Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 5:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 तेव्हा लोकांनी व त्यांच्या स्त्रियांनी आपल्या यहूदी भाऊबंदांविरुद्ध मोठी ओरड केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 तेव्हा मनुष्यांनी आणि त्यांच्या बायकांनी आपल्या यहूदी बांधवांविरुध्द तक्रार करायला सुरुवात केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 काही काळानंतर स्त्रीपुरुषांनी आपल्या यहूदी बांधवांविरूद्ध तक्रार करण्यास सुरुवात केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 5:1
15 Iomraidhean Croise  

मी आपले कपडे उतरवीत नसे; तसेच माझे भाऊबंद, माझे चाकर आणि माझ्यामागून चालणारे गारदी कोणीही आपले कपडे उतरवीत नसत; ते सर्व आपापली शस्त्रे हाती घेऊन पाण्याला जात.


त्यांच्या करणीमुळे कंगालांचा आक्रोश त्याच्यापर्यंत गेला; दीनांची आरोळी त्याच्या कानी गेली.


परमेश्वर म्हणाला, “मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे, त्यांच्या मुकादमांच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे; त्यांचे क्लेश मी जाणून आहे;


कारण सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्राएलाचे घराणे; त्यातील त्याची आवडीची लागवड म्हणजे यहूदाचे लोक; त्याने न्याय्यत्वाची अपेक्षा केली तर अपहार, नीतिमत्तेची अपेक्षा केली तर आक्रोश आढळून आला.


सिद्कीया राजाने त्या वेळी यरुशलेमेत असलेल्या सर्व लोकांबरोबर बंधमुक्त करण्याचा करार केल्यावर परमेश्वराकडून यिर्मयाला वचन प्राप्त झाले ते हे :


प्रभू परमेश्वर म्हणतो, इस्राएलाच्या अधिपतींनो, झाले ते पुरे; आता तुम्ही बलात्कार व जुलूम ह्यांपासून दूर राहा, न्याय व नीती ह्यांचे पालन करा, आणि माझ्या लोकांना त्यांच्या वतनांतून घालवून देण्याचे सोडा, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


तसेच आसवे गाळणे, रडणे व उसासे टाकणे ह्यांनी परमेश्वराच्या वेदीला तुम्ही इतके झाकून टाकले आहे की तो यज्ञार्पणाकडे ढुंकून पाहत नाही; तुमच्या हातून ते आवडीने घेत नाही.


तर देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय?


मग दुसर्‍या दिवशी कोणी भांडत असता तो त्यांच्यापुढे येऊन उभा राहिला व त्यांची समजूत घालण्याकरता त्यांना म्हणाला, ‘गृहस्थांनो, तुम्ही भाऊबंद आहात; एकमेकांवर अन्याय का करता?’


पाहा, ज्या कामकर्‍यांनी तुमची शेते कापली त्यांची ‘तुम्ही’ अडकवून ठेवलेली ‘मजुरी ओरडत आहे;’ आणि कापणी करणार्‍यांचा आक्रोश ‘सेनाधीश प्रभूच्या कानी’ गेला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan