विकत आहा!” ते लोक गप्प राहिले आणि त्यांना काही बोलायला जागा उरली नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 या सभेत मी त्यांना म्हणालो, “आम्ही गैरयहूद्यांना गुलामगिरीत विकलेल्या आपल्या यहूदी बांधवांना शक्य होईल तितक्यांना परत आणले आहे. आता तुम्ही मात्र तुमच्याच लोकांना विकून, त्यांना पुन्हा आम्हाला विकत आहात! त्यांची सुटका आम्ही किती वेळा करावी?” हे ऐकून ते स्तब्ध राहिले कारण त्यांना त्यावर उत्तरच सापडले नाही. Faic an caibideil |