Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 5:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 माझ्या पूर्वीचे अधिपती प्रजेवर बोजा लादत व त्यांच्यापासून भाकरी, द्राक्षारस घेऊन आणखी चाळीस शेकेल चांदी घेत असत. त्यांचे सेवकदेखील लोकांवर अधिकार गाजवत, पण मी तसे केले नाही, कारण मला देवाचे भय होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 पण माझ्या आधी सतेवर असलेले राज्यपाल लोकांवर भारी बोजा लादित व त्यांच्यापासून भाकरी, द्राक्षरस घेऊन आणखी प्रत्येकी चाळीस शेकेल रुपे घेत असत. त्यांचे सेवक देखील लोकांवर जुलूम करीत असत. पण मी तसे केले नाही कारण मला देवाचे भय होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 पण माझ्यापूर्वी असलेल्या राज्यपालांनी लोकांवर फारच जड ओझी लादली आणि त्यांच्याकडून अन्न व द्राक्षारसाशिवाय चांदीची चाळीस शेकेल यांची मागणी ते करीत असत. त्यांचे उपाधिकाराही प्रजेचे शोषण करीत. परंतु मी परमेश्वराच्या भयात राहून त्यांच्याप्रमाणे वागलो नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 5:15
19 Iomraidhean Croise  

अब्राहाम म्हणाला, “ह्या ठिकाणी देवाचे भय अगदी नाही, म्हणून हे लोक माझ्या बायकोसाठी माझा घात करतील असे मला वाटले.


योसेफ त्यांना तिसर्‍या दिवशी म्हणाला, “मी देवाचे भय बाळगणारा आहे, म्हणून हेच करा म्हणजे तुमचा जीव वाचेल;


मग मी कोटाचे काम नेटाने चालवले; आमच्या लोकांनी काही जमीन विकत घेतली नाही; माझे सर्व सेवक कामासाठी तेथे एकत्र झाले होते.


मी आणखी म्हणालो, “तुम्ही जे करीत आहात ते ठीक नाही; आपले शत्रू जे विदेशी लोक त्यांच्यामध्ये आपली अपकीर्ती होत आहे, म्हणून तुम्ही आपल्या देवाचे भय धरून चालू नये काय?


देवापासून येणार्‍या विपत्तीचा मला धाक असे; त्याच्या प्रभावापुढे माझे काही चालत नसे.


परमेशाचे स्तवन करा!1 जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य!


जे परमेश्वराचे भय धरतात, जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करतात त्यांच्यावर तो संतुष्ट होतो.


दया व सत्य ह्यांच्या योगाने पापाचे क्षालन होते, आणि परमेश्वराचे भय बाळगल्याने माणसे दुष्कर्मापासून दूर राहतात.


अधिपती खोट्या गोष्टीला कान देणारा असला, तर त्याचे सर्व सेवक दुष्ट बनतात.


परमेश्वराचे भय बाळगून त्याच्या सेवकाचे ऐकणारा असा तुमच्यामध्ये कोण आहे? जो अंधारात चालतो, ज्याला प्रकाश मिळत नाही त्याने परमेश्वराच्या नामावर भाव ठेवावा, आपल्या देवाचा आश्रय करावा.


मग मी अनाथोथातले ते शेत माझा चुलतभाऊ हानामेल ह्याच्यापासून विकत घेतले व त्याला त्याचे मोल सतरा शेकेल रुपे तोलून दिले.


दास आमच्यावर सत्ता करतात; त्यांच्या हातातून आम्हांला सोडवणारा कोणी नाही.


आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करत असलात तर त्यात विशेष काय करता? परराष्ट्रीयही तसेच करतात ना?


आणि मी तुमच्याजवळ असता मला उणे पडले तेव्हाही मी कोणावर भार घातला नाही; कारण मासेदोनियाहून आलेल्या बंधूंनी मला पडलेली उणीव भरून काढली; आणि कोणत्याही प्रकारे तुमच्यावर माझा भार पडू नये म्हणून मी जपलो व जपेनही.


कारण मी आपला भार तुमच्यावर टाकला नाही, ह्याखेरीज कोणत्या गोष्टीत इतर मंडळ्यांपेक्षा तुम्ही कमी ठरलात? माझ्या ह्या अपराधाची क्षमा करा.


तो तुमचे धान्य व द्राक्षांचे मळे ह्यांचा एक दशमांश घेऊन आपले खोजे व चाकर ह्यांना देईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan