Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 5:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 ह्यावर मी आपला पदर झटकून म्हणालो, “जो कोणी ह्या वचनाप्रमाणे करणार नाही त्याला परमेश्वर त्याच्या घरातून व त्याच्या उद्योगावरून झटकून टाकील ह्याप्रमाणे तो झटकला जाऊन खंक होईल.” तेव्हा सर्व मंडळीने म्हटले, “आमेन” व त्यांनी परमेश्वराचे स्तवन केले. मग लोकांनी आपण दिलेल्या वचनाप्रमाणे केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 मग मी आपला पदर झटकून म्हणालो, “आपले वचन जो पाळणार नाही त्यास देव त्यांना त्यांच्या घरातून आणि मालमत्तेपासून झटकून टाकील. तो मनुष्य सर्वस्वाला मुकेल.” ते सर्व म्हणाले, “आमेन!” मग त्यांनी परमेश्वराचे गुणगान केले. आपल्या वचनाप्रमाणे लोक वागले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 व माझ्या अंगरख्याची दुमड धरून तो झटकून म्हटले, “जो कोणी या शपथेचे पालन करणार नाही, परमेश्वर त्याची घरे व त्याची संपत्ती असेच झटकून टाकेल. तर असा मनुष्य असाच झटकला जाऊन पूर्णपणे रिकामा होवो!” यावर सभेतील सर्व लोक म्हणाले, “आमेन” आणि त्यांनी याहवेहची स्तुती केली. सर्व लोकांनी आपल्या वचनाप्रमाणे केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 5:13
17 Iomraidhean Croise  

मग राजाने पीठावर उभे राहून परमेश्वरासमोर असा करार केला की, “मी परमेश्वराचे अनुसरण करीन व त्याच्या आज्ञा, निर्बंध व नियम जिवेभावे पाळीन, ह्या ग्रंथात लिहिलेली सर्व वचने पाळीन.” तेव्हा सर्व लोकांनी तो करार मान्य केला.


इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचा अनादी काळापासून अनंत काळापर्यंत धन्यवाद होवो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणून परमेश्वराचे स्तवन केले.


मग एज्राने देवाधिदेव परमेश्वर ह्याचा धन्यवाद केला; व सर्व लोकांनी आपले हात वर करून “आमेन! आमेन!” असे म्हटले आणि आपली डोकी लववून आणि आपली मुखे भूमीकडे करून परमेश्वरास प्रणाम केला.


तुझे न्याय्य निर्णय पाळीन अशी शपथ मी वाहिली आहे, व ती निश्‍चित केली आहे.


देवाला आभाररूपी यज्ञ कर; परात्परापुढे आपले नवस फेड;


परमेश्वर तुमचा देव ह्याला नवस करा व ते फेडा; ज्याचे भय धरले पाहिजे त्याला त्याच्या सभोवतालच्या सर्वांनी नजराणे आणावेत.


शास्त्राज्ञा मोडणारे दुर्जनांची प्रशंसा करतात, पण नियमशास्त्र पाळणारे त्यांच्यावर संतापतात.


नवस करावा आणि तो फेडू नये ह्यापेक्षा तो मुळीच न करणे बरे.


म्हणजे तुझे पोट फुगवण्यासाठी व तुझी मांडी सडवण्यासाठी हे शापजनक जल तुझ्या आतड्यांत शिरेल.’ ह्यावर त्या स्त्रीने ‘आमेन, आमेन’ असे म्हणावे.


जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही व तुमची वचने ऐकणार नाही, त्याच्या घरातून किंवा नगरातून निघताना आपल्या पायांची धूळ झटकून टाका.


त्यामुळे ते आपल्या पायांची धूळ त्यांच्यावर झटकून इकुन्यास गेले.


परंतु ते त्याला अडवून अपशब्द बोलू लागले, तेव्हा त्याने आपली वस्त्रे झटकून त्यांना म्हटले, “तुमचे रक्त तुमच्याच माथ्यावर; मी निर्दोष आहे; आतापासून मी परराष्ट्रीयांकडे जाणार.”


तू केवळ आत्म्याने धन्यवाद केलास, तर जो अशिक्षित लोकांपैकी आहे तो तुझ्या उपकारस्तुतीला “आमेन” कसे म्हणेल? कारण तू जे बोलतोस ते त्याला समजत नाही.


तेव्हा शमुवेल त्याला म्हणाला, “परमेश्वराने इस्राएलावरील तुझे राजपद तुझ्यापासून काढून घेऊन ते तुझ्याहून जो बरा अशा तुझ्या एका शेजार्‍याला दिले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan